DIY सौंदर्य

काय आहे हॉट टॉवेल स्क्रब, जाणून घ्या फायदे

Trupti Paradkar  |  Aug 30, 2021
hot towel scrub benefits

वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा त्वचेवर वाईट परिणाम होताना दिसतो. ज्यामुळे मग त्वचा कोरडी होणं, निस्तेज दिसणं, डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, ओपन पोअर्स अशा अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात. ब्लॅक आणि व्हाईड हेड्स काढण्यासाठी तुम्ही आजवर विविध प्रकारचे स्क्रब वापरले असतील, केमिकलयुक्त ब्युटी ट्रिटमेंटपासून ते अगदी घरगुती नैसर्गिक घटकांचा वापर करून अनेक पद्धतीने ब्ल२क हेड्स काढता येतात. पण तुम्हाला यासाठी प्रभावी असलेलं हॉट टॉवेल स्क्रब माहीत आहे का, नसेल तर जाणून घ्या हॉट टॉवेल स्क्रबचे हे फायदे…ज्यामुळे घरच्या घरी दूर करता येईल चेहऱ्यावरील काळसरपणा, ब्लॅक हेड्स  आणि व्हाईट हेड्स

चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब

हॉट टॉवेल स्क्रब कसे करावे 

मुळातच हॉट टॉवेल स्क्रब हा एक साधा आणि सोपा घरगुती उपाय आहे. यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केला जात नसल्यामुळे तो त्वचेसाठी अतिशय सुरक्षित आहे. शिवाय या हॉट टॉवेल स्क्रबमुळे तुमची त्वचा आणि चेहऱ्याला छान स्टीम मिळते. थकवा आणि ताणतणाव दूर करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. ही स्क्रिन ट्रिटमेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक टर्किशचा टॉवेल गरम पाण्यात बुडवून पिळून घ्यायचा आहे. हा गरम पाण्यामुळे स्टीम झालेला टॉवेल घट्ट पिळून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवत मालिश करायचं आहे. टर्किशचा टॉवेल मुळातच जाड आणि खरखरीत असल्यामुळे तो एखाद्या उत्तम स्क्रबसारखा परिणाम करतो. शिवाय गरम पाण्यात बुडवल्यामुळे तुमच्या त्वचेवरील टीश्यू, पोअर्स शिथिल होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेमधील घाण, धुळ,प्रदूषण, डेड स्किन निघून जाते. मात्र लक्षात ठेवा टॉवेल फार खरखरीत असणार नाही. कारण असं असेल तर तुमच्या त्वचेवर याचे ओरखडे उठू शकतात. शिवाय पाणीदेखील जास्त गरम असता कामा नये कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

गव्हाच्या कोंड्यापासून बनवा फेस आणि बॉडी स्क्रब, त्वचा होईल चमकदार

हॉट टॉवेल स्क्रबचे  फायदे

हॉट टॉवेल स्क्रब करण्याचे अनेक फायदे त्वचेवर दिसून येतात. ज्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि चमकदार दिसू  लागते.

त्वचेचे सौंदर्य खुलवेल सी सॉल्ट स्क्रब (Sea Salt Scrub For Skin In Marathi)

Read More From DIY सौंदर्य