‘घर’ ही अशी जागा आहे जिथे समाधान, प्रेम, जिव्हाळा,आपुसकी, रुसवे-फुगवे असे सगळे काही अनुभवायला मिळते. म्हणूनच तर म्हणतात ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती… तिथे असावा मायेचा ओलावा.. नकोत नुसती नाती’ अशा या घरात मायेचा ओलावा असतो म्हणूनच दिवस संपला की, आपल्या घरी परतावेसे वाटते. घरापासून दूर असणाऱ्यांना घराची सतत आठवण येत राहते. खूप कामानंतर घरी आल्यानंतर घराची पायरी चढून जे समाधान मिळते, ते समाधान कुठेही आणि कधीही कोणत्याही गोष्टीतून विकत घेता येत नाही. अशा या घरासाठी तुम्ही काही चांगले नाव सुचवले आहे का? खूप जण घराचे काम केल्यानंतर घराचे छान नामकरण करतात. आपले घर अगदी दूरदूरपर्यंत सगळ्यांना ओळखता यावे, यासाठीच घरांचा नामकरण सोहळा केला जातो. तर नव्या घरात प्रवेश करताना वास्तुशांती करण्यात येते आणि वास्तुशांती निमंत्रण पत्रिका ही पाठविण्यात येतात. सगळ्यांकडून नवीन घरांसाठी शुभेच्छा (best wishes for new home in marathi) दिल्या जातात. तुम्ही घराचे नव्याने काम केले असेल आणि तुमच्या घरांची नावे (Home Names In Marathi) ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर घरांची नावे मराठी (New Home Names In Marathi) आम्ही शोधून काढले आहेत.
Table of Contents
युनिक घरांची नावे (Unique House Names In Marathi)
घरांची काही युनिक नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर घरांची नावे अगदी युनिक वाटतील अशी आम्ही शोधून काढली आहेत. ही नावं घरांना ठेवल्यानंतर त्याचा अर्थ काय ते एकदा तरी तुम्हाला जवळचे विचारतील. चला जाणून घेऊया युनिक घरांची नावे (Unique House Names In Marathi).
घरांची नावे | नावांचे अर्थ |
अनुग्रह | कृपा |
अमृतबिंदू | अमृताचा थेंब |
अभीरपुरम | सुंदर वास्तू |
अनुथम | उत्तम |
कदंब | एक वृक्ष |
गिरिराज | एक उंच पर्वत |
विसावा | जिथे शांतता मिळते असे ठिकाण, आराम |
कोंदण | अलंकारासाठी केलेली बैठक किंवा जागा |
विरंगुळा | आवड |
कुटीर | झोपडी ( घरासाठी ठेवलेले नाव) |
श्रम साफल्य | परिश्रमाने तयार केलेली वास्तू |
निकुंज | वन-वाटिका कुंज |
उत्तम | सर्वात चांगले |
स्वप्न साकार | स्वप्न पूर्ण होतात तेव्हा |
अनुमती | परवानगी |
आर्षती | पवित्र |
बोध गया | से ठिकाण जेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली |
शुभ चिंतन | चांगले विचार |
चारु हास्य | आनंदी हसणे |
ध्रुव | अढळ |
वाचा – यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स
नव्या घरांची नावे अर्थासह (New Home Names In Marathi)
काही नवीन नावे (New Home Names In Marathi) देखील तुम्ही तुमच्या घरासाठी ठेवू शकता. ही नावं तुम्हाला नक्कीच आनंद मिळवून देतील आणि तुमच्या घराला नवी ओळखही मिळवून देतील.
घरांची नावे | नावांचे अर्थ |
निकुंजिका | वाटिका |
अतुल्य | अलौकिक |
यज्ञश्री | यज्ञाचे वैभव |
युगंधरा | युग बदलण्याची क्षमता असणारी |
पृथा | पृथ्वी |
रौनक | चमकदार |
अमोली | मौल्यवान |
अवनी | भूमी |
आरुणी | पहाट |
आज्ञेयी | आदेश |
स्वरकुंज | स्वर गुंजणारे ठिकाण |
योगायोग | जुळून येणारी वेळ |
बासुरी | एक वाद्य |
इशा | इश्वराची कृपा |
फुल्की | एक तेजोमय ठिकाण |
धना | धनाने भरलेले |
द्वारका | श्रीकृष्णाचे गाव |
गर्व | अभिमान |
हंस | एक सुंदर पांढरा पक्षी |
ह्रजू | सरळ |
वाचा – Vastu Tips For Home In Marathi
बेस्ट घरांची नावे अर्थासह (Best House Names In Marathi)
तुमच्या घराला नाव ठेवायचं असेल तर तुम्ही घराची नावं अगदी बेस्ट ठेवायला हवी. काही जुनी आणि युनिक नावे देखील बेस्ट (Best House Names In Marathi) वाटतात.
घरांची नावे | नावांचे अर्थ |
भाग्यं निवास | लाभदायक अशी वास्तू |
स्वप्नपूर्ती | स्वप्न पूर्ण करणारी वास्तू |
अरिंदाम | भगवान शिव |
देवलोक | देवाचे आवडीचे ठिकाण, देवाच्या राहण्याची जागा |
हेमन | सोने |
आस्था | विश्वास |
पद्मजा | कमळावर बसलेली |
वृद्धी | वाढ |
माझे घर | आपल्या घराची भावना |
गंगा दत्त | गंगेची भेटवस्तू |
आनंद सागर | आनंद सागर बनून वाहतो तेव्हा |
ह्रदेश | ह्रदयातील जागा |
हिंमाशू | चंद्र |
हविशा | दान |
इंद्रन | भगवान इंद्र |
सगंध | सुगंधीत |
इन्दीवर | नीळकमल |
अंकुश | हत्तीला काबूत आणणारे शस्त्र |
ओढ | आस |
निखिल | संपूर्ण |
वाचा – वास्तुशास्त्रानुसार देवघर
नव्या घरासाठी रॉयल नावे (Royal And New Home Names In Marathi)
घरांना रॉयल ठेवायला कोणाला आवडणार नाही. तुमच्या घरांसाठी तुम्ही काही रॉयल नावं शोधत असाल तर तुमच्यासाठी काही रॉयल नावे (Royal And New Home Names In Marathi) देखील आम्ही शोधून काढली आहेत.
घरांची नावे | नावांचे अर्थ |
नक्षत्र | आकाशातील तारा |
भारद्वाज | भाग्यशाली पक्षी |
चिरायू | चिरंतर आयुष्य, टिकणारे |
देवकंठ | देवाच्या आवडीचे |
फाल्गुन | अर्जुन |
गगन | आकाश |
गिरि | उंच पर्वत |
इंद्रप्रस्थ | पांडवाचे राहण्याचे ठिकाण |
इंद्रधनु | सप्तरंगी ठिकाण |
ईशावास्यम | इश्वराचा वास असतो अशी जागा |
तमन्ना | इच्छा |
श्रीतेज | गणपतीचे तेज असलेले ठिकाण |
सूर्योदय | सूर्याचा उगम होण्याची वेळ |
ऐक्य | एकी |
फाल्गुनी | एक मराठी महिना |
सगंधालय | आपल्या माणसांचा आसरा |
स्नेहांचल | स्नेहाचा सहवास असलेले ठिकाण |
प्रपंच | संसार |
आश्रय | डोक्यावर छप्पर असणे |
आभा | तेज |
ही काही छान नावे तुमच्या नव्या वास्तूला किंवा घराला ठेवू शकता.
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade