सोशल मीडियावर वेगवेगळे आणि विचित्र असे ट्रेंड येत असतात. यात मेकअपशी संबधित अनेक असे हॅक असतात जे कदाचित योग्य पद्धतीने काम करतात किंवा काही हॅक असे असतात जे कितीही ट्राय केले तरी देखील चालत नाही. सध्या नया है वह…. असाच एक ट्रेंड दिसत आहे. सगळीकडे त्याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे तो म्हणजे हिना किंवा मेंदी ऑन लिप ट्रिक. तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर ही ट्रिक खास अशांसाठी आहे ज्यांना लिपस्टिक लावण्याचा सतत कंटाळा येतो. शिवाय ज्यांना लाँग लास्टिंग अशी लिपस्टिक हवी असेल तर अशांसाठीही ती एकदम परफेक्ट अशी गोष्ट आहे. चला जाणून घेऊया हा ट्रेंड नेमका आहे तरी काय?
हिना ऑन लिप
मेंदीचा कोन आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. काही खास प्रसंग असेल तर आपण मेंदी अगदी आवर्जून काढतो. मेंदीचा रंग जसा चढतो तशी ती काळी काळी होत जाते. आता हीच मेंदी तुम्ही कधी ओठांवर लावून पाहिली आहे का? नक्कीच नसेल हो ना?
तर ही ट्रिक अशी आहे की, तुम्हाला मेंदीचा कोन घ्यायाचा आहे. आता ओठ स्वच्छ करुन तुम्हाला त्यावर ओठांच्या आकारावर मेंदी लावायची आहे.
हे करताना तुम्हाला ओठांच्या कडांची काळजी घ्यायची आहे. कारण तुम्ही थोड्या जास्त वेळासाठी ही मेंदी ठेवली तर तुमच्या ओठांवर त्याचा डाग राहू शकतो. त्यामुळे याची काळजी घ्यायला हवी.
साधारण मेंदी थोडीशा वाळली की ती लगेच काढून टाकायची आहे. याचे कारण असे की, नाहीतर मेंदीचा रंग हा जास्त गडद होऊ शकतो.
ही ट्रिक करताना घ्या ही काळजी
मेंदी ही कितीही थंड असली आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम नसला तरी हल्ली मिळणाऱ्या मेंदीमध्ये गडद रंग येण्यासाठी काही केमिकल्सचा उपयोग केला जातो. त्यामुळे होते असे की, तुमच्या तोंडावाटे ते आत गेले तर त्याचा त्रास होऊ शकतो.
शिवाय मेंदी जास्त वेळासाठी तुम्ही लावून ठेवू नका. याचे कारण असे की, त्यामुळेही तुमच्या ओठांचा रंग काळा पडू शकतो. त्यामुळे या गोष्टीचा विचारही तुम्ही करायला हवा.
प्रत्येकाच्या ओठांचा रंग वेगळा असतो. तुमच्या ओठांवर मेंदीचा रंग अगदी तसाच येईल असे सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजीही तुम्ही घ्यायला हवी.
त्यामुळे ही ट्रिक ट्राय करताना तुम्ही विचार करायला हवा.