Fitness

‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता

Harshada Shirsekar  |  Dec 5, 2019
‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता

ओमकार साधनेचे असंख्य मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. तुम्ही जर नियमित ओमकार साधना केली तर शरीरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आपल्या शरीराला तणावमुक्त ठेवण्याचं काम करते. ओम हा शब्द तीन अक्षरांनी तयार झाला आहे, ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ ।
‘अ’चा अर्थ उत्पन्न होणं
‘उ’चा अर्थ विकास होणे
‘म्’चा अर्थ मौन धारण करणे
ओम हे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आणि सृष्टीचे द्योतक आहे. ओमकार उच्चारणामुळे असंख्य शारीरिक फायदे आपल्याला मिळतात. जाणून घेऊया ‘ओम’साधनेचे आरोग्यवर्धक फायदे आणि उच्चारणाचे मार्ग

(वाचा : ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहात, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष)

‘ओम’चे उच्चारण कसे करावे?

पहाटेच्या विधी उरकल्यानंतर ओंकार साधना करावी. ओंकार साधना करताना पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासनात बसून करावी. आपल्या वेळेनुसार याचे उच्चारण 5, 7, 10, 21 वेळा करू शकता. ओमकार हळू किंवा मोठ्यानं बोलू शकता. पण अगदीच ओरडून याचा जप करायचा नाही. कारण यामुळे कोणतेही शारीरिक फायदे होत नाहीत.

(वाचा : गाढ झोप हवी आहे का, रात्री ‘या’ 5 अन्नपदार्थांचं करा सेवन)

‘ओम’चे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे

1. थायराॅइड 
ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपने निर्माण होतात. याचा थायरॉड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.

2. भीती कमी होते 
तुमचे मन आणि आत्मा पूर्णतः शांत करण्याचं काम ओम करतं. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा तुम्ही चिंताग्रस्त असाल तर यावर ओमकार साधनेहून अन्य कोणताही उत्तम उपाय नाही.

3. ताणतणावापासून मुक्तता
शरीरातील विषारी तत्त्व दूर करण्यासाठी, म्हणजेच तणावामुळे शरीरात तयार होणारी द्रव्ये ओम उच्चारणामुळे नियंत्रित होतात.

(वाचा : सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग ‘हा’ आजार घेईल तुमचा जीव)

4. रक्तप्रवाह सुधारतो
ओम उच्चारणामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारत तसंच यामध्ये समतोल देखील राखला जातो. उच्च आणि कमी रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.

5. पचनप्रकिया सुधारते
ओम उच्चारणाचे फायदे केवळ मानसिक आरोग्यापर्यंतच मर्यादित नाहीत. तर शरीराच्या आतील विशेषतः पचनप्रक्रियेवरही याचा सकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे पचनक्रिया उत्तम प्रकारे सुरू राहते.

6. ऊर्जा मिळते
ओमकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदित राहता. परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

7. थकव्यातून सुटका
कोणत्या प्रकारचे काम केल्यानंतर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर यावर ‘ओम’ हा रामबाण उपाय आहे. काही वेळासाठी डोळे बंद करून शांतपणे ओमकार साधना करावी यामुळे तुम्हाला तणावातून मुक्तता मिळेल.

8.शांत झोप मिळते
रात्रीची पुरेशी झोप न मिळाल्यानं संपूर्ण दिवसाचं गणित बिघडतं. यामुळे असंख्य आजार होण्याची भीती असते. शांत झोपेसाठी तुम्ही ओमकार साधना करावी. झोपे येईपर्यंत मनामध्ये ओमकाराचा जप करावा, काही वेळानं आपोआप तुम्हाला नक्कीच शांत झोप येईल.

9. फुफ्फुस
तुमचे फुफ्फुस कमकुवत असल्यास काही विशेष प्रकारचे प्राणायाम करावेत.

10. पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते
योग्य पद्धतीनं ओम उच्चार केल्यास संपूर्ण शरीरात कंपने तयार होतात. या कंपनांचा पाठीच्या कण्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यांची क्षमता अधिक वाढते.

11. श्वसनाचा त्रास कमी होतो
ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, त्यांनी नियमित ओमकार साधना करावी. हे अधिक फायद्याचं ठरेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness