नवे वर्ष नवा उत्साह घेऊन येत असते. गतवर्षात झालेल्या सगळ्या गोष्टी सोडून नव्या वर्षात नवे नातेसंबंध प्रस्तापित करणे गरजेचे असते. तर चांगली नाती टिकवणे गरजेचे असते. तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नवे वर्ष चांगले जावे असे तुम्हालाही वाटत असेल आणि त्यासाठी तुम्ही त्यांना काहीतरी देण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही सोप्या आयडियाज निवडल्या आहेत. नवीन वर्षात तुमच्या जवळच्या व्यक्तींना देण्यासाठी या गिफ्ट आयडियाज तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. या शिवाय तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देऊन इतरांचा दिवस आनंदी करु शकता.
डायरी
एखाद्या गोष्टीची नोंद ठेवणे हे फारच गरजेचे असते. तुमचा येणारा प्रत्येक दिवस चांगला जावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमित काही गोष्टींची नोंद करणे गरजेचे असते. जर तुम्ही एखादी छानशी पॉकेट डायरी भेट म्हणून दिली तर अशी डायरी कायम सोबत ठेवता येते. तुम्हाला काही पटकन लिहायचे असेल. काही गोष्टींची नोंद करायची असेल तर अशा डायरी उपयोगी पडतात. त्यामुळे बाजारात मिळणारी छान डायरी तुम्ही तुमच्या मित्रांसाठी निवडा. ती त्यांना नक्कीच आवडेल. जर तुम्हाला काहीतरी मोठे द्यायचे असेल तर तुम्ही प्लॅनर दिले तरी देखील चालू शकेल. त्याचा उपयोग देखील अनेकांना करता येतो.
पर्सनलाईज्ड फ्लॉवर पॉट्स
खूप जणांना झाडं लावायला खूप आवडतात. झाडांमध्ये पॉझिटिव्ह अशी एनर्जी असते. खूप जणांच्या घरी कुंडीतील झाडे, बाल्कनीतील झाडे, टेरेस गार्डनिंग अगदी आवर्जून लावली जातात. अशा तुमच्या झाड प्रेमी मित्रांसाठी तुम्ही हल्ली मिळणाऱ्या कस्टमाईज कुंड्या मागवू शकता. या कुंड्या तुम्हाला गिफ्ट देताना त्यासोबत तुम्हाला त्यावर छान मेसेज किंवा त्यांचे नाव कोरता येऊ शकते. इतकेच नाही तर तुम्ही बाजारातून साध्या कुंड्या आणून त्या देखील सजवून एखाद्याला देऊ शकता. हे गिफ्ट तुमच्या बजेटमध्ये बसणारे आहे.
बॉडी केअर किट
तुमची जवळची व्यक्ती खूपच सेल्फ केअर करणारी असेल तर तुम्हाला त्यासाठी काही खासच निवडायला हवं. खूप जणांना स्किनकेअर करायला किंवा बॉडीकेअर रुटीन फॉलो करायला खूपच जास्त आवडते. अशा तुमच्या लाडक्या मित्र-मैत्रिणींसाठी तुम्ही अगदी हमखास अशा काही गोष्टी निवडायला हव्यात.स्क्रब. मसाज जेल किंवा बाथरुम म्हणजे आंघोळीशी निगडीत तुम्ही काही गोष्टी नक्कीच त्यांना द्यायला हव्यात. त्याचा त्यांना जास्तीत जास्त उपयोग होतो. जर शक्य असेल तुम्ही त्यांच्या आवडीचा फ्रॅगनंन्स निवडून त्या पद्धतीने देखील त्यांना गिफ्ट करु शकता.
क्लीप बोर्ड
एखादे काम तुम्हाल करायचे असेल आणि तुम्ही सतत ते विसरत असाल तर ती गोष्ट तुम्हाला समोर दिसायला हवी. यासाठीच क्लीप बोर्ड काम करतात. तुम्ही जिथे काम करता किंवा तुमचे लक्ष जिथे सतत जाते. त्या ठिकाणी हा बोर्ड लावता येतो. त्यामुळे होते असे की, तुम्हाला त्या क्लीप बोर्डला काही गोष्टी लावून ठेवता येतात. जर तुम्हाला थोडे महागडे गिफ्ट करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे क्लीप बोर्ड देखील गिफ्ट करु शकता.
आता या पैकी काही गिफ्ट तुम्हाला नक्कीच नव्या वर्षात देता येतील.