Sex Advice

जोडीदारासोबत खूप दिवसांनी सेक्स करत असाल तर अशी करा सुरुवात

Leenal Gawade  |  Jul 30, 2020
जोडीदारासोबत खूप दिवसांनी सेक्स करत असाल तर अशी करा सुरुवात

मनात आले आणि सेक्स केले असे फक्त पॉर्न फिल्ममध्ये कितीही दाखवले आणि सेक्सच्या कल्पना रंगवल्या तरी खऱ्या आयुष्यात असे बहुतांशवेळी होत नाही. आभासी दुनियेत आपण सेक्सच्या कितीही कल्पना रंगवत असलो तरी प्रत्यक्ष जोडीदारासोबत सेक्स करताना आपण त्याच्या मनाचाही विचार करतो. तिला किंवा त्याला ही गोष्ट आवडेल की नाही…वगैरे अनेक प्रश्न त्यावेळी आपल्या मनात असतात. अनेकदा जबाबदाऱ्यांमुळे किंवा इतर काही कारणांमुळेही शारिरीक दृष्ट्या जोडपी एकमेकांपासून दुरावली जातात.त्यांच्या आयुष्यात आलेल्या इतर गोष्टींमुळे त्यांना त्यांच्या स्वत:चा असा वेळ मिळत नाही. पण याचा अर्थ प्रेम संपला असे नाही. जोडीदारांमध्ये निर्माण झालेले ‘अंतर’ हे यासाठी कारणीभूत असते. तुमच्यासोबतही असेच काहीसे होत असेल आणि खूप दिवसांनी जोडीदारासोबत सेक्स एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत हव्यात. सेक्स विषयी कसे बोलावे त्याची सुरुवात कशी करावी हेच आज आपण जाणून घेऊया

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

संवाद साधा

सेक्सबद्दल बोलण्यास लाज वाटत असेल किंवा मनात उगाचच धुकधुक होत असेल तर याचा अर्थ जोडीदारापासून तुम्ही शारिरीक दृष्ट्या दुरावला  तर आहातच पण तुमच्यातील संवादही संपला आहे . एकमेकांची मन जुळतात त्याचवेळी प्रेम होते. तुम्ही आता एकत्र आहात याचा दुवा प्रेम आहे. याच प्रेमाचा आधार घेत जोडीदाराशी संवाद साधा. कोणत्याही कारणामुळे तुमच्यातील संवाद संपला असेल तर तो पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करा. घरात एकत्र राहतो याचा अर्थ प्रेम आहे असे होत नाही. ते प्रेम निभावण्यासाठी आता जोडीदाराच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संवाद साधा. पुन्हा एकदा गाडी रुळावर आली की, तुम्हाला सेक्ससाठी विचारणे किंवा सेक्स करणे शक्य होईल. त्याचा आनंदही तुम्हाला घेता येईल. 

मनातील अढी दूर करा

काही जोडपी अचानक एकमेकांपासून शारिरीकरित्या दूर होतात. या मागे अनेक कारणं असू शकतात. लग्नानंतरचा काही काळ हा जरी खूप आनंददायी वाटत असला तरी कालांतराने जबाबदाऱ्या येतात. तुमच्या आणि जोडीदाराच्या स्वभावात अनेक बदल होत जातात. अनेकदा परिस्थिती या सगळ्यासाठी कारणीभूत असते. अनेकदा मनात जोडीदाराबद्दरल नाहक काही गोष्टी येतात. यालाच आपण अढी निर्माण होणे असे म्हणतो. ही अढी इतर नात्यात निर्माण झाली तरी माणसे मनाने दूर होतात. प्रेमाच्या नात्यात ही अढी निर्माण झाली की, आधी मन दुरावतात त्यासोबत शारिरीक सुखही. त्यामुळे मनातील अढी काढा बदलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. 

पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले

थोडा वेळ द्या

Instagram

तुम्ही संवाद साधाल, मनातील अढी दूर कराल. याचा अर्थ तुम्ही जोडीदाराशी सेक्सबद्दल बोलू शकाल असे नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला वेळ देणेही गरजेचे आहे. कामांच्या व्यापामध्ये आणि जबाबदारीच्या तणावाखाली जर एकमेकांना वेळ देण्यापेक्षा नुसत्या जबाबदाऱ्या पार पाडणे अशी तुमची दिनचर्या असेल तर तुम्ही आयुष्याचा सुवर्ण काळ घालवत आहात. तुमच्या सेक्स लाईफचा खरा अडथळा हा वेळ देणे ही गोष्ट आहे. वरील सगळ्या गोष्टी करत तुम्ही जोडीदाराला पुन्हा वेळ दिला तर तुम्ही योग्य पद्धतीने पुन्हा एकदा जोडीदारासोबत सेक्सचा आनंद घेऊ शकता. 

या काही गोष्टी करुन तुम्ही तुमचे सेक्सलाईफ पूर्ववत करु शकता. थोडा वेळ नक्कीच लागेल. पण तुम्हाला तुमचे प्रेम आणि सेक्सलाईफ परत मिळेल.

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

Read More From Sex Advice