काही जणांना इतका घाम येतो की,त्यांनी घातलेले कपडे अगदी काहीच मिनिटात ओले चिंब होतात. जर तुम्हालाही घामाचा खूपच त्रास होत असेल तर तुम्ही आतापासूनच तुमची काळजी घ्यायला हवी. कारण चारचौघात तुम्हालाही इतका घाम आलेला अजिबात आवडणार नाही नाही का? तुम्हालाही घामाचा त्रास असेल तर तुम्ही असे काही घाम कमी येण्यासाठी उपाय (Gham Kami Karnyache Upay) करु शकता.
वॅक्सिंग नंतर त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय
घाम का येतो? (Why Do We Sweat)
घाम येणे ही अत्यंत सामान्य अशी बाब आहे. घाम शरीराचे तापमान योग्य ठेवण्यास मदत करतो. शरीरात असलेल्या घामग्रंथीमधून हा घाम उत्सर्जित होत असतो. उन्हाळ्याच्या कालावधीत घाम येणे अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे. पण जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर ती तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या आहे. हल्ली ऑपरेशन करुन या घामाच्या ग्रंथी काढल्या जातात. पण यावर काही घरगुती आणि सोपे इलाजही आहेत.
#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी 12 Coffee Scrub Recipes
घाम कमी येण्यासाठी घरगुती उपाय (Gham Yene Upay In Marathi)
*अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
त्वचेच्या अनेक विकारांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर मग तुम्ही अगदी हमखास अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन तुम्ही करायला हवे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्हाला थोड्याशा कोमट पाण्यातून अगदी पाव चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घ्यायचे आहे. ते पाणी तुम्हाला रोज प्यायचे आहे. रोजच्या सेवनानंतर तुम्हाला तुमच्या घामाचे प्रमाण कमी झालेले दिसेल .
*गव्हांकुर (Wheatgrass)
गव्हांकुराचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहीत असेलच पण तुम्हाला येणारा अतिरिक्त घाम कमी करण्याचे कामही गव्हांकुर करते. तुम्ही जर गव्हांकुराचा रस सतत पित रहाल तर तुम्हाला हा फरक जाणवेल. गव्हांकुर तुमच्या शरीरातील सगळे अस्वच्छ घटक बाहेर काढून टाकते.
*लिंबू आणि मीठ (Salt Lemon Massage)
लिंबाचा रस आणि मीठही तुमचा घाम कमी करु शकतो. लिंबू आणि मीठ एकत्र करुन तुम्हाला घाम येणाऱ्या भागी चोळायचे आहे. असे करत असताना तुमचा शरीराचा तो भाग स्वच्छ असायला हवा. लिंबू आणि मिठाचे मिश्रण कमालीचे काम करते.
*कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा (Cornstarch And Baking Soda)
घाम कमी करण्यासाठी आणखी एक इलाज अगदी हमखास सांगितला जातो. तो म्हणजे कॉर्नस्टार्ज आणि बेकिंग सोडा यांचा. या दोन्ही गोष्टींमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. बेकिंग सोडामध्ये असलेले अल्केलाईन हे घामातील बॅक्टेरीयाला आकर्षित करतात. त्यामुळे तुम्ही रोज रात्री हे मिश्रण तुमच्या काखेला किंवा घाम येणाऱ्या भागी लावा. फक्त 30 मिनिटे ठेवून आठवणीने धुवून टाका. जर ते जास्त कालावधीसाठी राहिले तर मात्र तुम्हाला अन्य त्रास होण्याची शक्यता आहे.
*टोमॅटोचा रस (Tomato Juice)
टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा हा घामाशी संबंधित देखील आहे. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ शकता. जर टोमॅटोचा रस तुम्हाला प्यावा असे वाटत नसेल तर तुम्ही काखेत अथवा घाम येणाऱ्या ठिकाणी अगदी 10 मिनिटांसाठी हा रस लावू शकता.
*आता तुम्हाला जर घाम येत असेल तर तुम्ही असे घरगुती उपाय करु शकता.
दुपारच्या जेवणानंतर झोपणे ठरू शकते धोकादायक