लग्नसराई

लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे, मग या गोष्टी ठेवा लक्षात

Trupti Paradkar  |  Jan 6, 2021
लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे, मग या गोष्टी ठेवा लक्षात

लग्नानंतर स्वतःचा स्वतंत्र राजाराणीचा संसार असावा असं प्रत्येक मुलींचं स्वप्न असतं. मात्र एकत्र आणि मोठ्या कुटुंबात संसार करण्याची बातच निराळी आहे. म्हणूनच आजही अनेक कुटुंब एकत्र राहण्यालाच पसंती देतात. एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. लग्नानंतर तुम्ही अशा एकत्र कुटुंबात राहणार की स्वतंत्र आणि छोट्या कुटुंबात हे तुम्हाला लग्नाआधीच माहीत  असायला हवं. कारण नववधूला एकत्र कुटुंबात अॅडजस्ट होण्यासाठी खूप वेळ आणि मानसिक तयारीची गरज असते. पण जर लग्नानंतर तुम्हीदेखील अशा मोठ्या आणि एकत्र कुटुंबात जाणार असाल तर या काही गोष्टी अवश्य जाणून घ्या.

कुटुंबात तुमच्या पतीचे काय स्थान आहे –

एकत्र कुटुंबात राहण्यास काहीच हरकत नाही मात्र तिथे  तुमचे आणि  तुमच्या पतीचे काय स्थान आहे हे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या पतीचा व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक गुंतवणूक या घरातील इतर सदस्यांसोबत जोडलेल्या असतील तर भविष्यात त्यामुळे गुंतागूंत होऊ शकते. यासाठीच एकत्र कुटुंबात लग्न ठरवण्यापूर्वी या गोष्टी आधीच समजून घ्या. यासाठी लग्नाआधीच तुमच्या पतीसोबत याबाबत मोकळेपणाने चर्चा करा. ज्यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल याची तुम्हाला कल्पना येईल.

Instagram

कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती –

लग्नानंतर जर तुम्ही एका मोठ्या आणि एकत्र राहणाऱ्या कुटुंबात जाणार असाल तर त्याआधी घरातील सर्व सदस्यांचा तुमच्याशी परिचय असायला हवा. ज्यामुळे त्यांच्यासोबत जुळवून घेणं तुम्हाला सोपं जाईल. घरात एकूण किती सदस्य आहेत, त्यांचे तुमच्यासोबत काय नातं आहे, त्यांच्या स्वभाव कसा आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत याबाबत बेसिक माहिती असेल तर एकत्र कुटुंबात तुम्ही पटकन अॅडजस्ट होऊ शकता. यासाठी घरातील मोठ्यांचा आदर आणि लहानांना प्रेम देण्याचा प्रयत्न करा. 

Instagram

आता जबाबदारी वाढणार याची कल्पना असू द्या –

जर माहेरी तुम्ही अगदी लहान कुटुंबात वाढलेल्या असाल आणि लग्नानंतर तुम्हाला मोठ्या कुटुंबात नांदायचं असेल थोडी तडजोड करावीच लागेल. कारण  मोठं कुटुंब म्हणजे प्रत्येकाला काही ना काही तरी जबाबदारी असणारच. त्यात तुमचं सासरच्या घरातील स्थान काय आहे यावर तुमची जबाबदारी ठरणार. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पेलवू शकाल का याचा अंदाज घेऊनच लग्नाचा निर्णय घ्या. कारण अशा मोठ्या आणि एकत्र कुटुंबात राहून तुम्हाला तुमच्या जबाबदारी पासून पळ काढता येणार नाही.

नातेसंबधांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या –

मोठं कुटुंब म्हणजे जास्त माणसं… आणि जिथे जास्त माणसं एकत्र येतात तिथे थोडे फार गैरसमज होणार हे गृहितच धरायला हवं.  त्यामुळे लग्नाआधीच अशा नकारात्मक विचारांनी घरात प्रवेश करू नका. घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर बाळगा.  ज्यामुळे त्या व्यक्तीदेखील तुम्हाला आनंदाने स्वीकारतील. तुमच्या मनात असणारे पूर्वग्रह आणि छोटे मोठे गैरसमज दूर करता आले तर मोठ्या कुटुंबात संसार करण्याची मजा तुमच्या नक्कीच लक्षात येईल. शेवटी घर हे त्यात राहणाऱ्या लोकांमुळे मजबूत होतं आणि मोठ्या, एकत्र कुटुंबातील माणसं हीच त्या घराती खरी शक्ती असते. 

Instagram

आम्ही शेअर केलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अशी निवडा परफेक्ट साखरपुड्याची अंगठी

डेस्टिनेशन वेडिंग बजेटमध्ये करायचे असेल तर असे करा प्लॅनिग

नववधूच्या बॅगेत ‘या’ गोष्टी असायलाच हव्या (Ideas For Wedding Gift Bag In Marathi)

Read More From लग्नसराई