Fitness

मिनिट्समध्ये खोकला होईल गायब, बनवा घरगुती सिरप

Dipali Naphade  |  Aug 4, 2021
honey and onion syrup for cough

सध्याच्या वातावरणामध्ये प्रतिकारशक्ती कधी खराब होईल काहीच सांगता येत नाही. प्रतिकारशक्ती कमी झाली की, सर्दी खोकला असे आजार पटकन होतात. यातून बरे होण्यासाठी आपण सर्वात पहिले डॉक्टरांकडे न धावता सर्दीवर अथवा खोकल्यावर घरगुती उपाय काय आहेत याचा विचार करून त्याचा आधार घेतो. तुम्हाला आलेला खोकला जर तुम्हाला पटकन मिनिटांत गायब करायचा असेल तर आमच्याकडे एक त्यावर उत्तम उपाय आहे. तुम्ही घरच्या घरी एक सोपे सिरप बनवून यावर उपाय करू शकता. हे सिरप अर्थातच आयुर्वेदिक असून हर्बल औषधाप्रमाणे हे काम करते. हे घरगुती सिरप केवळ तुमचा खोकलाच घालवेल असं नाही तर तुम्हाला मौसमी आजारातून वाचविण्यासाठीही याची मदत मिळेल. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सिरपचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला कोणताही दुष्परिणाम दिसून येणार नाही. तुमच्या शरीराला आतून अथवा बाहेरून कोणताही त्रास होणार नाही हे नक्की! जाणून घेऊया काय आहे हे सिरप आणि कसे बनवायचे आणि याचा कसा वापर करायचा. यामध्ये उपयोग करायचा आहे तो म्हणजे कांदा आणि मधाचा. पाहूया याचे गुणधर्म – 

कांद्याचे औषधीय गुण

Shutterstock

कांद्यामध्ये अनेक गुणधर्म असतात जे वेगवेगळ्या श्वसनाच्या रोगांशी लढा देण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि यामुळे काही दिवसातच खोकला थांबतो. कांद्यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण आढळतात, जे आपल्याला संक्रमणापासून वाचवतात. तसंच कांद्यामध्ये फ्लेवोनॉईड्स आणि अल्केनाईल सिस्टिन सल्फॉक्साईडही भरपूर प्रमाणात असते. शोधानुसार, कांद्यामुळे हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर कमी होण्यास मदत मिळते. 

मधाचे औषधीय गुण

Freepik

मधामध्ये मिनरल्स, एंजाईम, विटामिन बी, प्रिबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. मधामध्ये रोगांशी लढा देणारे अनेक गुण असतात. तसंच मधामध्ये प्रोपोलिसचे प्रमाणही असते. यामुळे अँटिबायोटिक, अँटिफंगल आणि प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे मधाचा वापर सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सहसा अनादी काळापासून करण्यात येतो. मधाचे अनेक उपयोग आहेत.

या दोन्हीचा वापर करूनच आपल्याला सिरप बनवायचे आहे. त्यासाठी आता नक्की काय काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. 

सिरपसाठी साहित्य 

बनविण्याची पद्धत 

टीप – एक वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना हे मिश्रण देऊ नका. तसंच तुम्हीही हे सिरप घेण्यापूर्वी तुम्हाला शंका असेल तर तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून मगच हे सिरप प्या. तुम्हाला कोणतीही अलर्जी असल्यास मात्र तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांना विचारून याचे सेवन करावे. मात्र या सिरपमुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. हे करूनही खोकला थांबत नसेल तर त्वरीत डॉक्टरांना गाठावे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Fitness