आरोग्य

अस्वच्छता व निकृष्ट दर्जाच्या सॅनिटायझर्समुळेही गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा अधिक धोका

Dipali Naphade  |  Sep 16, 2020
अस्वच्छता व निकृष्ट दर्जाच्या सॅनिटायझर्समुळेही गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा अधिक धोका

लहान मुलांमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिस हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सध्या देशभरात सुरु असलेल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना घरी राहणे आणि सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र अशा परिस्थितीतही निष्कृट दर्जाच्या सॅनिटायझर्सचा वापर, भाज्या धुण्यासाठी वापरलेले अस्वच्छ पाणी साथीच्या आजारांना आमंत्रण देत आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने या मुलांमध्ये दुषित पाण्यामुळे होणारे आजाराचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातल्या रुग्णालयांमध्ये गॅस्ट्रो सारख्या आजाराच्या तक्रारी वाढल्या असून यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही बेबी पावडर आहे फायदेशीर

पाणी स्वच्छ उकळून प्यावे

Shutterstock

बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित आणि योग्य उपचार आपल्या मुलांना या आजारातून बरे करण्यास मदत करते. गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या व्यवस्थापनासाठी ओआरएस, झिंक आणि प्रोबायोटिक्सचा वापर करावा. विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छ उकळून थंड केलेले पाणी व योग्य पद्धतीने शिजवलेले अन्नाचा वापर करावा असे पुण्यातील अपोलो क्लिनिकचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अंशु सेठी सांगितले आहे. गॅस्ट्रोएन्टेरिटिसस कारणीभूत सूक्ष्मजंतू दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे आणि व्यक्ती-व्यक्तीच्या संपर्काद्वारे सहज पसरतात. हंगामी बदलांसह, 5 वर्षांखालील आणि विशेषतः 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगाचा जास्त धोका असतो. ओटीपोटात वेदना, उलट्या, सैल हालचाली, ताप, भूक न लागणे, सतत होणारी वांती, सूजलेले डोळे, सुस्तपणा, मलमध्ये रक्त आणि अगदी लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनदरम्यान मुलांवर करा चांगले संस्कार

काय घ्यावी काळजी

विषाणू, जिवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ या वाटे हा संसर्ग होऊ शकतो. उलट्या-जुलाब ही ‘गॅस्ट्रोएन्टरायटिस’ची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारातून रुग्णांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटय़ा आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. अगदी दिवसाला २० ते ३० उलटय़ा आणि त्याच प्रमाणात जुलाब होतात. अनेकदा उलटय़ा, जुलाब याबरोबरच ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येतात. जुलाब, उलट्या ही लक्षणे तीव्र स्वरूपात दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सॅनिटाईझ करण्याची सवय योग्य

लहान मुलांना अतिसार व उलटी होत असल्याने शरीरातील पाणी कमी होते. यातून अशक्तपणा वाढतो. त्यामुळे लहान मुलांना खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावावी तसेच लहान मुलांच्या खाण्या-पिण्याकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यावे. पावसाळ्यात आणि त्यानंतरही पाणी उकळून आणि गाळून पिणे हिताचे. वापरण्यापूर्वी पालेभाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्या. लहान मुलांना रोटाव्हायरसची लस आवश्यक द्या. या लसीमुळे बाळाचा साथीच्या आजारापासून बचाव करता येऊ शकतो असेही डॉ. अंशु सेठी यांनी सांगितले. यासाठी घरात योग्य दर्जाचे सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. आमच्या Myglamm च्या काही उत्पादनांचाही तुम्ही यासाठी वापर करून घेऊ शकता. बाळांसाठी खास सॅनिटाईझ वाईप्सदेखील तुम्हाला मिळतील.

मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य