Diet

उन्हाळ्यात पांढरे कांदे खाण्याचे अफलातून फायदे

Trupti Paradkar  |  May 2, 2022
Health Benefits Of White Onions in Marathi

उन्हाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये लाल कांद्यासोबत पांढरे कांदेही मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. मात्र असं असूनही अनेकांना पांढरे कांदे कसे असतात आणि त्याचा काय फायदा आरोग्यावर होतो हे माहीत नाही. भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आपण स्वयंपाकासाठी लाल कांदा नेहमीच वापरतो. उन्हाळ्यात मात्र पांढरा कांदाही बाजारात दिसू लागतो. या पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. म्हणूनच याचा वापर सलाड अथवा कच्चा खाण्यासाठी केला जातो. यासाठीच जाणून घ्या पांढरा कांदा कच्चा खाण्याचे फायदे (Health Benefits Of White Onions) यासोबतच वाचा कांद्याचे फायदे , आरोग्य आणि सौंदर्यासाठी (Kandyache Fayde)

पांढरे कांदे खाण्याचे फायदे

या कांद्यामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि एलर्जिक, अॅंटि ऑस्किडंट गुणधर्म अधिक असतात. यातील व्हिटॅमिन ए, बी 6, लोह, फॉलेट, पोटॅशिअम आणि बी कॉम्प्लॅक्समुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण मिळते. एवढंच नाही पांढऱ्या कांद्यांमुळे उन्हाळ्यात तुमच्या शरीराला थंडावा तर मिळतोच पण प्रतिकारशक्तीही वाढते. यासाठीच जाणून घ्या उन्हाळ्यात का खायला हवा पांढरा कांदा. यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi

प्रतिकार शक्ती वाढते

सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित पांढरा कांदा खाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. कारण या कांद्यामध्ये सेलिनियम  भरपूर असते. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अथवा सतत जे लोक आजारी पडतात त्यांनी पांढरा कांदा यासाठी खायला हवा.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते

पांढऱ्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि प्री बायोटिक्स असतात. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. पांढरा कांदा खाण्यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता अथवा पोटाचे विकार होण्याचा धोका कमी होतो.

मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहींसाठी पांढरा कांदा खाणं खूप फायद्याचं ठरू शकतं. कारण या कांद्यामध्ये केर्सिटिन आणि सल्फर असते. जे अॅंटि डायबेटिक असल्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

केसांसाठी योग्य

आजकाल केस गळणे, केस अकाली पांढरे होणे अशा अनेक समस्या सतावत असतात. मात्र जर तुम्ही नियमित पांढरा कांदा खात असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पांढऱ्या कांद्याचा वापर तुम्ही आहाराप्रमाणेच सौंदर्यासाठी करू शकता. या कांद्याचा रस तुमच्या केसांसाठी उपयुक्त ठरतो. 

हाडं मजबूत होतात

जर तुमची हाडे कमजोर असतील तर तुम्हाला तुमच्या आहारात पांढऱ्या कांद्याचा समावेश करायलाच हवा. कारण यातील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम तुमच्या हाडांना मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet