भविष्य

22 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना भाग्योदयाचा योग

Rama Shukla  |  Sep 19, 2019
22 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना भाग्योदयाचा योग

मेष – बेरोजगार लोकांच्या समस्या वाढतील

आज बेरोजगार लोकांच्या समस्या वाढणार आहेत. व्यावसायिक प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागणार आहेत. राजकारणात यश मिळण्याची शक्यता  आहे. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदी होईल. धार्मिक कार्यातील क्षद्धा वाढणार आहे.

कुंभ – मित्रांकडून भेटवस्तू मिळतील

आज नवीन संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल. मित्रांकडून भेटवस्तू अथवा धनसंपत्ती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. पदोन्नतीचा योग आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. जीवनात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असेल.

मीन – मोठा वाद होण्याची शक्यता

आज तुमच्यामुळे एखादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वांच्या सहकार्यांने कामे लवकर पूर्ण होतील. जुन्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी खुश असतील. परदेशी जाण्याचा योग आहे. 

 

वृषभ – भाग्योदय होण्याचा योग आहे

आज तुमच्या आयुष्यात भाग्योदयाची संधी आहे. विरोधकांना यश मिळेल. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिक ओळखीतून फायदा होईल. प्रिय व्यक्तीशी भेट आनंदादायी असेल. परदेशी जाण्याचा योग आहे. 

मिथुन – दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमवाल

आज विद्यार्थी दुर्लक्ष केल्यामुळे चांगली संधी गमवणार आहेत. व्यवसाय आणि नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदवार्ता समजेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. 

कर्क – तणाव वाढण्याची शक्यता 

आज व्यापारात नुकसान झाल्यामुळे चिडचिड आणि तणाव वाढणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. बिघडलेली कामे पूर्ण होतील. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

सिंह – अविवाहितांसाठी अनुकूल काळ आहे

आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होईल. अविवाहितांसाठी चांगला काळ आहे. विवाहाचे योग आहेत. कोर्ट-कचेरीतून सुटका मिळेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 

कन्या – व्यवसायात यश मिळेल

आज तुम्हाला तुमच्या कामातील कौशल्यामुळए चांगला लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात यश मिळण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ – आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता

आज कोणालाही उधारी देऊ नका. पैसे परत मिळणार नाहीत. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. कौटुबिक सहकार्यामुळे कठीण कामे पूर्ण कराल. 

 

वृश्चिक – तब्येत बिघडण्याची शक्यता 

आज तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असेल. कोणाचाही वाईट विचार करू नका. याचा परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. 

धनु – मित्रांची साथ वेळेवर मिळेल

आज तुम्हाला गरजेच्यावेळी मित्रांची साथ मिळणार आहे. प्रेमात त्रिकोण निर्माण होऊ शकतो. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल. व्यावसायिक कामांसाठी परदेशी जाण्याचा योग आहे.

मकर – वातावरणात बदल जाणवतील

आज तुम्हाला वातावरणात बदल जाणवणार आहेत. शारीरिक कमजोरी आणि थकवा जााणवेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

Read More From भविष्य