Festival

16 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मेष राशीला कौटुंबिक संपत्तीचा होणार लाभ

Rama Shukla  |  Aug 14, 2019
16 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, मेष राशीला कौटुंबिक संपत्तीचा होणार लाभ

मेष – कौटुंबिक संपत्ती मिळेल

आज तुम्हाला आईकडून कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यावसायिक प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदारासोबत नाते  मजबूत होईल.

कुंभ – चांगली बातमी मिळणार आहे

आज तुम्ही इतरांची मने जिंकण्यात यशस्वी होणार आहात. ज्यामुळे तुम्हाला आज एखादी चांगली बातमी मिळणार आहे. मानसिक समाधान मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्न आणि खर्चाचा योग्य बॅलेंस राखा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. 

मीन – दुर्लक्षपणामुळे काम बिघडेल

आज कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे तुमचे काम बिघडण्याची शक्यता आहे. कामाची जागा बदलण्याची शक्यता आहे. मन निराश आणि असमाधानी असेल. काही लोकांना व्यवसायात आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

वृषभ – चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे

आज तुम्ही एखादी चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मतभेद होतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. आत्मविश्वास कमी होईल. देणी-घेणी सांभाळून करा. 

 

मिथुन – मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. सावध रहण्याची गरज आहे. विनाकारण दगदग करू नका. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 

कर्क – कौटुंबिक मतभेद दूर होतील

आज तुम्हाला कौटुंबिक मतभेद दूर करण्यात यश येणार आहे. वडीलांचे सानिध्य मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. कोर्ट कचेरीत यश मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह – रचनात्मक कार्यामुळे धनसंपत्तीत आणि मानसन्मान वाढेल

आज तुमच्या करिअरचा निर्णय घेण्यात तुम्हाला यश मिळेल. भविष्यात यश मिळेल. रचनात्मक कार्यामुळे धनसंपत्ती आणि मानसन्मानात वाढ मिळेल. विद्यार्थ्यांचे शिक्षणाबाबतचे महत्त्व वाढणार आहे. कौटुंबिक प्रवास होण्याची शक्यता आहे. 

कन्या – उत्पन्न कमी होण्याची शक्यता

वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्यामुळे निराश व्हाल. तुमच्या राहणीमानात बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.

तूळ –  जोडीदाराची साथ मिळेल

जोडीदाराचा हेल्थ रिपोर्ट चांगला येईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आत्मविश्वास वाढेल. राजकारणातील नवीन जबाबदाऱ्या मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृश्चिक – नात्यात तणावाची परिस्थिती जाणवेल

नात्यात तणावाची परिस्थिती जाणवेल. मुलांकडून निराशाजनक बातमी मिळेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. प्रवासाला जाणे टाळा. 

धनु – एखादी अज्ञात भिती जाणवेल

आज तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर थकवा आणि ताण जाणवेल. कौटुंबिक समस्यांपासून सूटका मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ चांगली मिळणार आहे. 

मकर- आईकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता 

आईकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. एखाद्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. भावंडांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी प्रवास फायदेशीर असेल.

अधिक वाचा

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From Festival