Combination Skin

मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय

Dipali Naphade  |  May 15, 2019
मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय

आपण नेहमीच आपल्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष देत असतो. पण अशावेळी आपलं आपल्या मानेकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. महत्त्वाचं म्हणजे मानेची त्वचा इतकी मऊ आणि मुलायम असते की, त्यावर ऊन आणि प्रदूषणाचा प्रभाव लवकर पडतो. नेहमी चेहरा धुताना आपली मान धुणं शक्य नसतं कदाचित त्यामुळेच मान लवकर काळी पडते. मान काळी पडल्यानंतर त्यावर बरेच घरगुती उपचार असतात. पण हे उपचार आपण बरेचदा करणं टाळत असतो. खरं तर हे उपचार करणं अतिशय सोपं आहे. घरच्या घरी तुम्हाला हे उपचार करून तुमच्या मानेवरील काळेपणा सहजपणाने दूर करता येतो. कारण चेहरा व्यवस्थित असला तरीही मान काळी दिसली तर ते दिसायला अतिशय वाईट दिसत असतं. मग अशावेळी नक्की काय करायचं असा प्रश्नही आपल्याला पडतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचाच रंग तुमच्या मानेवर तसाच टिकून राहावा यासाठी खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. ओटमील स्क्रब

मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही हा पर्याय नक्की वापरा. पाच चमचे ओटमील घेऊन ते मिक्सरमधून वाटा. त्यामध्ये 2 चमचे टॉमेटोचा रस आणि एक लहान चमचा मध मिसळा. ही पेस्ट आठवड्यातून 2 वेळा मानेवर लावा. हे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

2. लिंबाची कमाल

लिंबामध्ये विटामिन सी चं प्रमाण भरपूर आहे आणि जे तुमच्या त्वचेवरून काळेपणा दूर करण्यासाठी मदत करतं. तसंच लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असतं जे नैसर्गिकरित्या ब्लीचिंगचं काम करतं.

3. लिंबासह मध

लिंबू आणि मधाचा पॅक बनवूनदेखील तुम्ही मानेवर लाऊ शकता. दोन चमचे मधामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून 20 ते 25 मिनिट्सपर्यंत तुमच्या मानेला हे मिश्रण लाऊन ठेवा. आंघोळ करताना हे पॅक हलक्या हाताने रगडून साफ करा. यामुळे त्वचेवरील काळेपणा तर दूर होतोच शिवाय त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग राहात नाहीत.

4. बेकिंग सोडा

दोन चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडं पाणी घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या मानेवर 15 मिनिट्स लाऊन ठेवा. तुमच्या मानेवर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. बेकिंग सोडा हा त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी उत्कृष्ट उपाय आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरी बेकिंग सोडा हा पर्याय उपलब्ध असतोच.

5. सनस्क्रीन

उन्हातून जाण्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच मानेला सनस्क्रिन लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शरीराच्या प्रत्येक उघड्या अंगाला तुम्ही ऊन्हातून निघण्याआधी सनस्क्रिन लावायला हवं. हे लावण्याचीही एक पद्धत असते. घराबाहेर पडण्याआधी साधारण 20 मिनिट्स पहिले हे सनस्क्रिन लावायला हवं.

6. कच्ची पपई

दोन स्लाईस कच्ची पपई घेऊन त्याचे बारीक तुकडे करा. आता त्यामध्ये थोडंसं गुलाबपाणी आणि एक चमचा दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट साधारण 20 मिनिट्स तुमच्या मानेला लावा आणि तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने साफ करून घ्या. आठवड्यातून तुम्ही दोन वेळा असं केल्याने तुमच्या मानेवरील काळेपणा निघून जाण्यास मदत होईल.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

हाताचा कोपरा (Elbow) आणि गुढघ्याचा (Knees) काळेपणा करा दूर

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

ओठ काळे पडले असतील तर करा 10 घरगुती उपाय

Read More From Combination Skin