ADVERTISEMENT
home / आरोग्य
गरोदरपणात तूप खाण्याचे काय होतात फायदे

गरोदरपणात तूप खाण्याचे काय होतात फायदे

अनेकांच्या घरात तुपाचा वापर स्वयंपाक घरात अगदी मुक्त हस्ते होत असतो. कारण खाद्यतेल अथवा बाजारात मिळणाऱ्या बटरपेक्षा साजूक तूप आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. घरीच तयार केलेलं हे साजूक तूप खाण्यामुळे शरीराला आवश्यक फॅट्स नक्कीच मिळू शकतात. एवढंच नाही जर अनुभवी महिला घरातील गरोदर स्त्रीलादेखील तूप खाण्याचा सल्ला देतात. असं मानलं जातं की तूप खाण्यामुळे स्त्रीला प्रसूती कष्ट कमी होतात. यासाठी जाणून घेऊ या गरोदर महिलांनी किती प्रमाणात तूप खाणं फायदे योग्य आहे.

गर्भावर तूप खाण्याचा काय परिणाम होतो –

गरोदरपणात तूप खाण्यामुळे महिलांना मूडस्वींगचा त्रास कमी होतो. दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटू लागते. वारंवार होणारा अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी गरोदर महिलांच्या आहारात तूपाचा वापर असणे गरजेचं आहे. शिवाय गरोदरपणात सतत जाणवणारा ताणतणाव यामुळे कमी होऊ शकतो. कारण दररोज तूप खाण्यामुळे गर्भवती महिलांच्या शरीराला आराम मिळतो आणि चांगले हॉर्मोन्स निर्माण होण्यास मदत होते. ज्याचा परिणाम त्या सतत आनंदी आणि फ्रेश दिसू शकतात. शिवाय याचा तुमच्या गर्भातील बाळाच्या वाढीवरदेखील चांगला परिणाम होतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत गरोदर महिलांच्या शरीराला अधिक कॅलरिजची गरज असते. तूपामुळे या कॅलरिज शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतात. शिवाय यामुळे बाळ आणि मातेचे पोषणदेखील योग्य प्रकारे होऊ शकते. 

shutterstock

ADVERTISEMENT

गरोदर महिलांनी तूप खाणे योग्य की अयोग्य

गरोदर महिलांनी योग्य प्रमाणात तूप खाण्यास काहीच हरकत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमीच त्रासदायक असतो. म्हणूनच फायदेशीर असलं तरी तूपाचा वापर आहारात नेहमीच योग्य प्रमाणात असावा. गरोदर महिलांसाठी तूपापासून तयार केलेले पदार्थ फायदेशीर असतात. कारण तूप पचायला हलकं असतं. शिवाय यामुळे गरोदर महिलांचे मेटाबॉलिझम सुरळीत राहाते. गरोदर महिलांसाठी बाजारातील बटर, मस्का यांच्यापेक्षा घरी तयार केलेलं साजूक तूप खाणं नेहमीच चांगले राहील. मात्र जर तुमचे वजन गरोदरपणाच्या आधीपासूनच जास्त असेल तर मात्र तूपाचा वापर कमीच करावा. कारण त्यामुळे तुमचे वजन अधिक वाढेल आणि त्यासोबत गरोदरपणातील समस्यादेखील वाढू लागतील. 

shutterstock

गरोदरपणात महिलांनी किती प्रमाणात तूप खावे –

आयुर्वेदानुसार एक कप गरम दूधात, केसर, मध, हळद आणि एक चमचा शूद्ध साजूक तूप एकत्र करून घेतल्याममुळे गरोदर महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय यामुळे तुमच्या गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास चांगला होतो. तूप खाण्यामुळे गरोदर महिलांची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते. गर्भवती महिलांसाठी तूप खूप फायदेशीर आहे. यासाठी गरोदर महिलांनी भात, पोळी, लाडू, खीर अशा गोष्टींमधून साजूक तूप खावे. गरोदरपणी महिलांनी सामान्यपणे दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन चमचे तूप खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात तूप खाण्यामुळे तुमच्या शरीरातील फॅटचे प्रमाण वाढू शकते. या काळात तूपाचे प्रमाण किती असावे हे तुमच्या शरीरप्रकृतीवर अवलंबून आहे. यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीनुसार तुम्ही किती तूप रोज खाऊ शकता हे तुमच्या डॉक्टरांकडून समजून घ्या.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. अधिक वाचा –

तुपाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Health Benefits Of Ghee In Marathi)

ADVERTISEMENT

केसांना तूप लावल्याने होतात ‘अफलातून’ फायदे

शुद्ध तुपाची ओळख करणे जाते कठीण, मग असे ओळखा शुद्ध ‘तूप’

27 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT