खाणंपिण आणि नाइटलाईफ

काहीही अरबट चरबट खायचे नसेल तर खा हे लाडू

Leenal Gawade  |  Oct 11, 2021
अरबट चरबट खाणे

‘दिल है की मानता नही’ असं म्हणत काहीही बाहेरचे अरबट चरबट खायचे नसताना बऱ्याच गोष्टी आपल्या पोटात जातात. तुम्हाला बाहेरचे खाणे काही काळासाठी टाळायचे असेल. पण गोडाचे किंवा चटपटीत असे काही खाण्याचे क्रेव्हिंग काही केल्या कमी होत नसेल तर अशांनी त्याच्या खाऊच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या भुकेच्या वेळेत त्यांच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी काही लाडू खाल्ले तर त्यांना इतर काही गोष्टी खाण्याची मुळीच इच्छा होणार नाही. लाडू हा असा पदार्थ आहे जो वरचेवर अनेकांच्या घऱात बनतो. वेगवेगळे धान्य आणि गूळ घालू वळलेले हे लाडू अतिशय पौष्टिक असतात ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

मूगाच्या चविष्ट रेसिपीजनी जीभेचे पुरवा चोचले आणि वजन करा कमी

लाडूमध्ये काय असते?

लाडू ह वेगवेगळ्या पीठांची बनवली जातात. हल्ली बाजारात अनेक पौष्टिक लाडू मिळतात. मखाणा लाडू, शेंगदाणा लाडू,  गव्हाचा लाडू, मेथीचा लाडू, बेसनचा लाडू, मिक्स लाडू असे वेगवेगळे लाडू  मिळतात.  लाडूमध्ये पौष्टिक पीठ,गूळ आणि तूप असते ज्यामुळे तुम्हाला फायदेच फायदे मिळतात. 

शेंगदाणा लाडू


शेंगदाणा हा काजूच्या बरोबरीचा आहे. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट मिळते. शेंगदाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात एनर्जी असते. जर तुम्हाला थोडेसे लो फिल होत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे एक ते 2 लाडू  खाऊ शकता. शेंगदाण्याचा लाडू संध्याकाळी खा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच एनर्जी मिळाल्यासारखे वाटेल. 

मेथीचा लाडू

Instagram

खूप जणांना मेथीला लाडू आवडतो. मेथीच्या लाडूमध्ये अळीव, गूळ, तूप, ड्रायफ्रुट्स असतात. ज्यामुळे तुम्हाला फायदेच फायदे मिळतात. त्यामुळे मेथीचा लाडू घरी करुन खाण्यात काहीच हरकत नाही. मेथीचा लाडू हा चवीला अधिक चविष्ट लागतो. त्यामुळे त्याचे सेवन करावे. 

गव्हाचा लाडू

गव्हाची पोळी ही खूप जणांना खायला आवडत नाही. खूप जण गव्हाची पोळी खाण्याचा कंटाळा करतात. त्याहीपेक्षा अधिक गव्हाची पोळी ही कंटाळवाणी होऊन जाते. अशावेळी गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्यावे. त्यामध्ये तूप आणि गुळ घालून लाडू वळावे. त्याच ड्रायफ्रुट घातले तर त्याची चव अधिक वाढते. गव्हाचे लाडू हा पोळीपेक्षा जास्त चांगला लागतो. 

काळा आणि पिवळा गुळ काय आहे दोघांमधील फरक, फायदे-तोटे

मखाण्याचा लाडू 

मखाणा हा अधिक पौष्टिक असतो. मखाण्याचे पीठ तयार करुन त्याच्यापासून तुम्ही लाडू तयार करु शकता. मखाणा रोस्ट करुन त्यापासून खूप जण स्नॅक तयार करतात. असाच रोस्ट केलेला मखाणाही चांगला लागतो. पण त्यापासून लाडू तयार केले तर तुमचे पोटही भरले जाईल आणि तुम्हाला त्याचे फायदे मिळण्यासही मदत मिळेल. 

आता काहीही अरबट चरबट खाण्यापेक्षा तुम्ही हे मस्त लाडू खाऊ शकता. 

वजन कमी करण्यासाठी आहारातून घ्या हे गरम मसाले

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ