भविष्य

21 मार्च 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस प्रेमाचा

Rama Shukla  |  Mar 17, 2020
21 मार्च 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस प्रेमाचा

मेष – आरोग्य उत्तम असेल

आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. दिवसभर उत्साहाचे वातावरण राहील. व्यावसायिकांच्या नव्या योजना यशस्वी होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. प्रवासादरम्यान सावध राहा.

कुंभ –  कामाच्या  ठिकाणी यश मिळेल

आज व्यवसायासाठी नवीन योजना आखाव्या लागतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सामाजिक मानसन्मान  आणि धनसंपत्तीत वाढ होईल. 

मीन- मौल्यवान वस्तू गमवण्याची शक्यता

आज एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजनेतील चिंता वाढतील. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. नात्यातीस कटूपणा वाढेल. नवीन नातेसंबध निर्माण होतील.

 

वृषभ -नात्यातील तणाव वाढेल

आज तुमच्या नात्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. कोर्ट कचेरीतून आराम मिळेल. 

मिथुन – धनलाभाचा योग आहे

आज तुम्हाला शेअर मार्केटमधून धनलाभाचा योग मिळणार आहे. खरेदीमध्ये व्यस्त राहणार आहात. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा.

कर्क – पोटाच्या समस्या जाणवतील

आज तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवणार आहेत. इनफेक्शन होऊ शकतं. सहकाऱ्यांकडून त्रास मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या  ठिकाणी वेळेवर काम करण्याची सवय लावा. सामाजिक मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन सहकारी मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह –  प्रेमात पडण्याची शक्यता आहे

आज तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक साथ चांगली मिळेल. एखाद्या संस्थेद्वारा मानसन्मान मिळेल. व्यवसायात भागीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. 

कन्या – कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार आहे

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार आहे. वादविवादांपासून दूर राहा. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. मुलांकडून शुभवार्ता मिळेल. 

तूळ-  अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांकडून भेटवस्तू मिळतील. परदेशी जाण्याची शक्यता आहे. एखाद्या नव्या कामांच्या योजना आखाल. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक – महत्त्वाची कामे करणे सध्या टाळा

व्यवसायाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणे सध्या टाळा. पदोन्नतीमध्ये अडचणी येणार आहेत. विरोधकांपासून सावध राहा. आईवडीलांची साथ मिळेल. प्रेमसंबंधाबाबत सावध राहा. 

 

धनु – जोडीदाराला आरोग्य समस्या जाणवतील

जोडीदाराला काही शारीरिक समस्या जाणवतील. मित्रांकडून सहकार्यांने बिघडलेली कामे सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या  ठिकाणी तुमचे कौतुक होईल. धार्मिक कार्यात रस वाढवा. 

मकर – नातेवाईक आनंद मिळेल

संकटकाळी नातेवाईंक आणि मित्रमंडळी साथ देतील. टिकेपासून दूर राहा. बोलताना सावध राहा. नोकरीचा ताण कमी राहील. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. 

 

 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य