भविष्य

29 मार्च 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळेल नवीन काम

Rama Shukla  |  Mar 24, 2020
29 मार्च 2020 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळेल नवीन काम

मेष – कठीण काळात मिळेल वडीलांची साथ 

आज कुटुंबासोबत दिलखुलास गप्पा मारण्याचा योग आहे. तुमचा मानसिक तणाव यामुळे कमी होईल. वडिलांची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी पूर्ण कराल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

कुंभ – व्यवसायात चढ आणि उतार

आज व्यवसायात चढ आणि उतार जाणवणार आहेत. मेहनत जास्त फळ कमी मिळेल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. देणी घेणी सांभाळून करा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 

मीन-  गुडघ्याचे दुखणे वाढण्याची शक्यता

गुडघ्याची दुखणी वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीत यश मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. प्रेमात तणाव वाढण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहे. 

वृषभ –  नवीन काम सुरू कराल

आज एखादे नवे काम तुम्ही सुरू करणार आहात. येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर धनसंपत्ती आणि मानसन्मान मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. नात्यातील गोडवा वाढणार आहे. 

मिथुन –  वेळ आणि पैशांचे नुकसान होईल

आज विनाकारण तुमच्या वेळ आणि पैशांचे नुकसान होणार आहे. उत्पन्न आणि खर्चात वाढ झाल्याने निराश व्हाल. कामाचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. जुन्या चुकांमध्ये धडे शिकाल. कुटुंबियांच्या बोलण्याचे फार मनावर घेऊ नका. 

कर्क – जोडीदाराचा हेल्द रिपोर्ट चांगला येईल

आज तुमच्या जोडीदाराचा हेल्द रिपोर्ट चांगला असेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायातील योजना सफळ होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याची चांगली साथ मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

सिंह –  कौटुंबिक वाद होण्याची शक्यता 

आज घरात कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीच्या लोकांसोबत सावध राहा. उत्पन्नाची नवीन साधने मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या –  प्रॉपर्टीचे हक्क मिळणार आहेत

आज तुम्हाला प्रॉपर्टीचे हक्क मिळणार आहेत. उत्पन्नाची नवीन साधने मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंद वार्ता मिळणार आहे. कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे टाळा. वाहन चालवताना सावध राहा. 

तूळ- शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल

आज विनाकारण दगदग करू नका. शारीरिक थकवा  आणि अशक्तपणा जाणवेल. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायासाठी प्रवास करताना सावध राहा. देणी घेणी सांभाळून करा. 

वृश्चिक – नवीन प्रेम प्रस्ताव मिळेल

आज तुम्हाला नवीन प्रेमप्रस्ताव मिळेल. भावनाप्रधान व्यक्तीसोबत नाते जुळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचे कौतुक करतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. 

धनु –  विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवेल

आज विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत समस्या जाणवतील. वादविवाद करणे टाळा. कामाच्या ठिकाणी समस्या होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी सतावेल. 

मकर – चल- अचल संपत्ती खरेदी कराल

चल – अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. देणी घेणी करताना सावध राहा. परदेशी जाण्याचा योग आहे. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. जोखिमेची कामे करणे टाळा. 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

 

Read More From भविष्य