DIY सौंदर्य

वापरा देशी पद्धत आणि मिळवा घनदाट केस, एका आठवड्यात होतील केस जाड

Dipali NaphadeDipali Naphade  |  Aug 11, 2021
long and thick hair

केस पातळ आणि निस्तेज असतील तर नक्कीच चांगले दिसत नाहीत. पण यासाठी तुम्ही अनेक उपाय करूनही काहीही त्याचा चांगला परिणाम होत नसेल तर तुम्ही काही देशी पद्धती वापरायला हव्यात. एका आठवड्यात तुम्हाला मजबूत आणि जाड, घनदाट केस हवे असतील तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या काही पद्धतीचा अवलंब नक्की करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स, तेलापेक्षा याचा नक्कीच योग्य परिणाम तुम्हाला केसांवर दिसून येईल आणि हे बनविण्यासाठी अर्थात तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही. केवळ 2 गोष्टींचा वापर करून तुम्हाला हे तेल तयार करायचे आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तेल ऑर्गेनिक असून याचा कोणताही दुष्परिणाम केसांवर वा त्वचेवर होत नाही. 

केसांचा पातळपणा कमी करण्यासाठी 

केसांचा पातळपणा कमी करून केस अधिक घनदाट आणि जाड बनविण्यासाठी तुम्हाला नक्कीच या मॅजिकल तेलाची आवश्यकता आहे. हे तयार करणे अत्यंत सोपे आणि त्यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिट्स लागणार असून तुम्ही 2-3 महिन्यासाठी एकदाच हे तेल तयार करून ठेऊ शकता. हे तेल तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकता आणि हे पटकन खराबही होत नाही. 

साहित्य 

तेल तयार करण्याची पद्धत 

अशा प्रकारे करा या तेलाचा वापर 

आठवड्यात दिसतो परिणाम 

कोंड्याचाही होतो निचरा 

मेथीच्या दाण्याने आणि मोहरीच्या तेलाने मिळून तयार करण्यात आलेल्या या हेअर ऑईल (hair oil) च्या वापराने तुमच्या केसातील कोंड्याचा निचरा होतो. केसांचा कोरडेपणा, पातळ केस आणि निस्तेज असल्यामुळे कोंड्याची समस्या नेहमी केसांमध्ये निर्माण होते. यामुळे डोक्याच्या त्वचेला श्वास घेणेही कठीण होते. कोंडा म्हणजे एका स्वरूपाचा फंगस असतो, जो केसांना मुळापासून कमजोर करतो. मेथी आणि मोहरीच्या तेलामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल घटक असतात, जे फंगस मारण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना अधिक मजबूती मिळते आणि केस घनदाट होण्यास फायदा होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य