DIY सौंदर्य

सुंदर त्वचेसाठी कोलॅजन ड्रिंक्स कसे येते कामी

Leenal Gawade  |  Jun 9, 2022
त्वचेसाठी कोलॅजन कसे करते काम

 त्वचा चांगली राहावी यासाठी प्रत्येकाचे काही ना काही रुटीन ठरलेले असते. सकाळी उठून मस्त गरम पाणी- लिंबू, काढे किंवा अन्य काही प्रयोगही करायला आपण कमी जास्त करत नाही. सुंदर त्वचा ही फक्त बाहेरुन नाही तर आतून मिळवावी लागते हे आता सगळ्यांनाच कळाले आहे. म्हणूनच हल्ली खूप जण आहार चांगला घेण्याकडे अधिक कल घेतात. त्वचेसाठी कोलॅजन ( collagen) हा घटक खूपच जास्त महत्वाचा आहे. याचा मुबलक प्रमाणात पुरवठा त्वचेला झाला तर त्याचा फायदा त्वचेला होण्यास मदत मिळते. पण त्वचेसाठी कोलॅजन कसे काम करते हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात

कोलॅजन म्हणजे काय?

त्वचेच्या आतील थर

कोलॅजन हा शरीरातील असा घटक आहे जो आपले शरीराचे टिश्यू एकत्र ठेवण्याचे काम करतो.  तुमच्या त्वचेला स्ट्रेंथ आणि ईलास्टिसिटी देण्याचे काम कोलॅजन करते. आपल्या शरीरात आधीपासूनच कोलजॅन असते.  इन्डोजिनिअस कोलॅजन (Endogenous Collagen)  हे आपल्या शरीरात आधीपासूनच असते. तर एक्सोजिनिअस कोलॅजन (Exogeneous collagen) हे आपल्याला सप्लिमेंट्सच्या माध्यमातून मिळत असते. चांगल्या त्वचेसाठी  एक्सोजिनिअस कोलॅजन घेतले जाते जी त्वचेला सुंदर करण्याचे काम करत असते. वयानुसार त्वचेमध्ये कोलॅजन कमी होत जाते. यालाच वृद्धत्व किंवा म्हातरपण असे म्हणतात. जसे जते आपले वय गोऊ लागते. तसतसे आपल्या त्वचेवरील कोलॅजन घटक कमी होऊ लागतात. त्यामुळे आपल्या अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कोलॅजन वाढवणारे, कोलॅजन बुस्ट करणारे घटक असतात.  

अधिक वाचा : सुपरफूड मोरिंगाचे सौंदर्यवर्धक फायदे करतील आश्चर्यचकित

कोलॅजन असणारे ड्रिंक्स

त्वचेसाठी कोलॅजन

हल्ली बाजारात कोलॅजन असणाऱ्या पावडर आणि गोळ्या मिळतात. ज्या तुमच्या त्वचेतील कोलॅजनला बुस्ट करण्याचे काम करतात. तुम्ही योग्य सल्ला घेऊन तुम्ही कोलॅजन ड्रिंक्सचा समावेश करु शकता. कोलॅजन असणाऱ्या ड्रिंक्सचे कोणतेही तोटे नाहीत पण तरी देखील तुम्हाला योग्य सल्ला घेऊन मग त्याचे सेवन केले तरी चालू शकेल. 

अधिक वाचा: विटामिन ए क्लिंन्झरचे काय आहेत त्वचेसाठी फायदे

कोलॅजन तुमच्या त्वचेवर कसे करते काम

कोलॅजनचे सेवन तुम्ही करायला सुरु केल्यानंतर तुमच्या त्वचेत नेमका कोणता परिणाम होतो ते जाणून घेऊया. 

  1. कोलॅजन ड्रिंक्स किंवा पावडरमध्ये अमिनो ॲसिड असते. जी त्वचा युथफुल ठेवण्यासाठी मदत करते. 
  2. त्वचेमध्ये अमिनो ॲसिडचे घटक वाढले की, ते त्वचेमध्ये हायलोरोनिक ॲसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसू लागते.
  3. त्वचा रुक्ष झाली असेल किंवा सीबम वाढल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ लागले असतील तर कोलॅजन त्याला दुरुस्त करण्याचे काम करते. 
  4. कोलॅजन अगदी कोणत्याही स्वरुपात घेतले तरी देखील त्याचा फायदा काही काळानंतरच तुम्हाला जाणवू लागतो. 
  5. कोलॅजन सुरु केल्यानंतर तुमची त्वचा एकसारखी दिसायला सुरुवात होते. त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. 

आता तुम्हीही कोलॅजन घेतल्यानंतर तुमच्यात हे बदल होतात की नाही हे नक्की पाहा.

अधिक वाचा : परफ्युम जास्त काळ टिकवायचे असेल हे पॉईंटस करा कव्हर

Read More From DIY सौंदर्य