DIY सौंदर्य

घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत

Trupti Paradkar  |  Aug 2, 2021
घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत

आजवर तुम्ही बॉडी डिटॉक्स करणे अथवा त्यासाठी केले जाणारे उपाय नक्कीच ऐकले असतील. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का शरीराप्रमाणेच तुमच्या केसांना डिटॉक्सची गरज असते. डिटॉक्स केल्यामुळे केसांमधील विषद्रव्ये आणि हानिकारक घटक स्वच्छ होतात. शरीराप्रमाणे नियमित हेअर डिटॉक्स केल्यामुळे तुमचे केस मजबूत आणि स्काल्प निरोगी होतो. केस डिटॉक्स करणे म्हणजे केस मुळापासून स्वच्छ करणे.. ज्यामुळे केसांमध्ये अडकेली धुळ, माती, प्रदूषण, घाम, चिकटपणा, कोंडा अशा अनेक गोष्टी नष्ट होतात. जर तुम्हाला वारंवार केसांच्या समस्या  जाणवत असतील तर तुम्ही केस डिटॉक्स करण्याची गरज आहे. 

घरगुती हेअर डिटॉक्स

घरच्या घरी केस स्वच्छ करण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय

बेकिंग सोडा 

बेकिंग सोडा केसांसाठी वापरल्यामुळे तुमच्या केसांमधील अस्वच्छता दूर होते. महिन्यातून एकदा असे केस डिटॉक्स केल्यास तुमच्या केसांच्या समस्या नक्कीच कमी होतील. शिवाय केस मजबूत आणि निरोगी होतील. मात्र हा उपाय करण्यापूर्वी याची पॅच टेस्ट घ्या. कारण कधी कधी काही लोकांना सोड्याची अॅलर्जी असू शकते. 

साहित्य – 

कसे तयार कराल –

गरम पाणी आणि सोडा एकत्र करा. केस ओले करून केसांना हे मिश्रण लावा.केस हळूवार मालिश करत हे मिश्रण प्रत्येक केस आणि स्काल्पवर लागेल याची काळजी घ्या. केस कोमट पाण्याने धुवून टाकाकेसांवर लगेच कंडिशनर लावा.

अॅपल सायडर व्हिनेगर

केस डिटॉक्स करण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे केसांवर अॅपल सायडर व्हिनेगर लावणे. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिकि पद्धतीने स्वच्छ होतात.

साहित्य – 

कसे तयार कराल –

दोन कप पाण्यात पाव चमचा व्हिनेगर मिसळा .केस नेहमीप्रमाणे शॅंपू आणि कंडिनशर करा. त्यानंतर केसांवर हे मिश्रण लावा आणि केस धुवू नका.

शिकेकाई

केस नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करायचे असतील तर शिकेकाई तुम्ही बिनधास्त वापरू शकता. कारण प्राचीन काळापासून शिकेकाई केसांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येत आहे.

साहित्य –

कसा तयार कराल –

शिकेकाई पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा.सकाळी हे पाणी उकळून निम्मे करा. थंड झाल्यावर ते केसांना लावा. अर्धा तासाने केस धुवून टाका.

कोरफडाचा गर

कोरफडाच्या गरामुळे तुमचे केस स्वच्छ होतीलच शिवाय केसांना छान नैसर्गिक चमकही मिळेल. कोरफडामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या कमी होतील.

साहित्य –

कसा तयार कराल –

कोरफडाचा गर आणि नारळाचे तेल एकत्र करा.ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांना लावा.अर्धा तासाने केस शॅंपू करा. केसांसाठी सौम्य शॅंपू वापरा.

दालचिनी

दालचिनी ही अॅंटि फंगल असल्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा अथवा चिकटपणा होणार नाही. केस निरोगी राखण्यासाठी हा नैसर्गिक हेअर डिटॉक्स मास्क नक्कीच फायद्याचा आहे.

साहित्य –

कसा तयार कराल –

तीनही घटक एकत्र करा आणि त्याची पेस्ट तयार करा.केसांना ही पेस्ट लावा आणि अर्धा तास केस बांधून  ठेवा.त्यानंतर केस स्वच्छ धुवा.

Read More From DIY सौंदर्य