DIY सौंदर्य

अगदी 5 मिनिटांत मिळवा जाड आयब्रोज, जाणून घ्या सोपी पद्धत

Leenal Gawade  |  Jul 13, 2019
अगदी 5 मिनिटांत मिळवा जाड आयब्रोज, जाणून घ्या सोपी पद्धत


हल्ली जाड आयब्रोजचा ट्रेंड आहे. तुमचे आयब्रोज जितके जाड असतील तितके ते तुम्हाला चांगले दिसतात. पण आता सगळ्यांच्याच आयब्रोजचा आकार काही जाड नसतो. पण अशावेळी जर तुम्हाला जाड आयब्रोज करुन तुमचा लुक बदलायचा असेल तर तुम्ही अगदी झटपट आयब्रोज जाड करु शकता. आज आपण घरच्या घरी अगदी 5 मिनिटात आयब्रोज जाड कशा करायच्या ते पाहुया.

shutterstock

अशी करा सुरुवात

आता आपण इतक्या झटपट आयब्रोज जाड करणार आहोत म्हटल्यावर आपल्याला काही मेकअप प्रोडक्टची गरज आहे. हल्ली आयब्रोज फिल करण्यासाठी अनेक चांगले प्रोडक्ट बाजारात मिळतात.ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला अगदी नॅचरल लुक देणारे आयब्रोज वाटतात. या शिवाय आयब्रोज फिल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयब्रोजच्या केसांच्या शेडप्रमाणे रंगही मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयब्रोजना काही जबरदस्ती काही लावले असे वाटत नाही. आयब्रोज फिल करण्यासाठी मिळणारे आयब्रोज फिलर हे ड्राय किंवा लिक्वी बेस असतात तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करु शकता.

या नॅचरल ड्रिंक्सने येईल तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो

Popxo ची पसंती या प्रोडक्टला

असे करता येतील तुमचे आयब्रोज जाड

जाणून घ्या काय आहे फलाहाराचे महत्त्व

हे ही असू द्या लक्षात

shutterstock

*प्रत्येकाच्या आयब्रोजचा रंग वेगळा असतो. त्यानुसार तुम्हाला तुमचा रंग निवडायचा आहे. 

*काळा रंग हा प्रत्येकालाच चांगला दिसतो असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शेडप्रमाणेच याची निवड करा. 

*आयब्रोज जाड करताना ते किती जाड करायचे  ते देखील तुम्हाला माहीत हवे. 

*खूप जाड आयब्रोजही अनेकदा चांगले दिसत नाही हे देखील लक्षात असू द्या. 

*तुमचा चेहरा लहान असेल तर फार मोठे आयब्रोज करु नका.

*काहींचे आयब्रोज हे पुढच्या बाजूने फार लहान असतात. तुम्ही त्यांना जरा जरी मोठे केले तरी तुमच्या आयब्रोजचा आकार छान दिसेल. 

*जर आयब्रोज पेन्सिलचा वापर करणार असाल तर तुम्हाला स्ट्रोक किती जाड मारायचे हे तुम्हाला कळायला हवे.

हॉटेलमध्ये check in केल्यानंतर करा गोष्टींची खात्री

Read More From DIY सौंदर्य