खाणंपिण आणि नाइटलाईफ

पाक बनविण्याची सोपी पद्धत, नाही फसणार पदार्थ

Dipali Naphade  |  Nov 11, 2021
sugar syrup

घरी साखरेचा पाक बनवणं हे बऱ्याच जणांना वाटतं की सोपं काम आहे. पण पाक तयार करणं हे जरा ट्रिकी काम आहे. अगदी योग्य कन्सिन्सन्सीचा पाक बनवण्यासाठी बराच वेळ लागतो. काही वेळा पाक पातळ झाला, नीट गोड नाही झाला त्यामुळे पदार्थ फसला अशा अनेक वेळा तक्रारी आपण ऐकत असतो. विशेषतः गुलाबजाम, जिलेबी, लाडू यामध्ये पाकाचे प्रमाण योग्य नसेल तर हे पदार्थ अजिबातच नीट होत नाहीत. तुम्हालाही परफेक्ट पाक बनवायचा असेल तर काही सोप्या पद्धती आणि टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. याचा वापर केल्यास, तुमचा पाक कधीही फसणार नाही हे नक्की. वाट कसली पाहताय मग लगेच वाचा आणि तयारी लागा.  

किती साखर आणि किती पाणी?

पाक करताना सर्वात मोठी चूक होते ती म्हणजे साखर आणि पाण्याचे प्रमाण चुकीचे ठेवणे. जर तुम्ही गुलाबजाम सारखा पदार्थ बनवत असाल आणि त्याचा पाक तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्ही पाणी आणि साखरचेचे प्रमाण समसमान ठेवायला हवे आणि मग ते गॅसवर साधारण 5-7 मिनिट्स ठेऊन उकळा. याचा जो पाक तयार होतो तो योग्य ठरतो. अर्ध्या तारेचा पाक हा गुलाबजामसाठी योग्य ठरतो. त्यापेक्षा अधिक पाक उकळल्यास, गुलाबजाम नीट तयार होत नाहीत. त्यामुळे हा पाक करताना लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.  

चिक्कीसाठी पाक 

जेव्हा तुम्हाला घरच्या घरी चिक्की बनवायची असते तेव्हा त्यासाठी जाड पाकाची गरज भासते. असा पाक लाडू अथवा चिक्कीसाठी योग्य ठरतो. मात्र हा पाक दोन तारेचा नसतो. यामध्ये काही लोक चुका करतात. वास्तविक हा पाक दोन तारेपेक्षाही अधिक घट्ट असतो. पाण्यात पडल्यानंतर एखाद्या कडक बॉलप्रमाणे पाक होईल इतका घट्ट हा पाक तयार व्हावा लागतो. दोन तारेचा पाक थोडा वेळ अधिक गरम केल्यानंतर लाडू वा चिक्कीचा योग्य पाक तयार होतो. असा पाक तयार केल्यावर तुम्हाला अगदी बाजाराप्रमाणे घरी चिक्की तयार करता येईल.

पातळ पाक 

हा पाक गुलाबजामच्या पाकापेक्षाही पातळ असतो. केवळ साखर विरघळेपर्यंतच पाणी उकळवण्यात येते असा हा पाक असतो.  गाजरचा हलवा, काजू कतली, बुंदीचे लाडू, मैसूर पाक, नारळाची बर्फी यासारख्या मिठाईसाठी या पाकचा वापर करण्यात येतो. तुम्हीही घरी हे पदार्थ करणार असाल तर तुम्ही असाच पाक वापरा. 

गुळाचा पाक 

गुळाचा पाकदेखील तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता. पण तुम्ही गुळामध्ये पाण्याचा वापर कमी करावा. साधारण 2:1 असे प्रमाण गुळाचा पाक करताना वापरावे. गुळाचा पाक हा अत्यंत स्वादिष्ट असतो आणि रिफाईंड शुगरच्या पाकाच्या तुलनेत यामध्ये अधिक कन्सिन्सन्सी आढळते. तसंच हा आरोग्यासाठीही अधिक चांगला मानला जातो.

पाक कसा साठवाल?

तुम्हाला पाक कसा साठवायचा आहे याबाबत माहिती हवी असेल तर ते सोपे आहे. तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये पाक ठेवा आणि तो डबा फ्रिजमध्य ठेवा. अधिक काळ टिकतो. सिंगल तारवाला पाक कमीत कमी 3-4 आठवडे फ्रिजमध्ये टिकतो. तर घट्ट पाक असल्यासस, साधारण दोन महिने फ्रिजमध्ये टिकतो. ब्लेंडरच्या मदतीने पाक तयार केला असेल तर असा पाक 14-15 दिवसापेक्षा अधिक टिकत नाही. त्यामुळे सहसा कोल्ड प्रोसेसपेक्षा पाक हा उकळूनच बनववा. टिकण्यास अधिक सोपे होते. 

तुम्हालाही पाक बनवणे कठीण जात असेल तर तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की आम्हाला कळवा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ