तुमच्या हेल्दी सवयी (healthy habits for weightloss) चांगल्या असण्याची गरज आहे एका नव्या अभ्यासामध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे. कारण डाएटिंग करून वजन कमी करणारे लोक हे पहिल्याच वर्षात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वजन वाढवून घेतात. बाकीचं वजन पुढच्या तीन वर्षांमध्ये वाढतं. पौष्टीक जेवण, कमी खाणं आणि जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहणं या तीन गोष्टींमुळे आपलं वजन व्यवस्थित राखू शकतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. हे खरंतर अजिबात कठीण नाही. तरीही लोक प्रत्यक्षात मात्र आणू शकत नाहीत. आपण रोजच खाण्यासंदर्भात काही ना काही तरी असे 100 निर्णय घेत असतो. आपल्याला आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी जे काही खात असतो त्याबद्दल अजिबात कल्पना नसते. सवयीनुसार आपल्यासमोर जे काही येईल ते आपण खात जातो. या बाबतीत एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला स्वतःला जर हेल्दी श्रेणीमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला ‘या’ 10 सवयी असणं गरजेचं आहे. जलद वजन कमी करायचं असल्यास, तुम्ही हे नक्की वाचा.
काय आहे रिसर्च
विचार करा की, जेव्हा एखादा माणूस घरी पोहचतो, तेव्हा कोणतंतरी स्नॅक खातो. जेव्हा पहिल्यांदा अशी प्रक्रिया तो माणूस करतो, तेव्हा घरी पोहचेपर्यंत त्याच्या मनात हे पक्कं झालेलं असतं आणि एक मेंटल लिंक बनते ज्यामुळे त्याला प्रतिसाद स्नॅक खाण्यातून मिळतो. अशा तऱ्हेने ही लिंक हळूहळू जबरदस्त बनते आणि घरी पोहचेपर्यंत खाण्याची तलफ त्याला लागते. तलफचं रूपांतर मग सवयीमध्ये होतं.
नव्या रिसर्चनुसार, सवयी बदलण्याशी वजन कमी करण्याचं खूपच महत्त्वाचं नातं आहे. तुमच्या जुन्या सवयी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील आणि नव्या सवयी लाऊन वजन कमी करावं लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला तुमचं वजन राखावंही लागेल.
या रिसर्चमध्ये 75 पेक्षा अधिक जाड्या आणि अधिक वजनाच्या लोकांचे परीक्षण करण्यात आलं आहे आणि त्यांना तीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागण्यात आलं. यामध्ये एका ग्रुपला जुन्या सवयी सोडण्यासाठी सांगण्यात आलं, एका ग्रुपला नव्या सवयी लावण्यात सांगण्यात आलं आणि तिसऱ्या ग्रुपला कोणतीच गोष्ट करा वा करू नका याचा सल्ला देण्यात आला नाही.
नियमित सवय तोडण्याचा प्रयत्न – Break Routine
सवयी सोडण्यासाठी सांगण्यात आलेल्या ग्रुपला रोज काहीतरी वेगवेगळं काम करण्यासाठी मेसेज पाठवण्यात येत होते. ज्यामुळे त्यांची नियमित सवय तुटेल असा प्रयत्न होत होता. यामध्ये कामावर जाण्यासाठी वेगळा रस्ता निवडणं, काही वेगळ्या तऱ्हेचं संगीत ऐकणं आणि एक लहान गोष्ट लिहिणं यासारख्या कामांचा समावेश करण्यात आला.
तर नव्या सवयी लावण्यचं सांगण्यात आलेल्या ग्रुपला एक असा प्रोग्राम फॉलो करायला सांगण्यात आला, जो हेल्दी लाईफस्टाईलशी निगडीत होता. या ग्रुपच्या लोकांना आपल्या रोजच्या सवयींमध्ये 10 हेल्दी टीप्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं.
दर दुसऱ्या वजन कमी करण्याच्या प्रोग्रामच्या उलट यांच्या रिसर्चमध्ये कोणत्याही व्यायामाच्या अथवा खास डाएट प्लॅनसंदर्भात सांगण्यात आलं नाही. त्याऐवजी रोजच्या सवयी बदलण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं.
वाचा – कमी वेळात वजन करण्यासाठी पुढील 10 गोष्टी रोज करा
दोन्ही ग्रुपच्या लोकांनी केलं वजन कमी – Weightloss Groups
यानंतर बारा आठवड्यांनी तपासणी केली असता नव्या सवयी लावलेल्या ग्रुपमध्ये आणि जुन्या सवयी सोडलेल्या ग्रुपमध्ये साधारणतः 3.1 किलो वजन कमी झाल्याचं आढळून आलं. सर्व महत्त्वाचं म्हणजे यानंतर अजून बारा महिन्यांनी कोणतंही मार्गदर्शन न करता याच लोकांनी 2.1 किलो वजन कमी केलं.
यामध्ये 67% लोकांनी आपल्या वजनाच्या साधारण 5% वजन कमी केलं आणि त्याचबरोबर टाईप टू डायबिटीस आणि हृदयाशी निगडीत आजाराचा धोकाही त्यांना कमी जाणवू लागला. तसंच वजन कमी करणाऱ्या जास्त लोकांनी फळं आणि भाज्यांवर जास्त भर देऊन आपलं मानसिक आरोग्यदेखील मोठ्या प्रमाणात सुधारण्याची किमया करून दाखवली.
यामधून आपण वजन कमी करण्याच्या व्यवस्थापनाबद्दल आपलं मत बदलू शकतो आणि आपल्या सवयी बदललल्याने वजन कमी होतं हेदेखील सिद्ध झालं आहे.
वाचा – वजन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टीप्स अवश्य फॉलो करा
वजन कमी करण्यासाठी लावा 10 हेल्दी सवयी – Healthy Habits for Weightloss
नव्या सवयी लावणाऱ्या ग्रुपने वजन कमी करण्यासाठई एक चॅरिटी वेटलॉस कन्सर्नची मदत घेतली. त्याच्याकडून देण्यात आलेल्या टीप्स आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत –
1. जेवणाची योग्य वेळ
रोज जेवणाची एकच वेळ ठेवा अर्थात रोज जेवण एकाच वेळी जेवा. वजन कमी करण्याच्या मिशनमध्ये तेच लोक यशस्वी होतात जे रोज वेळेवर जेवतात आणि नियमितपणा पाळतात. त्यामुळे वेळेवर जेवण जेवणे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शिवाय हे लोक मधल्या वेळात स्नॅक्स आणि सतत दोन – दोन तासाने खाणं टाळतात. हे लोक केवळ एक आठवडा नाही, तर एक निश्चित डाएट चार्ट फॉलो करून त्याप्रमाणेच खातात. त्यामुळेच वजन कमी करण्यात त्यांना यशही मिळतं आणि त्यांचं वजन कायम आटोक्यातही राहतं.
2. जेवणात हेल्दी फॅट्स असणं गरजेचं
याशिवाय जेवणामध्ये हेल्दी फॅट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये फास्ट फूडच्या जागी नट्स, ड्रायफ्रूट्स, अॅव्हाकॅडो आणि मासे यांचा समावेश असायला हवा. कारण फास्ट फूडमध्ये असणारे ट्रान्स फॅट्स हे हृदयाशी संबंधित आजाराला कारणीभूत असतात.
3. वेळ मिळेल तेव्हा चाला
तुम्हाला खरं तर इतकं चालायला हवं की, तुमचं वजन स्वतःहून कमी होईल. त्यासाठी तुम्ही एक लक्ष्य ठेवायला हवं. जसं रोज साधारणतः किमान 10,000 पावलं चालायची आहेत किंवा तुम्हाला जिथे जायचं आहे तर चढण्यासाठी जिन्यांचा वापर करा. यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. तुम्हाला ज्या स्टॉपवर उतरायचं आहे, त्यापेक्षा आधीचा स्टॉप उतरा आणि मग आपल्या घरी चालत जा. यामुळे वजन तर कमी होतंच शिवाय तुमच्या हार्ट रेटही वाढून तुमचं हृदय निरोगी राहतं.
4. बाहेर जाताना स्वतःबरोबर हेल्दी स्नॅक्स ठेवा
तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमच्याबरोबर नक्कीच चिप्स, क्रॅकर्स, बिस्किट आणि मंचीज असे पदार्थ घेत असणार. पण यापुढे या सर्व खाण्याऐवजी, नट्स, फळं आणि मखाने यासारखे हेल्दी स्नॅक्स स्वतःबरोबर ठेवा. यामुळे तुमची भूकही भागते आणि तुमच्या शरीराला त्रासही होत नाही.
5. खाण्यापूर्वी उत्पादनाचं लेबल तपासा
कोणतंही खाणं बाजारातून खरेदी करताना सर्वात पहिले त्याचं लेबल नक्की तपासा. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये किती फॅट्स, किती साखर आणि किती मीठ आहे याचा अंदाज येईल.
6. किती जेवण जेवायचं हे लक्षात घ्या
काहीही खाताना ते किती खाल्लं गेलं पाहिजे हे सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याचदा एखादं खाणं आवडल्यानंतर आपल्याला किती खायला हवं हे आपण विसरून जातो. त्याचा स्वाद आपल्याला इतका आवडलेला असतो की, आपण गरजेपेक्षा जास्त तो पदार्थ खातो. त्यामुळे असं होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही लहान ताटाचा वापर करा आणि पदार्थ खात असताना मध्ये मध्ये पाणी प्या. त्यानंतर पाच मिनिटांनी आपल्याला अजून किती भूक आहे याचा विचार करा किंवा तुम्हाला अजूनही भूक आहे की नाही याचा विचार करा. त्यानंतरच तुम्हाला आवडलेला पदार्थ पुन्हा दुसऱ्यांदा तुमच्या ताटात तुम्ही घ्या.
7. सतत बसून काम करणं एकदम बंद
हो हे खरं आहे. जर तुम्हाला काम करताना एका जागी बसून राहायची सवय असेल तर ही सवय लागलीच मोडा. सतत एकाच जागेवर बसून राहणं ना तुमच्या वजनासाठी चांगलं आहे ना तुमच्या हृदयासाठी. त्यामुळे दर एका तासाने तुम्ही तुमच्या जागेवरून उठून निदान एक फेरी मारा. रोज नवी अॅक्टिव्हिटी करणं हे तुमच्या निरोगी शरीरासाठी योग्य आहे. एका जागी बसून राहिल्याने वजन केवळ वाढतच नाही, तर तुम्हाला लठ्ठपणादेखील येतो. हे टाळण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एका जागेवर बसून राहणं पूर्णतः बंद करा.
8. आपण काय पित आहोत याची काळजी घ्या
बऱ्याचदा फळांचा रस हा निरोगी शरीरासाठी चांगला असतो असा गैरसमज आहे. पण त्याचबरोबर या फळांमध्ये साखरेचं प्रमाणही जास्त असतं हे लोक विसरून जातात. त्यामुळेच पूर्ण दिवस खूप जास्त पाणी प्या हा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. तसंच, कोल्ड ड्रिंक्स पिणं टाळा आणि दिवसातून एकदा एक लहान ग्लास फळांचा रस पिणं हे चांगलं आहे.
9. खाण्याच्या पदार्थावर पूर्ण लक्ष केंद्रीत करावा
जेवण करताना तुमचं सर्व लक्ष हे खाण्याच्या पदार्थावर असणं गरजेचं आहे. लवकर लवकर न चावता जेवणं करणं हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. कारण याचा परिणाम तुमच्या वजन वाढण्यावर होत असतो. त्यामुळे टेबलवर बसून हळूहळू व्यवस्थित चावून जेवायला हवं आणि चालता – फिरता कधीही जेऊ नये. तुमचं लक्ष तुमच्या जेवणावर नसून इतर ठिकाणी असल्यास, अन्नपचन होत नाही. त्यामुळेच जेवताना केवळ जेवावं इतर गोष्टींवर लक्ष देऊ नये. लक्ष इतर ठिकाणी असल्यास, नक्की तुम्हाला किती भूक आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही.
10. दिवसातून पाच वेळा व्हेजिटेबल डाएट
फ्रेश असो वा फ्रोझन किंवा मग तोंडली असो, कोणतीही भाजी आणि फळं यांची न्यूट्रीशनल व्हॅल्यू अर्थात पोषकता खूप जास्त असते आणि याची एनर्जी डेन्सिटी बरीच कमी असते. तुम्ही दिवसातून पाच वेळा फळं आणि भाज्या खाल्यास, तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतात. यामुळे कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहायला मदत होते आणि शिवाय हृदयाशी निगडीत आजारही दूर राहतात.
You Might Like These:
परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल