भारतीय खाद्यपदार्थांमध्ये निरनिराळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांच्या वापरामुळे खाद्यपदार्थांना विशिष्ठ चव येते. भाजीच्या वाटणात आणि फोडणीसाठी वापरण्यात येणारे हे मसाले खाद्यपदार्थांना रूचकर करतात. ज्यामुळे प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात या गरम मसाल्यांना विशिष्ठ स्थान असते. एवढंच नाही तर या मसाल्यांचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. तुमच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचा डब्यातील हळद, जिरे, दालचिनी, काळमिरी आणि ओवा यासारखे काही विशिष्ठ मसाले तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच आजारपण आणि इनफेक्शनपासून दूर राहण्यासाठी आहारात या मसाल्यांचा वापर जरूर करा.
Shutterstock
दालचिनी –
दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे सुगंधासोबत दालचिनी तुमच्या जेवणाला हेल्दी देखील करत असते. अनेक अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो. दालचिनीमध्ये कॅंन्सरपासून बचाव करणारे गुणधर्म असतात. शिवाय यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दालचिनीचा वापर आहारात केल्यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि कोलेस्ट्ऱॉल कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. म्हणूनच आजारपणापासून दूर राहण्यासाठी आहारात दालचिनीचा वापर जरूर करा.
हळद –
हळद हा भारतातील असा एक मसाला आहे ज्याचा वापर प्राचीन काळापासून औषधाप्रमाणे केला जातो. हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून आजारपणातून बरे होण्यासाठी हळदीचे दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यासाठीच जर तुम्हाला इनफेक्शनची भिती वाटत असेल तर आहारात हळदीचा वापर करण्यास मुळीच विसरू नका. सर्दी- खोकल्यावर मधातून हळदीचे चाटण घेतल्यास नक्कीच बरे वाटते.
Shutterstock
जिरे –
जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि लोह असतं. यासाठीच आहारात जिऱ्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. जिऱ्याची फोडणी दिलेले खाद्यपदार्थ खाण्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या महिला, आजारी माणसे, लहान मुले यांच्या आहारात जिऱ्याचा वापर जरूर करा. अपचनाचा त्रास होत असेल तर पाण्यातून जिरे पावडर घेतल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. याचप्रमाणे श्वसनाच्या समस्या आणि संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्यासाठी जिरे फारच गुणकारी आहे.
जायफळ –
बऱ्याचदा एखाद्या गोड पदार्थांला सुंगध देण्यासाठी जायफळाची पावडर वरून भुरभुरली जाते. जायफळामुळे शरीरातील फायबर्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दातांच्या समस्या असल्यास जायफळाची पावडर पाण्यात मिसळून चूळ भरण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे दातांची कीड कमी होते. सर्दी, खोकल्यासारख्या संसर्गजन्य रोगांना दूर ठेवण्यासाठी जायफळाचा वापर केला जातो. म्हणूनच इनफेक्शनपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात जायफळाचा वापर अवश्य करा.
Shutterstock
ओवा-
ओवा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो आणि ओवा खाण्याचे फायदेही आहेत. कारण त्यामुळे पदार्थ रुचकर होतात.
काळीमिरी –
काळीमिरीचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. कारण यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत राहते. काळीमिरी हा एक उष्ण गुणधर्म असलेला गरम मसाला आहे. ज्यामुळे तुमचे अनेक आजारपणांपासून संरक्षण होऊ शकते. शिवाय यातील बीटा कॅरेटिन, व्हिटॅमिन ए आणि सी मुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. म्हणूनच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी आहाराच काळीमिरीचा वापर अवश्य करा.
हिंग –
भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी असतेच. हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरलं जातं. हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ चव येते. हिंग केवळ स्वादासाठीच फोडणीत वापरलं जातं असं नाही तर त्यामागे खूप मोठं आहारशास्त्रदेखीलआहे. हिंग वापरल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्यं दोन्ही वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतात. वातावरणातील बदल आणि वाढणारे प्रदूषण याचा परिणाम शरीरावर होत असतो. वातावरणातील बदलांमुळे आजकाल वारंवार सर्दी-खोकला यासारखे संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत असतो. मात्र जर तुम्हाला सतत सर्दी, खोकला होत असेल तर तुम्ही हिंगाचा वापर करून त्यापासून सुटका मिळवू शकता. हिंग, मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचे चाटण घेतल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
फोडणीतील चिमूटभर ‘हिंग’ आरोग्यासाठी असतं लाभदायक -Health Benefits Of Asafoetida In Marathi