Recipes

तुम्ही करुन पाहिली का Dalgona Coffee, अरे मग आजच करुन पाहा

Leenal Gawade  |  Mar 31, 2020
तुम्ही करुन पाहिली का Dalgona Coffee, अरे मग आजच करुन पाहा

सध्या घरी बसून वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा सगळ्यांना जणू छंदच लागला आहे. कोणी साडीचा फोटो पोस्ट करण्याचे चॅलेंज काय देतयं. कोणी मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता काय करतयं. घरी बसून काहीतरी उद्योग हवा ना! म्हणूनच या सगळ्या गोष्टी सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यातच एक ट्रेंड सध्या व्हायरल होताना दिसत आहे तो म्हणजे Dalgona Coffee बनवण्याचा. आता या कॉफीच्या नावावरुन फार काही गोंधळून जाऊ नका. पण घरी तुमचा वेळ जात नसेल तर मात्र तुम्ही ही वेळ काढू कॉफी नक्की करुन पाहा.

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

काय आहे ही Dalgona Coffee

Instagram

साऊथ कोरियामधून या कॉफीचा ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. फक्त तीन साहित्याचा वापर करुन ही कॉफी बनवली जाते. या कॉफीचे वैशिष्ट्य असे की, ही कॉफी कोल्ड कॉफीचा प्रकार असून यावर तुम्हाला साधारण एक बोट इतका फेस असतो. ही कॉफी इतर कॉफीच्या तुलनेत फारच चविष्ट लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. ही कॉफी

प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…

कशी कराल तुमची Dalgona coffee तयार

Instagram

आता आपण बघुया ही कॉफी कशी बनवायची ते  यासाठी लागणारे साहित्य पाहुया. 

साहित्य: कोणतीही इन्स्टंट कॉफी, साखर आणि कोमट पाणी,एखादे बीटर किंवा कॉफी ब्लेंडर 

कृती: Dalgona Coffee ही तुम्हाला खूप ब्लेंड करावी लागते. म्हणजे याला फेस काढावा लागतो. 

यासाठी एक मोठं भांड घ्या. एका भांड्यात दोन चमचे कॉफी घेऊन त्यात दोन चमचे साखर घाला. साधारण चार चमचे कोमट पाणी घालून कॉफीचा रंग बदलेपर्यंत छान फेटून घ्या. आधी चॉकलेटी दिसणारी कॉफी छान फेटली की, तिचा रंग बदलतो आणि फिक्कट चॉकलेटी होतो. ज्या प्रमाणे केकसाठी आपण क्रिम फेटतो अगदी तशीच मेहनत इथे लागते. 

छान फेटून झाल्यानंतर तुम्ही एका दुसऱ्या ग्लासमध्ये अर्ध्यापेक्षा थोडे जास्त दूध घेऊन त्यात छान बर्फ घाला. आणि आता वेळ आली आहे ती म्हणजे तुम्ही केलेला कॉफी फ्लोट घालण्याची एका चमच्याच्या मदतीने कॉफीचा फ्लोट दूधावर टाका. चमचा घेऊन हळूहळू तुम्हाला हा फ्लोट मिक्स करायचे आहे. खूप वेळ ढवळू नका. तुम्ही तयार केलेला हा फ्लोट छान वर दिसायला हवा. 

तुमची Dalgona coffee तयार 

निवांत वेळात करण्यासारखी कॉफी

कॉफी करण्याची ही पद्धत काही नवी नाही अशा प्रकारे आपण कॉफी अनेकदा प्यायली असेल. पण सध्या आपल्या सगळ्यांना इतका वेळ आहे की, तो वेळ कसा घालवायचा कळत नाही. शिवाय तुम्ही जर बाहेरची मस्त कॅपेचिनो मिस करत असाल तर तुम्ही थोडासा वेळ काढून मस्त ही कॉफी करा. घरातल्यांनाही द्या

आणि हो ही कॉफी बनवली असेल तर तिचा एक फोटो काढून  ती कॉफी बनवायला विसरु नका. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा –

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास

Read More From Recipes