DIY सौंदर्य

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर ट्राय करा ‘चॉकलेट फेस पॅक’

Trupti Paradkar  |  Jun 24, 2019
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर ट्राय करा ‘चॉकलेट फेस पॅक’

वाढते प्रदूषण आणि कामाची दगदग याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. सतत धावपळ आणि कामानिमित्त घराबाहेर राहिल्याने त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे अचानक एखाद्या पार्टीसाठी अथवा कार्यक्रमासाठी जाताना त्वचेवर पटकन ग्लो यावा असे तुम्हाला वाटू लागते. त्वचेवर असा इंस्टंट ग्लो येण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता. कधी कधी यासाठी पार्लरमध्ये महागडी ब्युटी ट्रिटमेंटदेखील घेता. मात्र याचा काहीच फायदा होत नाही. वास्तविक तुमच्या घरातील काही वस्तू वापरूनदेखील तुम्ही तुमची त्वचा तजेलदार आणि तुकतुकीत करू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासोबत चॉकलेट पासून घरीच तयार केलेले काही फेसपॅक शेअर करत आहोत. चॉकलेटमध्ये त्वचेचे पोषण करण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि उजळ दिसू लागते. शिवाय चॉकलेटमधील कॅफेनमुळे तुमची त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. यासाठीच हे चॉकलेट फेस पॅक जरूर ट्राय करा.

चॉकलेट आणि मीठ

तीन चमचे वितळवलेले चॉकलेट, तीन चमचे दूध आणि चिमूटभर मीठ एकत्र करा. चॉकलेट मेल्ट करण्यासाठी चॉकलेट बार एका भांड्यात काढा. गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यावर चॉकलेटचे तुकडे असलेले भांडे ठेवा. पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळून पातळ होते. सर्व मिश्रण एकत्र करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. चॉकलेट फेस पॅक चेहऱ्यावरून काढण्यासाठी कोमट पाणी वापरा. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा इंस्टंट ग्लो नक्की येईल. शिवाय मीठामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि चॉकलेट, दूधामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागेल.

shutterstock

चॉकलेट आणि मध

तीन चमचे कोकोपावडर, तीन चमचे मेल्ट केलेले चॉकलेट, दोन चमचे सेंद्रिय मध, तीन चमचे शूद्ध क्रीम आणि दोन चमचे ओट्सची पावडर घ्या. सर्व मिश्रण एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक एक उत्तम स्क्रबर आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेडस्किन निघून जाईल. शिवाय चेहरा चमकदार आणि उजळ दिसू लागेल. जर तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी तयार व्हायचं असेल आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर हा फेसपॅक जरूर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसू लागेल.

shutterstock

चॉकलेट आणि कोको पावडर

तीन चमचे मध, दोन चमचे डार्क चॉकलेटची पावडर, एक चमचा कोको पावडर आणि दोन चमचे दूध एकत्र करा. या सर्व मिश्रण एकत्र करून चेहरा आणि मानेवर एकसमान लावा. फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चांगला रिझल्ट हवा असेल तर आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तुम्ही ट्राय करू शकता.

shutterstock

चॉकलेट आणि पिठीसाखर

वितळवलेले चॉकलेट, मध, लोणी आणि पिठी साखर मिसळून एक फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. महिन्यातू दोन ते तीन वेळा हा फेसपॅक लावल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

चॉकलेटपासून घरीच तयार केलेले हे फेसपॅक तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

अधिक वाचा

घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर

सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

Read More From DIY सौंदर्य