मेष – धनप्राप्तीचा योग
आईकडून धनप्राप्तीचा योग आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यावसायिक विस्तारासाठी प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचा योग आहे.
वृषभ – पोटाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
प्रवास आणि अयोग्य आहाराबाबत सावध राहावं लागेल. पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त व्हाल. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इतरांच्या हस्तक्षेपामुळे निराश व्हाल. प्रेमसंबंधात समाधान मिळेल.
मिथुन – एखाद्याची खास भेट होईल
जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात अशा व्यक्तीशी भेट होईल. जोडीदाराशी नाते सुधारेल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल.
कर्क – कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल
आज अधिकाऱ्यांमुळे तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. बोलताना सावध राहा. विरोधकांपासून सावध राहा. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून शुभवार्ता मिळेल.
सिंह – धनलाभाचा योग
आज तुम्हाला धनलाभाचा योग आहे. भागिदारीत नवे काम सुरू करा. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. खर्चामध्ये नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा.
कन्या – चांगली संधी गमवाल
आज तुम्ही तुमच्या निष्काळजीपणामुळे चांगली संधी गमवाल. व्यवसायात चढ-उतार येतील. अधिकाऱ्यांचा तणाव वाढेल. विरोधकांकडून आव्हान मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
तूळ – आरोग्य बिघडेल
व्यावसायित तणाव दूर होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसंबंधी वाद मिटतील. धुर्त लोकांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळतील. धार्मिक कार्यात मन रमवाल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक – नातेसंबंधात जवळीक वाढेल
आज तुमचे जोडीदारासोबत असलेल्या तक्रारी दूर होतील. भावनिक आधार वाटेल. एकटेपणा दूर होईल. नवीन व्यावसायिक संबंध वाढतील. रचनात्मक कार्यात रस वाढेल.
धनु – व्यवसायात यश मिळेल
आज तुम्हाला भाग्योदयाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. आत्मविश्वास आणि सामाजिक मानसन्मान वाढेल.
मकर – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला भागिदारीत नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढण्याची शक्यतादेखील आहे. ज्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात मन रमवा. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
कुंभ – लवकरच आरोग्यात सुधारणा होईल
एखाद्या जुन्या आजारपणातून आराम मिळेल. फोन बंद करून आराम करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
मीन- कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता
आज तुमच्या घरात वाद होण्याची शक्यता आहे. कटू बोलण्यामुळे लोक तुमच्यावर नाराज होतील. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढतील. सहज वाटणारी कामे रखडण्याची शक्यता आहे. सावध राहा.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje