Recipes

ख्रिसमससाठी फज आणि कुकीज करायच्या असतील तर नक्की वाचा या खास रेसिपीज

Dipali Naphade  |  Dec 18, 2019
ख्रिसमससाठी फज आणि कुकीज करायच्या असतील तर नक्की वाचा या खास रेसिपीज

ख्रिसमस म्हटला की, सर्वांसाठी आनंदाचा दिवस. केक, फज आणि कुकीज याचा तर ख्रिसमसला भडीमार असतो. पण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की, केक, फज आणि कुकीज या घरी तयार करता येत नाहीत. आपण सहसा बाजारातून हे सगळे पदार्थ घरी आणतो. पण तुम्हाला या ख्रिसमसला घरी खास फज आणि कुकीज तयार करायचं असेल तर तुम्ही हेदेखील करू शकता. या ख्रिसमसला तुम्हाला घरच्या घरी तुम्ही हे पदार्थ करू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला खास रेसिपी देणार आहोत. यासाठी POPxo मराठीने ITM Institute of Hotel Management च्या असिस्टंट प्रोफेसर शेफ भक्ती कुडाळकर यांच्याकडून खास रेसिपी जाणून घेतल्या आहेत. यामध्ये तुम्ही काय साहित्य घ्यायला हवं आणि किती प्रमाणात हवं हे सर्व भक्ती यांनी सविस्तर सांगतिलं आहे.  त्यामुळे या ख्रिसमससाठी काही नवीन आणि वेगळं करण्यासाठी तयार व्हा. जाणून घेऊया काय आहेत हे पदार्थ आणि काय आहेत याच्या रेसिपी – 

1. शुगर कुकीज

शुगर कुकीज खायला नक्कीच अप्रतिम लागतात. पण बघितल्यानंतर असं वाटतं की, हे बनवण्यासाठी किती आणि काय काय सामान लागत असेल आणि त्यासाठी किती वेळ खर्ची घालवायला लागेल. तर आपण इथे बघूया आपल्याला शुगर कुकीज बनवण्यासाठी नक्की काय लागतं 

साहित्य – 

बटरक्रिम फ्रॉस्टिंगसाठी साहित्य – 

कृती – 

एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ घालून भिजवा आणि बाजूला ठेवा. त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये तुम्ही बटर आणि साखर एकत्र करून त्यामध्ये कलर घालून ठेवा. त्यानंतर त्यामध्ये अंडं, दूध आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही वरच्या मैद्याच्या मिश्रणात नीट मिक्स करा. हे सर्व मिश्रण नंतर तुम्ही एक तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर बाहेर काढून साधारण 175 अंश सेल्सिअसवर ओव्हन प्रीहिट करा आणि बेकिंग शीट्स बनवून तुम्ही ते ओव्हनमध्ये ठेवा. बाहेर काढल्यानंतर त्याचे दोन भाग करा. हे हिटींग चालू असताना तुम्ही तुमचं फ्रॉस्टिंग करून घ्या. त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बटर नीट फेटून घ्या. त्यामध्ये पिठी साखर घाला. एकही गुठळी राहू देऊ नका. त्यामध्ये क्रिम आणि एक्स्ट्रॅक्ट अॅड करा  आणि थोडं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. साधारण 8 ते 10 मिनिट्स तुम्ही बेक करा. थंड झाल्यावर त्यावर फ्रॉस्ट करून डेकोरेट करा. 

2. ख्रिसमस फज

ख्रिसमस फज हा ख्रिसमसमध्ये करण्यात येणारा खास पदार्थ. बऱ्याचदा हा बाजारातून आणला जातो. पण घरी तयार करण्याची मजाच काही खास. 

साहित्य – 

कृती 

बेकिंग पॅनमध्ये पार्चमेंट पेपर ठेवून त्यावर कुकिंग स्प्रे तुम्ही मारा. मध्यम आकाराच्या सॉसपॅनमध्ये मध्यम आचेवर चॉकलेट वितळवून घ्या. त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क, बटर, क्रिम, व्हॅनिला आणि मीठ एकत्र करा. व्यवस्थित हे मिश्रण होईपर्यंत तुम्ही हे गरम करा. त्यानंतर त्यावरून तुम्हाला हवं असल्यास, बदाम, बेदाणे तुम्हाला जे काही हवं असेल ते घालून साधारण दोन तास फ्रिजमध्य ठेवा. नंतर त्याच्या वड्या पाडून तुम्ही खायला देऊ शकता. 

महागड्या कांद्याला करा हद्दपार, या स्वस्त-मस्त पर्यायांनी स्वादिष्ट होईल स्वयंपाक

3. पिनट बटर स्नोबॉल्स

ख्रिसमस म्हटलं की स्नोबॉल्स असायलाच हवेत. हेच स्नोबॉल्स तुम्हाला खाण्यातही मिळाले तर. अर्थात तुम्ही हे घरीदेखील करू शकता. 

साहित्य – 

कृती 

एका मोठ्या बाऊलमध्ये पिठी साखर, पिनट बटर, बटर, ग्रॅहम क्रॅकर क्रम्ब्स, मॅपल सिरप आणि मीठ एकत्र करून घ्या. ते नीट फेडून घ्या. तुम्हाला हवं तर हँड मिक्सरचा वापर करून याचं नीट मिश्रण करून घ्या. तयार केलेल्या  बेकिंग शीटवर हे मिक्स्चर नीट ओता. पण हे ओतत असताना तुम्ही लहान कुकी स्कूपचा वापर करून घ्या. दुसऱ्या एखाद्या मध्यम बाऊलमध्ये पांढरे वितळलेले चॉकलेट घ्या आणि त्यात नारळाचं तेल मिक्स करा. त्यानंतर त्याचे बॉल्स बनवा. त्यावरून स्प्रिंकल्स घालून साधारण दहा मिनिट्ससाठी रेफ्रिजरेट करून ठेवा. 

मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज (5 Delicious Indian Microwave Recipes)

चॉकलेट प्रोफिटरोल ख्रिसमस पुडिंग

पुडिंग हे तर असायलाच हवं. ख्रिसमस हे पुडिंगशिवाय अपूर्णच आहे. चॉकलेट आणि पुडिंग हे अप्रतिम मिश्रण आहे. हे थोडंसं वेगळं पुडिंग आहे. 

साहित्य 

फिलिंग आणि टॉपिंगसाठी 

कृती 

ओव्हन 220 अंश सेल्सिअस वर प्रीहिट करून ठेवा. मैदा,  कोको पावडर आणि सॉल्ट एकत्र करा. एका मध्यम आकाराच्या पॅनवर तुम्ही 300 मिली पाणी घ्या. त्यात कॅस्टर शुगर आणि बटर घाला. बटर वितळल्यानंतर पाणी नीट उकळवून घ्या. त्यानंतर त्या पॅनमध्ये मैद्याचं मिश्रण घाला. पुन्हा एकदा साधारण एक मिनिटसाठी हे उकळवून घ्या. नंतर लाकडी चमच्याने हे सर्व नीट मिक्स करा. गुठळ्या राहू देऊ नका. तसंच मिक्स करताना सतत मिक्स करत राहा. पाच मिनिट्स हे थंड होऊ द्या. त्यानंतर अंडं फेटून घ्या. मैद्याच्या मिश्रणामध्ये अंडं व्यवस्थित मिक्स होऊ द्या. यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक मिक्सरचादेखील वापर करू शकता. ही पेस्ट तयार झाली की, मोठ्या पिपिंग बॅगमध्ये भरून नंतर ट्रे मध्ये तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. साधारण 25 मिनिट्ससाठी तुम्ही हे ओव्हनमध्ये बेक करा. पिपिंग बॅग वापरणार असाल तर त्याला व्यवस्थित होल करा. दर 10 मिनिट्ससाठी तुम्ही मध्ये मध्ये काढून बघा. दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात पांढरं चॉकलेट मेल्ट करा. प्रत्येक प्रोफिटरोलवर तुम्ही हे चॉकलेट शिंंपडा आणि अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. डेकोरेट करण्यासाठी तुम्ही ग्रीन आईसिंग आणि रेड आईसिंगचा वापर करा. तसंच तुम्हाला हवं असेल तर छोट्या बेरीज तुम्ही लावू शकता. 

अगदी दोन मिनिटात घरच्या घरी करा मस्त ‘मगकेक’

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Recipes