Fitness

तूप खाण्याचे फायदे जाणून घ्या (Tup Khanyache Fayde)

Dipali Naphade  |  Jul 31, 2020
तूप खाण्याचे फायदे

वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या  पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. तूप म्हणजे आहारातील महत्त्वाचा भागच आहे. तूप म्हणजे नक्की काय? (What is ghee?) असा प्रश्न सहसा कोणाला नक्कीच मनात येणार नाही. कारण  प्रत्येक भारतीय घरात तुम्हाला तूप तर दिसणारच. डालडा आणि साजूक तूप या दोन्हीमध्ये खूपच फरक आहे. गावठी तूप अर्थात आपण जे घरी गाय अथवा म्हशीचे दूध तापवून लोणी कढवून तयार करतो ते तूप.  याबाबतच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना वाटतं की, तूप खाल्ल्याने वजन अथवा चरबी वाढते. मात्र असं काहीही नाही. मुळात वजन अथवा चरबी ही तुपामुळे नाही तर तेलामुळे वाढते हे तुम्ही मनात पक्कं करून घ्या.  तुम्ही रोज दिवसभरातून एक ते दोन चमचा तूप खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं (tup khanyache fayde). सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्वचेसाठी तर याचा अप्रतिम फायदा मिळतो. नक्की या तुपाचे फायदे (ghee benefits in marathi) काय काय आहेत ते जाणून घेऊया.

तुपामधील पोषक तत्वे (Nutritional Value Of Ghee)

Nutritional value of ghee

शरीराला फायदेशीर ठरणारी अनेक पोषक तत्वे तुपामध्ये असतात. यामध्ये साधारण 900 ग्रॅम कॅलरी असून सर्वात जास्त ऊर्जा यातून मिळते. 3766 किलोजूल इतकी ऊर्जा तुपामध्ये आढळते. तर विटामिन ए चा देखील अप्रतिम स्त्रोत तुपामधून मिळतो. तुपामुळे एनर्जी दिवसभर राहाते अर्थात शरीराला ऊर्जा मिळते. तसंच दिवसभरात तुम्ही जेव्हा एक चमचा तूप खाता तेव्हा शरीरातील एनर्जी अर्थात ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. 

तूप खाण्याचे फायदे (Ghee Benefits In Marathi)

तूप खाण्याचे फायदे (tup khanyache fayde) अनेक आहेत. विशेषतः आरोग्यासाठी तुपाचे फायदे होतात. नक्की कसे आणि कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेऊया. 

हृदय निरोगी राखण्यासाठी (For Heart)

tup khanyache fayde

असे म्हटले जाते की रक्तातील हानिकारक कोलेस्ट्रॉलच्या अधिक प्रमाणामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉल बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) नुसार, तूप कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय निरोगी राखण्यास मदत मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये तुम्ही तूप मिसळून त्याचा वापर केल्यास, अँटिऑक्सिडंट्सचा प्रभाव चांगला दिसून येतो, जो शरीराला त्रासदायक ठरणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो.

कॅन्सर रोखण्यासाठी तुपाचे फायदे (Cancer)

कॅन्सर होऊ नये यासाठी तुपाचे सेवन करण्यात येते. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉल बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) च्या संकेतस्थळावर दिलेल्या एका शोधानुसार, तुपामध्ये कार्सिनोजन नावाचा घटक असतो ज्यामुळे कॅन्सरचा परिणाम कमी होतो. तसंच कॅन्सर वाढण्यासाठी जो ट्युमर निर्माण होतो त्याला रोखण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो. याशिवाय तुपात असणारे लिनोलिक अॅसिड कोलनदेखील कॅन्सरपासून वाचविण्यासाठी मदत करते. तसंच लक्षात ठेवा की, कॅन्सर हा अत्यंत घातक असा आजार आहे. त्यासाठी योग्य उपचाराची आवश्यकता आहे. केवळ घरगुती उपचाराने हा आजार बरा होत नाही. त्यामुळे तूप हा त्यावरील उपचार नाही. कॅन्सर झाला असेल तर तुपाचे सेवन किती प्रमाणात करायचे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विचारून घ्या.

वजन कमी करण्यासाठी तुपाचे फायदे (To Lose Weight)

weight loss

तुपाने अजिबात वजन वाढत नाही. मात्र तूप योग्य प्रमाणात खायला हवे. वजन कमी करायचे असेल तर तूप खाऊन वजनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे. तूप खाण्याचे फायदे (tup khanyache fayde) आहेतच. एका शोधानुसार, ऑक्सिडाईज तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ऑलिक अॅसिडचे प्रमाण असते. हे दोन्ही घटक वजन वाढण्यापासून रोखतात आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठीही याची मदत मिळते. सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड जे शॉर्ट चेन फॅटी अॅसिड आहे ते चरबी जाळायला मदत करते. विशेषतः शरीरातील अधिक चरबी असणाऱ्या ठिकाणी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याशिवाय तूप हे पचनक्रिया योग्य करण्यासाठीही उपयुक्त ठरते. तुपामुळे पोटातील अॅसिडचा स्राव वाढतो आणि पचनक्रिया हळू होऊन वजन कमी करण्यास त्याचा फायदा मिळतो. तसंच आपल्या नियमित आहारात तुपाचा समावेश असायला हवा असे डॉक्टरही सांगतात. यामुळे मेटोबॉलिजम चांगले होते आणि रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित राहिल्याने मधुमेही व्यक्तींनाही याचा फायदा मिळतो. दुपारच्या जेवणात नक्की तुपाचा समावेश करून घ्यायला हवा. यामुळे शरीर निरोगी राहते. 

पचनक्रियेसाठी उपयुक्त (Digestion) 

आयुर्वेदानुसार, तूप हे पचण्यासाठी अत्यंत सोपे असते. जेवण बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य तेलांच्या तुलनेत तूप हलके असते. विशेषतः गायीचे तूप हे पचनासाठी अत्यंत सहज आणि सोपे असते. त्यामुळे गरोदर असणाऱ्या महिलांना पहिल्या काही महिन्यात होणारे बद्धकोष्ठ आणि उलटीच्या समस्येपासून सुटका देण्यासाठी जेवणात तुपाचा समावेश करा. जेणेकरून जेवण योग्यरित्या पचते आणि त्रासही होत नाही. तूप खाण्याचे फायदे (tup khanyache fayde) पचनक्रियेसाठी नक्कीच चांगले होतात.

प्रतिकारशक्ती वाढण्यास मिळते मदत (Immune Power)

निरोगी राहण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढणे अत्यंत गरजेचे आहे. आजारी पडणाऱ्या लोकांसाठी तूप नक्कीच फायदेशीर ठरते. तुपामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. वास्तविक तुपामध्ये कंजगेटेड लिनोलेनिक अॅसिडचे गुण आढळतात. हे अॅसिड रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत तर करतेच त्याशिवाय शरीरातील थकवा घालविण्यासही मदत करते. तसंच तूप हे एखाद्या ल्युब्रिकंटप्रमाणे शरीरात काम करते आणि स्पाईनची स्थिरता आणि ताकद मिळवून देते. 

हाडांच्या मजबूतीसाठी (Bones)

वय वाढते तसे हाडांची मजबूती कमी होत जाते. वयानुसार हाडेल जोडण्यास नक्कीच त्रासदायक ठरते. शरीरातील विटामिन के च्या कमतरतेमुळे हा त्रास अधिक होतो. म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या तुपामध्ये विटामिन के चे प्रमाण आढळते, जे हाडांना मजबूती देण्याचे आणि हाडे अधिक विकसित करण्याचे काम करते. म्हशीचे तूप खाण्याचे फायदे (tup khanyache fayde) हाडांना मिळतात. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी (Cholesterol)

रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या, रक्तदाबा आणि अन्य आजारांनाही सामोरे जावे लागते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात नियमित तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तुपामध्ये असणारे कंजगेटेड लिनोलेनिक अॅसिड यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिएथेरोजेनिक गुण अधिक आहेत. त्यामुळे रक्तातील हानिकार कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम हे करते. तसंच लाभदायक कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्यास याची मदत होते. 

अलर्जीवर गुणकारी (For Allergy) 

तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल त्यावर तूप गुणकारी आहे. तुम्ही नियमित नाकातून काही थेंब घातल्यास, तुम्हाला असणारी अलर्जी कमी होईल. इतकंच नाही तर तुमचे अनेक आजार यामुळे बरे होतील. त्याशिवाय तुम्हाला केसगळती किंवा केसांच्या बाबतीत काही समस्या असतील तर या उपायाने त्या समस्याही दूर होतील. मुळात तुम्हाला तूप नियमित नाकातून शरीरात गेल्यास मायग्रेन अथवा डोकेदुखीसारख्या आजारातूनही सुटका मिळते. नाकात तूप टाकण्याचे फायदे खूप आहेत.

शौचाची समस्या असल्यास, होते सुटका (Constipation)

बऱ्याच जणांना शौचाला जाण्यास त्रास होतो. पोट साफ होत नाही.  यावर तूप हा उत्तम उपचार आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप मिक्स करा आणि ते प्या. यामुळे सकाळी तुम्हाला शौचाला साफ होईल अर्थात तुमचे पोट साफ होईल आणि त्याशिवाय मूळव्याधीचा त्रास असेल तर तोही संपेल. मुत्रविकार असतील तर जेवणाच्या आधी एक चमचा आणि जेवणानंतर एक चमचा तूप खावे. लवकरच हा विकार बरा होतो. तूप खाल्ल्याने पोटात जर गॅसचा जरी त्रास होत असेल तर तो दूर होण्यास मदत मिळते. जुलाब होत असतील तरीही त्यावर तूप अत्यंत गुणकारी आहे. तूप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो. 

गरोदरपणात तुपाचे फायदे (During Pregnancy)

eating ghee during pregnancy

तुपामध्ये असे अनेक औषधीय गुण आहेत ज्याचे सेवन केल्याने गर्भवती महिला आणि बाळाला तुपाचे फायदे मिळतात. तुपामध्ये तुम्ही 1 चमचा शिंगाडा पावडर आणि कोमट दूध मिक्स करून प्यायलात तर प्लेसेंटा (placenta) अर्थात नाळ व्यवस्थित राहते. भात आणि दह्यासह तुपाचे सेवन केल्यास, भ्रूणाचे हृदय व्यवस्थित राहाते. गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात गाईचे तूप हे भ्रूणाच्या मेंदूच्या विकासासाठी उपयोगी ठरते. गाईच्या तुपापासून भाजलेले गार्डन क्रेस सीड बी हे दूध आणि साखरेसह मिक्स करून खाल्ल्याने गर्भावस्थेदरम्याने महिलांना अॅनिमिया आणि अन्य आजारांपासून दूर राखण्यास फायदेशीर ठरते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तूप हे फॅट सॉल्युबल विटामिन्सचा चांगला स्रोत आहे. तुपामध्ये आढळणारे विटामिन डी हे थायरॉईडच्या ग्रंथी नियंत्रणात आणण्यास मदत करतात, जे गरोदरपणाच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. 

चमकदार त्वचेसाठी उपयुक्त (For Skin)

ghee benefits for skin

तूप खाल्ल्याने तुमची त्वचा अतिशय तजेलदार राहाते. चमकदार त्वचेसाठीही तुपाचा उपयोग होतो. पोट साफ झाल्याने कोणत्याही प्रकारची घाण त्वचेत साठून राहात नाही. तसंच तुम्हाला सतत ओठ फुटण्याचा त्रास असेल तर तुम्ही ओठांना तूप लावा. तूप लावल्याने ओठ अतिशय मऊ आणि मुलायम होतात. तसंच त्वचेवर कोणत्याही प्रकारची सूज आली असेल अथवा जखम झाली असेल तर तूप त्यावर औषध म्हणून काम करते. त्याशिवाय तुपात आयुर्वेदिक गुण आढळतात जे त्वचेचा कोरडेपणा, लालपणा आणि त्वचेवर आलेली खाज कमी करण्यास मदत करतात.

डोळ्यांसाठीही तूप उपयुक्त (For Eyes)

तुपामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये विटामिन ए आढळते. विटामिन ए हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. तुपाच्या सेवनाने विटामिन ए योग्य प्रमाणात डोळ्यांना मिळते आणि डोळ्यांचे दोष दूर होण्यासाठी याची मदत होते. 

तूप कसे वापरावे (How To Use)

ghee benefits

घरच्या घरी कसे बनवाल तूप (How To Make Ghee At Home) 

तसं तर बाजारात तयार तूप मिळतंच. पण घरी तूप बनविण्याचा स्वादही वेगळाच आणि अप्रतिम असतो. घरच्या घरी कसे तूप बनवायचे याची कृती घ्या जाणून – 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. तूप जास्त काळ कसे टिकवायचे?

तूप जास्त काळ टिकविण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. एका बाटलीत व्यवस्थित भरून तुम्ही अति गरम अथवा अति थंड नसणाऱ्या जागी ठेवा. तीन महिन्यापर्यंत साधारण तूप खराब होत नाही. रवाळ तूप हवे असेल तर बाहेरच ठेवा. फ्रिजमध्ये ठेऊ नका. फ्रिजमध्ये ठेवलेले तूप साधारण एक वर्ष टिकते. 

2. तुपामुळे काही नुकसान होतं का?

प्रमाणापेक्षा अधिक तूप खाल्ले तर अपचनाची समस्या उद्भवते. तसंच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे हृदयासंबंधी समस्या उद्भवते. 

3. जखम भरण्यासाठी तुपाचा कसा उपयोग होतो?

तुपामध्ये बॅक्टेरिया कमी करणारे हिलिंग गुण आढळतात. यामुळे जखम भरण्यासाठी याचा उपयोग होतो. मधात मिक्स करून तूप जमखमेवर लावल्यास, सूज कमी होते आणि जखम बरी होण्यास मदत मिळते. 

Read More From Fitness