आरोग्य

उन्हाळ्यात सतत होत असेल डोकेदुखीचा त्रास, वापरा घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Apr 22, 2021
उन्हाळ्यात सतत होत असेल डोकेदुखीचा त्रास, वापरा घरगुती उपाय

उन्हाळ्यात तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होतो का? उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याचा आणि डिहायड्रशेन झाले असल्यामुळे हा त्रास असतो. उन्हाळ्यात अति उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागते. ज्यामुळे बऱ्याच जणांना डोकेदुखीला सामोरं जावं लागतं. मायग्रेन आणि सायनसच्या त्रासाशिवाय उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी शक्यतो कमी होऊ न देण्याचा प्रयत्न करा. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात केवळ डोकेदुखीच नाही तर उल्टी, मळमळणे, पित्त निरनिराळ्या त्रासांना सामोरे जावे लागते, जसे कि लघवी च्या जागी जळजळ होणे, उन्हाळी लागणे इत्यादी. असेही त्रास होतात. पण उन्हाळ्यात असा सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर नक्की काय उपाय करायला हवेत हे आपण या लेखातून पाहूया. 

उन्हाळ्यात डोकेदुखी होण्याची कारणे (Causes of Headache in Summer)

Shutterstock

उन्हाळ्यामुळे झालेली डोकेदुखी हटविण्यासाठी घरगुती उपचार (Home remedies for headache in summer)

उन्हाळ्यात नक्की कसे डोके दुखते आणि त्याची कारणे काय हे आपण जाणून घेतले. पण त्यावर घरगुती नक्की काय उपचार करता येतील हे सोपे उपायदेखील आपण जाणून घेऊया. 

मायग्रेन कशामुळे होतो, मायग्रेन घरगुती उपाय करा आराम मिळवा (Migraine Treatment In Marathi)

जास्तीत जास्त पाणी पिणे

Shutterstock

अति उन्हामुळे शरीरातील पाणी पटकन कमी होते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सतत आणि जास्तीत जास्त पाणी पित राहणे आवश्यक आहे. शरीरामध्ये संतुलित प्रमाणात पाणी जात राहिल्यास, डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागणार नाही. 

हर्बल टी (Herbal Tea) प्यावा

Freepik

डोकेदुखीची समस्या असेल तर तुम्ही त्यासाठी हर्बल टी चे सेवन करावे. हर्बल टी तयार करण्यासाटी आपण लवंग, काळी मिरी आणि तुळशीच्या पानांचाही वापर करावा. हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पाण्यात हे पदार्थ उकळून हर्बल टी तयार करून नियमित याचे सेवन करावे. 

जाणून घ्या ब्रेन ट्यूमरची लक्षणे

लसणाचा रस

Shutterstock

उन्हाळ्यात डोकं दुखत असल्यास, यापासून सुटका मिळविण्यासाठी अत्यंत गुणकारी असा घरगुती उपाय म्हणजे लसूण. लसूण हे पेनकिलर्सप्रमाणे काम करते. डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास, लसणाचा एक चमचा रस काढा आणि तो प्या. डोकेदुखी त्वरीत थांबते. हा अत्यंत गुणकारी आणि सोपा उपाय आहे. 

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखीवर घरगुती उपाय (Headache Home Remedies In Marathi)

लवंगेचा वास घेणे

Shutterstock

उन्हाळ्यात डोकेदुखी होत असेल तर तुम्ही लवंगेचा वास घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही साधारण 4-5 लवंग तव्यावर भाजा. त्यानंतर रूमालात या लवंग ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने डोकेदुखी होत असल्यास, या लवंगांचा वास तुम्ही घ्या. यामुळे डोकेदुखी थांबण्यास मदत मिळते. 

डोकेदुखीने हैराण असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार असे करा उपाय

थंड पाण्याने डोकं धुवा

उष्णता जास्त असल्यास, डोकं दुखत असेल तर तुम्ही थंड पाण्याने डोकं धुणे हा चांगला पर्याय आहे. थंड पाण्यामुळे डोक्यातील रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि त्यामुळे डोकं दुखायचं अगदी थोड्याच वेळात थांबते. त्यामुळे तुम्ही हा पर्याय नक्कीच अनुभवू शकता.

दुधीचा चोथा डोक्यावर लावणे

दुधीचा किस करून त्याचा चोथा डोक्यावर लावल्यास, तुमच्या शरीरातील उष्णताही कमी होण्यास मदत मिळते. दुधीचा थंडावा तुम्हाला डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच तुमच्या डोक्यातील रक्तप्रवाह अधिक चांगला होण्यास मदत मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य