केसांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी तुम्ही काय काय करता? चांगले शॅम्पू, कंडिशनर वापरता. पण काहीही केले तरी काही ठराविक काळासाठी तुमचे केस चांगले राहतात आणि नंतर पुन्हा जैसे थे होतात? खूप जणांना केसगळतीची समस्या असते. काही जणांचे केस अकाली पांढरे होतात. तर काही जणांचे केस हे फारच चिकट असतात. चिकट केसांची ही समस्या अनेकांना नक्कीच जाणवत असेल. केस कितीही जाड, शायनी आणि छान असतील. पण ते चिकट (Greasy Hair) होत असतील तर अशा केसांच्या अनेक समस्या वाढतात. केस असे सतत चिकट होत असतील तर तुमही कुठेतरी चूक करताय हे नक्की. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कसे कमी पडताय चला घेऊया जाणून
अधिक वाचा: केवळ पोटासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे ओवा
केसांचा चिकटपणा का वाढतो?
केसांचा चिकटपणा वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तुम्ही खालीलपैकी कोणती चूक करता ते लक्षात घेऊन त्यानुसार काही सोपे उपाय नक्कीच करता येतात. चला जाणून घेऊया केसांची काळजी घेताना तुम्ही नेमक्या कोणत्या चुका करता ते
- दर दोन दिवसांनी केस न धुणे: खूप जणांना केस धुवायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे केसांच्या पोअर्समध्ये तेल झिरपत राहते. जे स्काल्पवर हळुहळू पसरते. ज्यामुळे केस खूप चिकट होतात.
- कंडिशनरचा अतिरेक : शॅम्पूनंतर कंडिशनर हे अगदी वापरायलाच हवे. पण काही जण कंडिशनर खूप जास्त लावतात. कंडिशनर लावल्यानंतर ते केसांवर जास्त काळासाठी ठेवले तरी देखील केस लवकर चिकट होतात.
- केस सतत विंचरणे: केस विंचरणे हे केसांसाठी चांगले असते. पण काही जण केस इतक्या वेळा विंचारतात की, त्यामुळे केसांमध्ये घर्षण तयार होते आणि त्यामुळे केस तेलकट होऊ लागतात.
या काही बाह्य कारणांमुळे केसांचा तेलकटपणा वाढतो. पण या सोबतच काही अंतर्गत कारणे आहेत ज्यामुळे केसांचा तेलकटपणा वाढू शकतो. चला जाणून घेऊया ही काही कारणे
- आहार हा देखील केस चिकट होण्यासाठी कारणीभूत असतो. जर तुमच्या आहारात खूप मोठ्या प्रमाणात तेलकट पदार्थ असतील तर शरीरातील सीबमचे प्रमाण वाढते. आपल्या त्वचेखाली सीबम असते जे योग्य प्रमाणात असेल तर त्वचा चमकदार दिसते. पण त्याचे प्रमाण अधिक वाढले तर स्काल्प तेलकट होते. ज्यामुळे कोंडा होण्याची शक्यता असते.
- तेलकट पदार्थच नाही जर तुम्ही दह्याचे सेवनही अति करत असाल तरी देखील तुमच्या केसांना असा तेलकटपणा येऊ शकतो. दह्याचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात असायला हवे. नाहीतर केसांमध्ये तेलकटपणा वाढू शकतो.
- आहारात जर अतिप्रमाणात चिकन, अंडी यांचा समावेश असेल तरी देखील शरीरात सीबमचे प्रमाण वाढते त्यामुळे या गोष्टीही आहारात प्रमाणात घ्यायला हव्यात.
- साखर ही देखील आरोग्यासाठी फारशी चांगली नाही. जर तुम्ही साखरेचे अति प्रमाणता सेवन केले तरी देखील केस मोठ्या प्रमाणात चिकट होऊ शकतात.
या काही गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे केसांची काळजी घेतली तर केस चिकट होणार नाही. केसांसाठी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही गोष्टी कारणीभूत असतात.