मनोरंजन

गौहर खान करणार पहिल्यांदाच पती झैदबरोबर स्क्रिन शेअर

Dipali Naphade  |  Aug 13, 2021
gauahar khan and zaid darbar

गौहर खान (Gauahar Khan) आणि तिचा पती झैद दरबार (Zaid Darbar) यांची जोडी खूपच प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघेही नेहमीच वेगवेगळे ट्रेंड्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. गौहर गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. गौहर आणि झैदने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये निकाह केला असून त्यानंतर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ केले आहेत. मात्र दोघांनी कधीही एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही. आता पहिल्यांदाच गौहर आणि झैद ही क्यूट जोडी अली ब्रदर्सच्या ‘वापिस’ या गाण्यातून प्रेक्षकांना आणि चाहत्यांना दिसणार आहेत. यामुळे नक्कीच त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला असणार यात शंका नाही.

गौहरने केला टीझर शेअर

झैदबरोबरील आपल्या पहिल्या गाण्याचा टीझर गौहरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या दोघांचेही हे पहिले गाणे असून त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात प्रेम, अश्रू आणि आनंद या तिन्हीचा संगम आणेल असंही गौहरने यावेळी म्हटलं आहे. हे गाणे शेअर करताना गौहरने भावूक कॅप्शन दिली आहे, ‘आमचा एकत्रित असा पहिला प्रोजेक्ट तुमच्या सगळ्यांसमोर आणण्यासाठी आता अजून वाट पाहू शकत नाही. हो, आम्ही खूपच उत्साही आहोत! आम्हा दोघांचे #Wapis लवकरच येत आहे…तुमची उत्सुकता आणि प्रेम कमेंट्समध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा. हा गाण्याचा ट्रॅक तुम्हाला नक्कीच प्रेम, अश्रू आणि आनंद मिळवून देणार आहे. आम्ही तुम्हाला असं वचन देत आहोत. @alibrothersofficial खरोखरंच, आतापर्यंत मी ऐकलेल्या गाण्यांपैकी एक सर्वोत्तम गाणं आहे. #GaZa @zaid_darbarची निवड केल्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, हे गाणं आता तुमच्यासमोर साद करण्यासाठी यापेक्षा अधिक वाट पाहू शकत नाही.’ 

अधिक वाचा – कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यामुळे सारा झाली ट्रोल

कमेंट्सचा वर्षाव

गौहरचे चाहते ही बातमी ऐकून खूपच उत्सुक झाले आहेत. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसंच आपण यासाठी किती उत्सुक आहोत हेदेखील चाहत्यांनी सांगितले आहे. केवळ चाहतेच नाही तर गौहरच्या कुटुंबीयांनीही या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी आपण किती उत्सुक आहोत हे कमेंट करून सांगितले आहे. अवेझ दरबार, अनम दरबार, राखी सावंत, गौतम रोड, प्रीती सिमोन्स या सेलिब्रिटींनीदेखील आपण या गाण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे कमेंटमध्ये नमूद केले आहे. तसंच तिच्या या नव्या गाण्यासाठी त्यांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. 

अधिक वाचा – ती परत आलीये’ मध्ये तिचा करावा लागेल सामना

झेद आणि गौहर क्यूट कपल

गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान गौहर आणि झैदची एका दुकानात ओळख झाली आणि पहिल्या भेटीतच झैद तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर मेसेज आणि भेटीगाठीला सुरूवात झाली. झैद गौहरपेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान आहे. मात्र वय कधीच त्यांच्या प्रेमाच्या आड आले नाही. एकमेकांना जाणून घेतल्यानंतर दोघांनी डिसेंबरमध्ये लग्नाचा निर्णय घेतला आणि दोघेही मागच्या वर्षी विवाहबद्ध झाले. झैदने लग्नाची मागणी घातल्यानंतर त्वरीत गौहरने होकार दिला होता. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतरही दोघेही नेहमीच आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावरही देत असतात. आता लवकरच दोघांना एकत्र गाण्यात पाहून प्रेक्षकांनाही आनंद होणार आहे हे नक्की.

अधिक वाचा – सनी देओल आणि पूजा भट चोविस वर्षांनंतर एकत्र, या चित्रपटात झळकणार जोडी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन