आपले सौंदर्य वाढण्यासाठी आपण आपल्या त्वचेसोबतच केसांची आणि हातांची विशेष काळजी घेतो. आपल्यापैकी अनेकांना हात सुंदर दिसण्यासाठी विविध शेड्सचे नेलपेंट लावायला आवडते. पण अनेक वेळा नकळत स्त्रिया चुकीच्या पद्धतीने नेलपेंट लावून हातांचे सौंदर्य कमी करतात. सुंदर दिसण्यासाठी नखांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया नेल पॉलिश लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
जुन्या नेलपेंटवरच नवीन नेलपेंट लावणे
अनेक स्त्रिया जुने नेल पॉलिश अर्धवट निघाले असेल तर ते पूर्ण न काढता घाईघाईने त्यावरच नवीन नेल पॉलिशचा कोट लावतात. असे केल्याने नखांचे खूप नुकसान होऊ शकते. नेल पॉलिश लावण्यापूर्वी जुने नेल पॉलिश काढून टाका. यानंतर, नखे पूर्णपणे स्वच्छ करा आणि मगच नवीन शेड लावा.
नखे स्क्रॅच करणे
नेलपेंट लावल्यानंतर काही दिवसांनी ते निघू लागते. किंवा नखांची वाढ झाल्यावर नखांवर लावलेले नेलपेंट अर्धवट दिसू लागते. अशा स्थितीत अनेक महिला नखांनी स्क्रॅच करून ते अर्धवट निघालेले नेलपेंट काढतात. यामुळे नखांचे खूप नुकसान होते. नेलपॉलिश स्क्रॅच केल्याने नखांचा वरचा थर निघून जातो, ज्यामुळे नखांची चमक तर कमी होतेच पण नखे कमकुवत देखील होतात.
नेलपेंट कोरडे होऊ न देणे
नेलपेंट लावल्यानंतर महिला काही वेळातच काम करू लागतात ज्यामुळे त्यांचे नेल पेंट खराब होते. महिलांना असे वाटते की नेल पेंट लावल्यानंतर 10 मिनिटांनंतर ते पूर्ण सुकते. परंतु तसे होत नाही. नेलपेंट लावल्यानंतर किमान 30 मिनिटांपर्यंत ते खराब होईल असे कोणतेही काम करू नका.
अधिक कोट लावणे
नेलपॉलिशचा एक कोट लावल्याने नेलपॉलिशचा खरा रंग दिसत नाही. अशा परिस्थितीत स्त्रिया नखांवर नेलपेंटचे अनेक कोट लावतात. अनेक कोट लावल्यानंतर नेलपेंट लवकर कोरडे होत नाही आणि ते लवकर निघून जाते. नेलपेंटचे कायम दोनच कोट लावा. नेलपेंटचे दोन कोट सुंदर हातांसाठी योग्य आहेत.
चुकीचे नेल पेंट रिमूव्हर वापरणे
अनेक वेळा चुकीचे नेलपेंट रिमूव्हर वापरल्याने नखांना इजा होऊ शकते. नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये ऍसिटोन हे केमिकल असते ज्यामुळे नखे खराब होतात. नेल पॉलिश काढण्यासाठी, एसीटोन नसलेले नेलपेंट रिमूव्हर वापरा.
व्हिनेगर वापरा
बेस कोट लावण्यापूर्वी एकदा नखांना व्हिनेगर लावण्याची शिफारस केली जाते. इअरबड्सच्या मदतीने तुम्ही ते नखांवर लावू शकता. व्हिनेगर नैसर्गिक तेल काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे नेल पेंट जास्त काळ टिकते. नखांवर लावलेले व्हिनेगर कोरडे होताच तुम्ही बेस कोट लावू शकता.
नेलपॉलिश लावताना बाटली चांगली हलवून घ्या
जर तुमचे नेलपेंट बराच काळ न वापरता तसेच ठेवले असेल, तर वापरण्यापूर्वी तुम्ही ते चांगले रोल करा जेणेकरून त्याचा फॉर्म्युला व्यवस्थित एकत्र मिसळेल. बहुतेक स्त्रिया नेलपेंटची बाटली हलवतात, त्यामुळे त्यातील हवेमुळे छोटे बबल्स तयार होतात. बुडबुडे असलेले नेलपेंट व्यवस्थित लागत नाही.
नेल पॉलिश थंड हवेत सुकवा
नेलपेंट गरम हवेत चांगले सुकत नाही, उलट त्याचा पोत खराब होऊ शकतो. नखांना नेलपेंट लावल्यावर ते नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. याशिवाय, तुम्ही ब्लो ड्रायर वापरू शकता, फक्त त्याची सेटिंग थंड हवेवर सेट करा. नेलपेंट सुकविण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशी दुसरी पद्धत म्हणजे तुमची बोटे दोन ते तीन मिनिटे बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
तुमच्या शरीराप्रमाणे तुम्हीही तुमच्या नखांचीही काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना दिवसभर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी रोज योग्य प्रमाणात पाणी प्या. यासोबतच नखांना तेलाने मसाज करा म्हणजे ते तुटणार नाहीत आणि खराब होणार नाहीत.
फोटो क्रेडिट – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक