भविष्य

21 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार यश

Rama Shukla  |  Feb 13, 2020
21 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार यश

मेष – नात्यातील जवळीक वाढण्याची शक्यता

जोडीदारासोबत जवळीक वाढण्याची शक्यता आहे. विरोधक नमतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. ठरवलेली कामे पूर्ण करण्यात यश येईल. इतरांच्या सहकार्यामुळे यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

कुंभ –  दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमावण्याची शक्यता

आज कामाच्या ठिकाणी आळस करू नका. दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी गमवाल. व्यवसायासाठी जास्त मेहनत घेऊनही लाभ कमी मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत अचानक भेट होईल.

मीन- गुडघ्याचे दुखणे वाढणार आहे

आज तुमच्या आईच्या गुडघ्यातील वेदना वाढणार आहेत. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 

वृषभ – शिक्षणात यश मिळेल

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

मिथुन – गुंतवणूक करणे टाळा

आज पैशांची गुंंतवणूक करणे टाळा. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

कर्क –  उत्साह वाढेल

आज तुम्हाला उत्साही वाटेल. व्यवसायातील चढ-उतार वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची नवी साधने वाढतील. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी व्हाल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. 

सिंह –  कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे

आज कुटुंबातील समस्या वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून तुमच्या कामाला विरोध होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढू शकतो. धार्मिक कार्यात मन रमवाल.

कन्या –  धनप्रातीचा योग आहे

आज तुमच्या आईकडून तुम्हाला धनप्राप्ती मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. व्यावसायिक विस्तारासाठी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. 

तूळ –  ताणतणाव वाढण्याची शक्यता

मानसिक समस्यांमुळे तणाव वाढेल. जोडीदारासोबत नातेसंबध चांगले होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावध राहा. धार्मिक कामात रस वाढेल.

वृश्चिक –  व्यावसायिक समस्यांमधून मुक्ती मिळेल

भावंडांची साथ मिळाल्यामुळे व्यावसायिक समस्या सुटणार आहेत. जोडीदारावरील प्रेम वाढणार आहे. व्यवसायात नवीन साथीदार मिळतील. आर्थिक फायदा होईल. एखाद्या संस्थेद्वारा सन्मान मिळेल. 

धनु –  अभ्यासातील समस्या वाढण्याची शक्यता

आज तुमच्या अभ्यासातील समस्या वाढणार आहेत. आज एखादे नवे काम सुरू कराल. कामच्या ठिकाणी व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. विरोधकांपासून सावध राहा. मुलांसोबत वेळ घालवा. 

मकर – भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला एखादी नवीन भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. घरातील सजावटीसाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत नाते सुधारेल. देण्या-घेण्याचे व्यवहार चांगले होतील. 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य