मेकअपचा बेस चांगला झाला की, सगळा मेकअप सुंदर दिसतो. हे आपल्यापैकी कित्येक मेकअप प्रेमींना माहीत आहे. पण तरीदेखील खूप जण बेस लावताना अशा काही चुका करतात. त्यामुळे त्यांचा मेकअप हा खूपच केकी दिसतो. जवळून पाहिल्यानंतर मेकअप केल्यासारखा दिसून येतो. मेकअप केल्यानंतर तो दिसून येणे म्हणजे तुम्ही मेकअप करण्यात कुठेतरी कमी पडलात इतके नक्की! खूप जणांच्या मेकअपमधील सर्वात मोठी चुकी म्हणजे त्या मेकअपचा बेस. आता बेस म्हणजे नेमके तरी काय आणि तो करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते आज आपण जाणून घेऊया.
बेस म्हणजे काय?
खूप जणांना बेस काय असतो तेच कळत नाही. कोणताही मेकअप करताना त्याचा बेस हा फार महत्वाचा असतो. हा बेस फाऊंडेशन, कॉन्टोरिंग आणि केक पावडर असे मिळून मेकअपसाठी तयार केलेला चेहरा असतो. खूप जणांना फाऊंडेशनची योग्य शेड निवडणे देखील तितकेच गरजेचे असते. तरच तुमचा बेस चांगला होण्यासम मदत मिळते. चांगले प्रॉडक्ट असण्यापेक्षा तुम्हाला किती सफाईपणे तो करता येतो हे यामध्ये खूपच जास्त गरजेचे असते.
बेस लावताना
बेस कसा लावावा याची थोडी आयडिया आली की तुमचा बेस चांगलाच लागणार आणि इतरांप्रमाणे तुमची त्वचा नॅचरलच दिसेल जाणून घ्या त्यासाठी खास टिप्स
- कोणताही मेकअप करण्याआधी तुमचा चेहरा हा स्वच्छ असायला हवा.त्यामुळे चेहरा चांगल्या क्लिन्झरने क्लिन्झ करा.
- बेस लावण्यापूर्वी तुम्ही चांगले मॉश्चराईज लावायला हवे. मॉश्चराईज लावले तर त्यामुळे फाऊंडेशन लागण्यास मदत मिळते. चेहऱ्याला चांगले मॉश्चरायझर लावा.
- मॉश्चरायईझर चेहऱ्यावर चांगला मुरु द्या. त्यानंतरच तुम्ही तुमचा मेकअप करायला घ्या.
- बेस लावताना तुम्ही तुमच्या गालापासून सुरुवात करा. गाल, कपाळ, हनुवटी या ठिकाणी फाऊंडेशन लावायला घ्या.
- चेहरा स्वच्छ आणि नितळ असेल तर विशेष काही मेहनत घ्यावी लागत नाही. पण जर त्वचेवर बारीक बारीक पुळ्या किंवा पिंपल्स असतील तर अशावेळी तुम्हाला ते लपवणे गरजेचे असते. हिरवा आणि केशरी रंगाचे फाऊंडेशन लावून त डाग लपवता येतात.
- बेस लावल्यानंतर तुम्ही ते चांगला एकसारखा लावा.कमी-जास्त असा बेस लागला की, तो मेकअप केकी किंवा कमी झाला तर त्यामध्ये तुमची त्वचा दिसण्याची शक्यता असते.
- बेस लावताना खूप जण कपाळाला विसरुन जातात. असे अजिबात करु नका. कारण त्यामुळे खूप जणांचा मेकअप हा डोळ्याच्या खाली दिसतो. कपाळावर अजिबात दिसत नाही.
- बेस लावताना तो सगळीकडे नीट लावायला ब्रश किंवा स्पाँजचा वापर करा. चेहरा हायड्रेट असेल आणि फाऊंडेशन चांगले असेल तर ते चेहऱ्यावर चांगले पसरते.
- फाऊंडेशन सुकलेले असेल तर त्यामध्ये मॉश्चरायझर टाका त्यामुळे ते पातळ होण्यास मदत मिळते.
आता बेस लावताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.