DIY सौंदर्य

निस्तेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा हे हर्बल लेप, होईल त्वचा चमकदार

Vaidehi Raje  |  Mar 17, 2022
herbal face mask

आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये नैसर्गिक फेस मास्कला विशेष स्थान असते. एकवेळ आपल्याला बाजारातल्या उत्पादनांवर विश्वास नसतो. पण नैसर्गिक घटकांना कुठलेही मानवनिर्मित उत्पादन रिप्लेस करू शकत नाही. सुदैवाने बऱ्याच लोकांना दिवसेंदिवस नैसर्गिक गोष्टींचे महत्व पटते आहे. आपल्याच बगिच्यात किंवा घरात आढळणारे औषधी व पौष्टिक पदार्थ वापरून आपण आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेची नक्कीच उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतो. घरीच तयार केलेले नैसर्गिक हर्बल फेस मास्क्स आपल्याला टवटवीत व निरोगी त्वचा देऊ शकतात, ते त्वचेतील अशुद्ध घटक बाहेर काढू शकतात, टॅनिंग काढून टाकून  त्वचा उजळ करू शकतात तसेच सुरकुत्या कमी करण्यासही मदत करू शकतात. चला तर मग बघूया सोपे हर्बल फेस मास्क्स जे तुमची निस्तेज झालेली त्वचा पुन्हा टवटवीत करू शकतील. 

मुलतानी माती, कोरफड व मध

तुम्ही चेहेऱ्यावर हायलुरोनिक ऍसिड सीरम लावून दमला असाल आणि तरीही तुमच्या कोरड्या त्वचेत फरक पडला नसेल तर ही फेस मास्क रेसिपी तुमच्यासाठी आहे.

साहित्य – 6 टीस्पून मुलतानी माती, 2 टीस्पून कोरफडीचा रस, 1 टीस्पून मध, पाणी 

मास्क बनवण्याची पद्धत- कोरडी त्वचा संतुलित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार आणि आर्द्रता होय. हा रिफ्रेशिंग मास्क तुमची त्वचा आतून हायड्रेट करेल. कोरडी पडल्यामुळे त्वचेची जळजळ होत असेल तर या मास्क मध्ये तुम्ही लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे काही थेंब घालू शकता.कारण याचा विशिष्ट सुगंध मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करू शकतो आणि हे ऑइल अस्वस्थता, चिडचिड आणि निद्रानाश या त्रासांवर उपयुक्त आहे. मास्क तयार करण्यासाठी सर्व घटक एकत्र मिसळा व एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला हळूवारपणे लावा आणि 20 मिनिटे ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवून घ्या. 

मध ,अवाकाडो व खोबरेल तेल 

आपली तणावयुक्त दिनचर्या, प्रदूषण आणि वातावरण यांमुळे त्वचेला त्रास होतो आणि त्वचेची जळजळ आणि लालसरपणा होण्याची शक्यता असते. हा फेस मास्क लावला तर तुमच्या त्रासलेल्या त्वचेला आराम मिळेल. 

साहित्य – 1 चमचा मध, 1 टीस्पून नैसर्गिक खोबरेल तेल, ¼ पिकलेले अवाकाडो, लव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे  2 थेंब

कृती- या फेस मास्क मध्ये असलेल्या खोबरेल तेलामुळे त्वचेला हायड्रेशन मिळते व मधातून त्वचेला अँटिऑक्सिडंट्स मिळतात. लॅव्हेंडर तेलामुळे त्वचेची जळजळ थांबते. हे सगळे पदार्थ एकत्र करा व पेस्ट तयार करून तो लेप चेहेऱ्याला लावा. पंधरा ते वीस मिनिटे ठेवून मग कोमट पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवून घ्या. 

पपई आणि मध 

हा लेप कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.  कच्च्या पपईचे 8-10 छोटे तुकडे घ्या आणि मॅश करा. यामध्ये 1 चमचा दूध किंवा साय आणि 1 चमचा मध घाला. हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून लेप तयार करून घ्या व चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे हा लेप ठेवा व नंतर कोमट पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवा. 

पपई, केळी आणि काकडी

हा लेप तेलकट त्वचेसाठी आहे. लेप तयार करण्यासाठी पपईचे 8-10 छोटे तुकडे, काकडीचे तीन-चार तुकडे आणि अर्धे केळ एकत्र मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. हा लेप तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15-20  ठेवा व नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

हे नैसर्गिक लेप तुमच्या त्वचेला पुन्हा तजेलदार होण्यास मदत करतील. 

Photo credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य