खाणंपिण आणि नाइटलाईफ

वजन नियंत्रित करते झुकिनी, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Trupti Paradkar  |  Jan 29, 2021
वजन नियंत्रित करते झुकिनी, जाणून घ्या फायदे आणि तोटे

वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी  तुम्ही हेल्दी डाएटवर भर देता. फिट राहण्यासाठी आहारात यासाठी हिरव्या आणि ताज्या भाज्या असायलाच हव्या. शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी आहारतज्ञ्ज आहारात भाज्यांचा  समावेश करण्याचा सल्ला देतात. याच भाज्यांमध्ये एक अशी भाजी आहे जिचा समावेश आहारात असेल तर तुमचे वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकते. झुकिनी बी फळभाजी हिरव्या आणि पिवळ्या रंगाची असते. या भाजीत अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे ती पथ्याची भाजी म्हणून खाल्ली जाते. विशेष म्हणजे ही भाजी तुम्हाला बाराही महिने मिळू शकते. 

झुकिनीमधील पोषक घटक

आहारात झुकिनीचा समावेश करण्यापूर्वी त्यातील पोषक घटक अवश्य जाणून घ्या

एका मध्यम आकाराच्या झुकिनीमध्ये असलेले पौष्टिक घटक

instagram

झुकिनीचे आरोग्यावर होणारे फायदे –

झुकिनीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के पोटॅशिअम, इतर मिनरल्स आणि भरपूर फायबर्स असतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ती नक्कीच फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रणात राहते

वाढणारे वजन ही आजकाल अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय आहे. मात्र जर तुमच्या आहारात झुकिनीचा समावेश असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. झुकिनीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. झुकिनी खाण्यामुळे तुम्हाला  बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. याचा परिणाम असा होतो की तुम्ही अपथ्यकारक पदार्थ कमी खाता. खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे तुमच्या वजनावर याचा चांगला परिणाम होतो आणि तुमचे वजन कमी होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

वय वाढत जातं तसं डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतं. शिवाय सध्याची डिजिटल जीवनशैलीही डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. यासाठीच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी आहारात ताज्या भाज्यांचा समावेश असायला हवा. झुकिनीमध्ये ल्युटिन आणि जॅक्सेथीन हे घटक असतात. ज्याचा तुमच्या दृष्टीवर चांगला परिणाम होतो. वाढत्या वयानुसार होत जाणारी अंधुक दृष्टी यामुळे सुधारते. यासाठीच डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि दृष्टी तेजस्वी करण्यासाठी आहारात झुकिनी असायला हवी.

ह्रदयासाठी वरदान

रक्तदाबाची समस्या असेल तर त्यामुळे पुढे ह्रदयाचे आजार निर्माण होतात. यासाठी वेळीच या समस्येला नियंत्रणात ठेवायला हवं. झुकिनीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तुमच्या रक्तदाबाला नियंत्रणात ठेवतात. झुकिनीमध्ये असलेले पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवते. यासाठीच ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना आहारातून झुकिनी खाण्याचा सल्ला दिला जातो. झुकिनीमध्ये फायबर्स असल्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रासही होत नाही. ज्यामुळे तुमचे ह्रदय मजबूत राहते.

instagram

अस्थमाच्या रूग्णासाठी फायदेशीर –

दमा अथवा अस्थमा असेल तर झुकिनी खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. कारण झुकिनीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट आहेत. यातील व्हिटॅमिन सी मुळे तुमचमी प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय यामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म देखील आहेत. अस्थमाच्या त्रासामुळे शरीराचा होणारा दाह आणि अस्वस्थता यामुळे कमी होते. मात्र यासाठी आहारात झुकिनीचा समावेश असण्यासोबत योग्य ते औषधोपचारही वेळीच करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

इनफेक्शनचा धोका टाळण्यासाठी खा केळफुलाची भाजी

म्हणून आहारात हमखास हवी शेपूची भाजी

कोबी आणि फ्लॉवरच्या भाजीचा दर्प असा करता येईल कमी

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ