अन्नपदार्थ तसंच काही गोड पदार्थ-मिठाईमध्ये तिळाचा आर्वजून वापर केला. हिवाळ्यात गुळासोबत तिळाचं सेवन करणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. तिळामध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (Mono-Saturated Fatty Acid)चं प्रमाण आहे. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रोल (Cholesterol) कमी होण्यास मदत होते. हृदयसंबंधित आजार असणाऱ्यांनी तिळाचं सेवन केल्यास फायदेशीर ठरेल. याव्यतिरिक्त तीळ हाडे मजबूत करणे आणि मधुमेहाचा त्रास कमी करण्यातही लाभदायक आहे. तिळामध्ये अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत, जे शरीरातील कॅन्सर पेशी वाढण्यापासून रोखतं. फुफ्फुसांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्यापासून तीळ आपल्याला दूर ठेवते. तिळाचे असे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत. तिळामध्ये व्हिटॅमिन बी 6, खनिजे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, तांबे, झिंक, फायबर यांसारखे पोषक घटकांचा समावेश आहे. कित्येक आजारांवर तीळ हा रामबाण उपाय आहे.
(वाचा : हृदयरोग ते त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय, रोज खा हिरवे मटार)
तीळ खाण्याचे फायदे
– तिळामध्ये झिंक, कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे घटक आहेत. या घटकांमुळे हाडांना बळकटी मिळते. तिळाच्या सेवनामुळे पचन प्रक्रिया अधिक चांगली होती. कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात फायबर आहे. महत्त्वाचे तिळामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.
– तिळामुळे शरीराला येणारी सूज देखील कमी होते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात तांबे या घटकाचा असतो. तांबे गुघडे, हाडे आणि स्नायूपेशींच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. या गुणधर्मामुळे गाठींच्या दुखण्यातून सुटका मिळते.
(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)
– तिळामुळे शरीराची रक्ताभिसरण संस्था योग्य रितीने काम करते. तिळाच्या सेवनामुळे तोंडामध्ये होणाऱ्या जिवाणूंचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.
– तिळामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्ण कॅन्सरचा धोका कमी करतात.
– मॅग्नेशिअमही योग्य प्रमाणात असल्यानं मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे इन्सुलिनचा स्तर समतोल प्रमाणात राखण्यात तिळाचं सेवन करणं फायदेशीर ठरेल.
– तिळामध्ये अशा काही तत्त्व आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे ताणतणावसारखे आजारांतून आपल्याला सुटका मिळते.
(वाचा : हिवाळ्यात हातपाय पडताहेत थंड, तुमचं शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत)
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.