लेदरचे कपडे अथवा जॅकेट तुम्हाला एक क्लासिक लुक देतात. एखाद्या फॉर्मल अथवा ग्लॅम लुकवर साधी लेदरची पर्स, बॅग अथवा बेल्टही अतिशय शोभून दिसतो. मात्र या वस्तू लेदरच्या म्हणजेच या चामड्यापासून बनवलेल्या असल्यामुळे त्या लवकर खराब होऊ शकतात. पावसाळा अथवा हिवाळ्यात या वस्तूंची विशेष काळजी घ्यायला लागते. लेदरवर पावसाळ्यात अथवा दमट वातावरणात पटकन बुरशी पकडते. सहाजिकच तुम्ही या वस्तू कशा ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठीच जाणून घ्या लेदरचे कपडे अथवा वस्तू यांची कशी निगा राखावी.
अशा पद्धतीने घ्या लेदरच्या वस्तूंची काळजी
लेदर वापरणं कितीही प्रतिष्ठेचं असलं तरी जर या वस्तूंची नीट निगा राखली नाही तर त्या लवकर खराब होऊ शकतात. वास्तविक भारतात थंडी कमी असल्यामुळे लेदरचे जॅकेट फॅशन म्हणून अथवा थंडीतच काही काळ वापरले जातात. थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यास गेल्यावर तुम्हाला त्याची गरज नक्कीच लागते. लेदरच्या एक्सेसरीजदेखील पावसाळ्यात वापरता येत नाहीत. त्यामुळे इतरवेळी तुमचे लेदरचे कपडे आणि वस्तू कपाटात ठेवून दिले जातात. लेदर महाग असल्यामुळे सारखं सारखं विकत घेता येत नाही. शिवाय ठेवून ठेवून ते लवकर खराब होतं. यासाठी अशा वस्तूंची निगा कशी राखावी हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कपाटात ठेवूनही या वस्तू जास्त काळ टिकवू शकता.
- लेदरच्या वस्तू जसं की कपडे, पर्स, बेल्ट कधीच कपाटात कोंबून ठेवू नका. कारण त्याला जरा जरी दमटपणा लागला तरी ते खराब होऊ शकतं.अशा वस्तू उन्हाळ्यात चांगल्या वाळवून मगच कपाटात ठेवाव्या. तसंच वाचा लेदरची हॅंडबॅग खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
- लेदरच्या वस्तू नेहमी नारळाचे तेल अथवा फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्याव्या.
- ओलसरपणा अथवा पाणी लागणार नाही याची काळजी घेतली तर लेदर लवकर खराब होणार नाही.
- दर एक ते दोन महिन्यांनी वापरात नसलेल्या लेदरच्या वस्तू पुन्हा स्वच्छ करून वाळवून कपाटात ठेवून द्याव्या.
- लेदरचे जॅकेट अथवा कपडे नेहमी कपाटात हॅंगरवर टांगून ठेवावे. ज्यामुळे हवा खेळती राहिल आणि ते खराब होणार नाहीत.
- लेदरवर जर एखादा डाग लागला तर तो काढण्यासाठी पाण्याचा वापर करू नका. तेल लावून तो कापसाने पुसून घ्या आणि उन्हात वाळत ठेवा ज्यामुळे तो डाग निघून जाईल.
- लेदरवर कधीच इस्त्री अथवा हिट देणाऱ्या वस्तू वापरू नका नाहीतर ते लवकर खराब होईल.
- लेदरवरील डाग काढण्यासाठी तुम्ही अल्कोहोल अथवा कॉर्नस्टार्च वापरू शकता.
- लेदरच्या कापडाला नेहमी एक उग्र वास येतो यासाठी दर सहा महिन्यातून एकदा त्यावर स्पेशल लेदर स्प्रे मारा. ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या
- लेदरच्या चपला अथवा बूट प्लास्टिकच्या बॅगेत न भरून ठेवता कापडी बॅगेत भरून ठेवा ज्यामुळे त्या जास्त दिवस टिकतील. बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स – Kolhapuri Chappal Designs
लेदरचे कपडे आणि वस्तू यांची निगा कशी राखावी याबाबत या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.