DIY सौंदर्य

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा

Dipali Naphade  |  Sep 21, 2020
डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला सुरमा अथवा काजळाचा उपयोग करत असतात. काजळ आणि सुरमा लावल्याने डोळे आकर्षक आणि सुंदर दिसतात. नुकतंच अभिनेत्री यामी गौतमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घरच्या घरी काजळ तयार करण्याची ट्रीक शेअर केली आहे. यामी मुळातच खूप सुंदर आहे. तसंच ती नेहमीच नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपल्या त्वचेची काळजी घेते हेदेखील तिने अनेकदा सांगितले आहे. आपण जास्त मेकअपचा वापर करत नाही हेदेखील यामीने बऱ्याचदा सांगितले आहे. लहानपणी जेव्हा सुट्टीत यामी आपल्या आजीच्या घरी जायची तेव्हा तिथे काजळ घरच्या घरी तयार करून ती लावायची. तुम्हाला माहीत आहे का? घरच्या घरीही काजळ तयार करता येतं आणि तुम्हाला त्याचे कोणतेही दुप्षरिणामही होत नाहीत. यामी गौतमचा हा फंडा आपण जाणून घेऊया. घरच्या घरी काजळ कसं बनवयाचं ते पाहूया.

तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

घरी काजळ बनविण्याची पद्धत

होममेड काजळ अर्थात घरच्या घरी काजळ बनविण्यासाठी कॅस्टर ऑईल, तूप, काश्याची भांडी आणि कापूर इतक्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असायला हव्यात. काही जण काजळ बनविण्यसाठी बदामाचाही वापर करतात. दोन्ही काजळ हे नैसर्गिक स्वरूपाचे असते. नैसर्गिक काजळ हे खरं तर आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असते. यामी गौतमने घरच्या घरी काजळ कसे बनवायचे याची पद्धत शेअर केली आहे. हे काजळ आपल्या डोळ्यांना थंडावा आणि शांत राखण्यासाठी मदत करते. जाणून घेऊया कसे बनवायचे यामीच्या पद्धतीने काजळ – 

Makeup Hacks: डल मेकअप रिफ्रेश करण्याच्या सोप्या टिप्स

घरगुती काजळ लावण्याचे फायदे

काजळ बनवताना तुम्ही तुपाच्या जागी एरंडेल तेलाचाही वापर करू शकता. एरंडेल तेलामध्ये विटामिन ई चं प्रमाण असतं जे डोळ्यांना थंडावा देण्याचं काम करतं. इतकंच नाही तर विटामिन ई पापण्यांना घनदाट आणि अधिक काळ्या आणि सुंदर करण्यासही मदत करते. घरगुती आणि नैसर्गिक काजळ लावल्याने डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत मिळते.  तसंच तुम्ही यामध्ये कापूरही वापरू शकता. कापूरदेखील डोळ्यांना थंडावा देण्यास मदत करतो. तसंच डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यास फायदेशीर ठरतो. कापराचे काजळ हे डोळ्यांमध्ये होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठीही मदत करते. नैसर्गिक काजळ हे डोळ्यांच्या आसपास असणाऱ्या मांसपेशींना आराम देते. त्यामुळे या काजळाचे फायदे तुम्हाला अधिक आहेत. तुम्हाला घरी काजळ करायचे नसेल तर तुम्ही अगदी घरच्यासारखेच गुण असणारे MyGlamm चे काजळ वापरून पाहू शकता. तुम्हाला याचाही त्याचप्रमाणे फायदा मिळेल. मुळात याचा कोणताही प्रयोग हा प्राण्यांवर करण्यात आलेला नाही. 

तुमच्यासाठी बेस्ट आहेत या 5 काजळ पेन्सिल (5 Best kajal pencil)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य