अॅस्ट्रो वर्ल्ड

गुरूपुष्यामृत योग 2022 संपूर्ण माहिती | Gurupushyamrut Yoga In Marathi

Leenal Gawade  |  Nov 19, 2021
gurupushyamrut yoga 2022

चांगली कामे करण्यासाठी, नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही दिवस शुभ मानले जातात. गुरुपुष्यामृत योग हा त्यापैकीच एक. अनेकांनी गुरुपुष्यामृत योग 2022 (Gurupushyamrut Yoga 2022 In Marathi) हा नक्कीच कॅलेंडरमध्ये वाचला असेल. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते हे अनेकांना माहीत असेल. पण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय (Gurupushyamrut Yoga Chi Mahiti), गुरुपुष्यामृत योगाचे महत्व (Gurupushyamrut Yoga In Marathi) जाणून घेणेही गरजेचे असते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की, त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. अनेक चांगल्या कामांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तर काही गोष्टींसाठी हा दिवस अशुभ मानला जातो. जाणून घेऊया गुरुपुष्यामृत योगाचे महत्व.

गुरुपृष्यामृत योग 2022 – Gurupushyamrut Yoga 2022 In Marathi

गुरुपृष्यामृत योग म्हणजे काय

गुरुपृष्यामृत योग 2022 मुहूर्त वेळ

तारीखसुरुवातसमाप्ती
गुरुवार, 30  जून25:07:1129:26:31
गुरुवार, 28 जुलै07:05:2429:40:23
गुरुवार, 25 ऑगस्ट05:55:1316:17:00
गुरुपुष्यामृत योग 2022

ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्र येतात. त्यापैकी एक नक्षत्र आहे ते म्हणजे ‘पुष्य नक्षत्र’ या नक्षत्राचे आपले एक विशेष आहे. हे नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत असे म्हणतात. ज्याप्रमाणे सिंह हा सगळ्या जंगलाचा राजा आहे असे आपण म्हणतो. अगदी तसाच गुरुपुष्यामृत योग हा देखील सगळ्यात मोठा योग मानला जातो. या दिवशी सुरुवात केलेल्या कोणत्याही कार्याला यश मिळण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेक जण गुरुवारी एखाद्या कार्याची शुभ सुरुवात करतात. या दिवशी चंद्र हा राशीच्या चौथ्या, आठव्या आणि बाराव्या घरात असतो. हा योग अशुभ मानला जातो. पण या दिवशी जुळून येणारा गुरुपुष्यामृत योग या दिवसाला अधिक चांगला आणि शुभ करण्यास मदत करतो. म्हणूनच 27 नक्षत्रांमध्ये हा दिवस हा अत्यंत शुभ (Gurupushyamrut Yoga In Marathi) मानला जातो. 

 गुरुपुष्यामृत या शब्दाची फोड केल्यानंतर गुरु आणि पुष्य असा होतो. पुष्य याचा अर्थ अधिक उर्जा आणि बळ देणारा असा आहे. त्यामुळेच हा  दिवस फारच खास आहे. अनेक ठिकाणी गुरुपुष्यामृत योगाचे कॅलेंडर खास लावले जाते. विशेषत: सोन्याच्या दुकानात या दिवशी खरेदीचा वेग जास्त असतो. प्रत्येक जण त्याला परवडेल इतके सोने या दिवशी खरेदी करते. त्यामुळे त्यात वाढ होते अशी प्रत्येकाची धारणा आहे.

गुरुपृष्यामृत योगाची माहिती आणि पौराणिक कथा – Gurupushyamrut Yoga Chi Mahiti

Gurupushyamrut Yoga Chi Mahiti

गुरुपुष्यामृत योग हा अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे असे म्हटले जाते. या दिवशी नेमके काय करावे ते जाणून घेऊया. 

  1. गुरुपुष्यामृत हा दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी करावी. त्यामुळे त्याच वृद्धी आणि वाढ होण्यास मदत होते.  सोने घरी आणल्यानंतर ते देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी. त्यामुळे ते धन टिकण्यास मदत मिळते. 
  2. एखादे रखडलेले काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर गुरुपुष्यामृत या दिवसाची निवड करुन ही चांगली असते. या दिवशी कामांची सुरुवात केली तर कामे पूर्ण होतात. 
  3. एखादे नवे काम हाती घ्यायचे असेल तर हा दिवस अगदी योग्य आहे असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी एखादे नवीन काम हाती घेण्यास काहीच हरकत नाही. 
  4. नवीन वाहनं, नवीन गाड्या या दिवशी खरेदी केल्या तरी देखील चालू शकतात.त्यामुळेही चांगला लाभ होतो. 
  5. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते. असे देखील म्हटले जाते. 

आगामी काळातील गुरुपृष्यामृत योग – Upcoming Gurupushyamrut Yoga

Gurupushyamrut Yoga In Marathi

आगामी काळात गुरुपुष्यामृत योग किती आहेत आणि कोणत्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची खरेदी करायला हवी. यासाठी आगामी काळातील गुरुपुष्यामृत योग 

2023

तारीखसुरुवातसमाप्ती
गुरुवार, 30 मार्च22:59:4730:13:04
गुरुवार, 27 एप्रिल06:59:4529:43:30
गुरुवार, 25 मे05:25:4517:53:53
गुरुवार 28 डिसेंबर25:05:2131:12:51
2023 मधील गुरुपुष्यामृत योग

2024

तारीखसुरुवातसमाप्ती
गुरुवार, 25 जानेवारी08:17:3131:12:26
गुरुवार, 22 फ्रेब्रुवारी06:53:4916:44:13
गुरुवार, 26 सप्टेंबर23:34:5030:12:09
गुरुवार, 24 ऑक्टोबर06:27:5131:40:55
गुरुवार, 21 नोव्हेंबर06:48:5215:36:12
2024 मधील गुरुपुष्यामृत योग

2025

तारीखसुरुवातसमाप्ती
गुरुवार, 24 जुलै16:44:5029:38:10
गुरुवार, 21 ऑगस्ट5:53:0724:09:24
गुरुवार, 18 सप्टेंबर06:07:1006:33:08
2025 मधील गुरुपुष्यामृत योग

आता हे काही आगामी योग पाहता यानुसार तुम्ही खरेदी अथवा चांगली कामे करावीत.

अधिक वाचा:

तळहातावरील या रेषा असतात फारच शुभ, जाणून घ्या अर्थ

देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड