मेकअपचा बेस असलेल्या फाऊंडेशनचा नेमका कसा उपयोग करायचा हे आजही अनेकांना कळत नाही किंवा फाऊंडेशन लावण्यासाठी नेमका कोणत्या ब्रशचा उपयोग करायचा कळत नाही.फाऊंडेशन लावण्यासाठी वेगवेगळे ब्रश मिळतात. हे ब्रशचे प्रकार आणि ते फाऊंडेशनसाठी त्याचा वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेऊया. ही माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नेमका कशाचा उपयोग करायचा? आणि एखादा नवीन ब्रश कसा निवडायचा हे तुम्हाला कळेल. चला करुया सुरुवात
DIY : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी लागणारं सोल्युशन असं करा स्वतःच तयार
ब्युटी ब्लेंडर (Beauty Blender)
फाऊंडेशन लावण्यासाठी अगदी सहज उपलब्ध होणारा असा ब्युटी ब्लेंडर हा एक स्पंज ब्रश आहे. अंड्याचा आकार असलेला हा ब्रश चेहऱ्यावर फाऊंडेशन पसरवण्यास मदत करते. फाऊंडेशन अगदी योग्य पद्धतीने यामुळे पसरते म्हणून याचा वापर अनेक मेकअप आर्टिस्ट करतात. हातावर अगदी थोडेसे फाऊंडेशन घेऊन त्यावर भिजवून घट्ट पिळून घेतलेला ब्युटी ब्लेंडर फाऊंडेशनमध्ये बुडवा. अगदी हलक्या हाताने तुम्ही चेहऱ्याला फाऊंडेशन पसरवून घ्या. हे फाऊंडेशन लावताना फार जोर लावावा लागत नाही. कमीत कमी फाऊंडेशनमध्ये काम होते.
ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करणे अनेकांच्या डोक्याला तापदायक वाटते. कारण त्यामध्ये मेकअप हा अधिक शोषला जातो. त्यामुळे त्याची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे असते.
ओवल फाऊंडेशन ब्रश ( Oval Foundation Brush)
टुथब्रशच्या आकाराप्रमाणे असणारा हा फाऊंडेशन ब्रश ओवल फाऊंडेशन ब्रश म्हणून ओळखला जातो. हा ब्रश वापरायला आणि स्वच्छतेसाठी फार सोपा असतो. तुम्हाला हा ब्रश वापरताना हातावर किंवा एका प्लेटमध्ये फाऊंडेशन घ्यायचे आहे. तुम्हाला किती फाऊंडेशन घ्यायचे आहे. यानुसार याचा उपयोग करायचा आहे. या ब्रशवर अगदी बारीक आणि मुलायम ब्रिसल्स असतात जे त्वचेला टोचत नाही. ते फार आरामदायी पद्धतीने चेहऱ्याला फिरतात. या ब्रशसोबत फाऊंडेशन अगदी छान लागते.
या ब्रशचा नीट वापर केला नाही तर या फाऊंडेशनच्या ब्रशमध्ये फाऊंडेशन खूप साचून राहते. त्यामुळे हा ब्रश जोपर्यंत तुम्हाला नीट वापरता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला जास्त फाऊंडेशन लागेल. त्यामुळे याचा योग्य वापर करायला शिका.
याचा वापर करुन झाल्यानंतर तुम्ही ब्रश फोम किंवा एखादा माईल्ड साबण असलेल्या पाण्यात टाकून ठेवा.
बजेटमध्ये बसतील असे 10 बेस्ट मेकअप ब्रश किट्स (Best Makeup Brush Kits In Marathi)
स्टिपलिंग ब्रश ( Stippling Brush)
स्टिपलिंग ब्रश हा अनेक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वापरतात. अनेकांच्या मेकअप आर्टिस्टमध्ये हा फाऊंडेशन ब्रश असतो. या ब्रशमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. यामध्ये वेगवेगळ्या साईज मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मेकअपच्या निवडीनुसार आणि वापरानुसार या ब्रशची निवड करा. हा ब्रशचे केसही मऊ असतात. या ब्रशमध्ये फाऊंडेशन चांगले शोषले जाते आणि ते चेहऱ्यावर फाऊंडेशन चांगले पसरते. पण याचा वापर योग्य नसेल तर चेहऱ्यावर पॅचेस तयार होतात.त्यामुळे याचा योग्य वापर शिकून घ्या.
आता फाऊंडेशनचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या पैकी काही ब्रश निवडू शकता.
महागड्या मेकअप ब्रशऐवजी वापरा या गोष्टी
तुम्ही कोणत्या वेगळ्या ब्रशचा उपयोग करण्याचा उपयोग करत असाल तर तुम्ही MyGlamm च्या या ब्रशचा उपयोग करु शकता. हा ब्रश वापरण्यास फार सोपा असतो.
Read More From Make Up Products
आमच्या 8व्या वाढदिवसानिमित्त एपिक सेलमध्ये लुटा शॉपिंगची मजा, घ्या ही 8 सौंदर्य उत्पादने
Vaidehi Raje
Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड
Trupti Paradkar
दिवाळी पार्टीसाठी व्हा तयार, वापरा हे मेकअप पॅलेट
Trupti Paradkar