बऱ्याचदा खेळताना अथवा ऑफिसमध्ये, घरी कोणतंही काम करत असताना अचानक पाय मुरगळतो. पाय मुरगळला तर लोक बऱ्याचदा गंभीरपणाने घेत नाही. त्यामुळे काही दिवसानी पायातील दुखणे वाढते आणि ते असह्य होते. त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मुरगळणे गंभीर असो वा हलक्या पद्धतीचे. पण त्याचा उपचार तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता. तर काही जण पाय मुरगळला तरीही खूप जास्त गंभीरपणाने त्या गोष्टीकडे लक्ष देतात. पण त्यातील गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. फक्त तुम्हाला काही गोष्टींवर व्यवस्थित लक्ष द्यावे लागते. तुम्ही काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्या आणि अचानक पाय मुरगळला तर सोप्या पद्धतीने उपचार करून वेळेवर उपचार करा. त्यासाठी नक्की काय करायचे ते आपण या लेखातून पाहू. पण पाय मुरगळला आहे आणि पायातील फ्रॅक्चर यातील फरकही तुम्हाला समजून घ्यायला हवं. पायात फ्रॅक्चर झालं तर तुम्हाला अधिक कळा येतात आणि मुरगळला तर तुम्ही किमान तो त्रास सहन करू शकता. मात्र फ्रॅक्चर झाल्यास तुम्हाला त्रास सहन करणं अतिशय कठीण होतं. त्यामुळे नक्की काय करायला हवं आणि काय नाही करायचं ते जाणून घेऊया.
अचानक पाय मुरगळल्यास काय करावे?
Shutterstock
- अचानक पाय मुरगळल्यास, सर्वात पहिले मुरगळलेल्या भागाला आराम द्या आणि प्रयत्न करा की त्या पायावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये
- पाय मुरगळ्यावर साधारण 48-72 तासांच्या आत तुम्ही 15-20 मिनिट्स शेकून घ्या
- बर्फ लावा. पण लक्षात ठेवा जिथे मुरगळला आहे तिथे बर्फ प्रत्यक्ष लावण्यापेक्षा टॉवेलमध्ये अथवा स्वच्छ कपड्यात बर्फ घेऊन मगच शेका
- ज्या ठिकाणी पाय मुरगळला असेल तिथे त्रास होऊ नये यासाठी बँडेज बांधा. यामुळे सूज कमी होईल. तसंच जर पाय मुरगळला असेल अथवा जखम झाली असेल तर पाय जास्त वेळ उशीवर ठेऊ नका
अचानक पाय मुरगळल्यास काय करू नये
- ज्या ठिकाणी पाय मुरगळला आहे त्याठिकाणी मसाज करू नका
- कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नका
- मुरगळलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गरम वस्तूने शेकू नका. स्टीम बाथ अथवा सोनबाथ घेऊ नका
- पाय मुरगळला असल्यास दारूचे सेवन करू नका कारण त्यामुळे सूज वाढण्याची शक्यता असते. तसंच तुमची सूज बरी होण्यास वेळ लागू शकतो
पायाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी करा 5 tricks
फ्रॅक्चर झाला असल्यास
Shutterstock
- तुम्हाला पाय मुरगळणे आणि फ्रॅक्चर यातील फरक नक्कीच कळतो त्यामुळे पाय हलवण्याचा प्रयत्न करू नका
- फुटपट्टी अथवा छडीसारख्या एखाद्या कठीण वस्तूने हाडाला सपोर्ट देऊन कोणत्या तरी कपड्याने बांधा
- लागल्यानंतर जर रक्त येत असेल तर पहिले रक्त स्वच्छ फडक्याने साफ करून दाबून ठेवा
- ज्या ठिकाणी लागलं आहे ते पाण्याने साफ करून घ्या
- तुटलेली हाडं जोडणं जोडता येतात त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करा
- लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा. पण त्याआधी घरगुती काळजी घेणंही गरजेचं आहे
पायावर पडल्या असतील भेगा तर होतील 4 दिवसात गायब, करा हे उपाय
फ्रॅक्चर झाला असल्यास काय करू नये
- फ्रॅक्चर झाले आहे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं खाणं पिणं देऊ नये. कारण बऱ्याचदा बेशुद्ध करून हाडं जोडली जातात
- जिथे लागलं आहे त्याठिकाणी कोणतंही मलम लाऊ नये
जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज