भविष्य

24 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ

Rama Shukla  |  Feb 13, 2020
24 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ

मेष – उधारी परत मिळेल

आज तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. राजकारणातील जबाबदारी वाढेल.  

कुंभ – जोडीदाराची काळजी घ्या

आज तुम्हाला एखादा प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे सामाजिक मानसन्मान वाढेल. प्रभावशाली लोकांची भेट होईल. व्यावसायिक कामे फायद्याची ठरतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.

मीन- अभ्यासातील समस्या वाढणार आहेत

आज अभ्यासातील समस्या वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी व्यर्थ गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. मुलांकडून खुशखबर मिळेल. जोडीदाराशी नातेसंबंध चांगले होतील. प्रवासाला जाणे टाळा. 

वृषभ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. नवीन कामे सुरू करणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत धार्मिक ठिकाणी जाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन – जोडीदारासोबतचा तणाव वाढेल

आज घरातील प्रमूख व्यक्तीकडून तणाव वाढणार आहे. इतरांच्या सांगण्यावरून स्वतःच्या घरातील वातावरण बिघडवू नका. नवीन कामे मिळतील. रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. 

कर्क – जोडीदाराशी नातेसंबंध मजबूत होईल

जोडीदाराशी नाते मजबूत होणार आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. परदेशात जाण्याचा योग आहे.

सिंह –  व्यवसायातील अडचणी कमी होतील

आज तुमच्यासाठी उच्च शिक्षणाचा योग आहे. व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. 

कन्या – तोट्याच्या व्यवसायात पैसे गुंतवू नका

आज कोणत्याही तोट्यात सुरू असलेल्या व्यवसायात पैसे गुंतवू नका. प्रॉपर्टीच्या बाबतीत कोर्ट कचेरीत जावे लागेल. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे करण्यात यश मिळेल. 

तूळ – आरोग्य चांगले असेल

तणावमुक्त राहील्यामुळे आरोग्य चांगले राहील. विचारांमधील सकारात्मकता वाढेल. कामच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. पदोन्नती होण्याचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. देणी – घेणी करताना सावध राहा. 

वृश्चिक –  नातेसंबधात दूरावा येईल

नातेसंबंधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा. नवीन जबाबदाऱ्यांमुळे व्यस्त राहाल. सामाजिक संस्था द्वारा सन्मान मिळेल. प्रवासाचा योग आहे.  

 

धनु – धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल

आज व्यवसायातून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून मानसन्मान मिळेल. लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा आनंद मिळेल. आत्मविश्वास वाढेल. 

मकर –  नवीन कामाला सुरूवात करू नका

आज नव्या कामाला सुरूवात करू नका. निराशा वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक विचारांचा  प्रभाव असेल. व्यवसायात नवीन टेकनिकमुळे त्रास वाढणार आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य