DIY सौंदर्य

केकी मेकअप टाळायचा असेल तर करु नका या चुका

Leenal Gawade  |  Sep 7, 2021
केकी मेकअप

 मेकअप करायचा म्हणजे तो थापायचा नसतो. बाजारात मिळणारे मेकअपचे सगळे साहित्य लावल्यामुळे सुंदर आणि परफेक्ट मेकअप होतो असा जर तुमचा विचार असेल तर असे मुळीच नाही. कारण खूप जास्त मेकअप हा तुमचा लुक केकी करु शकतो. मेकअप केल्यानंतर तुमचा मेकअप लुक खूप केकी किंवा खूप थर लावलेला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मेकअपमध्ये काही चुका करत आहात.केकी मेकअप लुक टाळायचा असेल तर तुम्ही काही चुका टाळायला हव्यात त्या जाणून घेऊया.

फाऊंडेशनचा थर

फाऊंडेशन हा त्वचेचा पोत एकसारखा करण्यास जरी कारणीभूत ठरत असला तरी देखील त्याच्या अति लावण्यामुळे चेहऱ्यावर थर लागल्या सारखा वाटू शकतो. फाऊंडेशन लावताना त्याचा थर अजिबात लावू नका. अगदी मोजकेच टिपके चेहऱ्यावर लावून तुम्ही फाऊंडेशन पसरवू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक चांगला दिसू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक चूक टाळायची असेल तर तुम्ही फाऊंडेशनचा थर लावू नका.

फेस कटिंगचा अतिरेकपणा

 खूप जणांना फेस कटिंग करायला आवडते. त्यामुळे चेहरा हा अधिक लहान आणि चांगला दिसतो. पण त्यासाठी वापरत असलेले कॉन्टोरीं किट जास्त अति लागले तर तुमचे चेहरा खूप मेकअप केलेला दिसतो. विशेषत: नाकाकडील तुमचा भाग अती खोटा दिसतो. त्यामुळे फेस कटींग, नोझ कटींग हे जास्त करु नका.

पावडर करा कमी

खूप जखूप जण मेकअप सेट करण्यासाठी ड्राय पावडर लावतात. ही ड्राय पावडरही प्रमाणात लावायला हवी. जर ती खूप लागली तर फाऊंडेशन हे अती दिसू लागते. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर ज्यावेळी पावडर लावता त्यावेळीही तुमचा मेकअप दिसू लागते.  त्यामुळे तुम्ही प्रमाणात पावर लावा. पावडर लावल्यामुळे तुमचा चेहरा कधी खूप वेळा वेगळा दिसतो. ब्रशच्या साहाय्याने मेकअप करा. त्यामुळे तो बरेचदा चेहऱ्यावर एकसारखा लागण्यास मदत मिळते.

आयशॅडोचा करा कमी वापर

खूप जणांना डोळ्याचा मेकअप खूप जास्त करायला आवडतो. डोळ्यांचा मेकअप जितका चांगला असेल तितका मेकअप चांगला दिसतो असे अनेकांना वाटते. पण जर तुम्ही डोळ्यांना जास्त मेकअप करत असाल तर असा मेकअप खपली पडून निघू लागतो. त्यामुळे आयशॅडोचा वापर करताना तो डोळ्यांचा पापण्या जड करणार नाही याची काळजी घ्यायला अजिबात विसरु नका. 

प्रत्येकीच्या बॅगमध्ये असायलाच हवेत असे पाऊच

सतत करु नका टचअप

टचअप करण्याचा अर्थ हा मेकअप जागच्या जागी आहे का नाही ते बघणे असते. पण काही जण मेकअप हा सतत पुन्हा पुन्हा करायचा नसतो त्यापेक्षा चेहऱ्याला घाम आला असेल तर तो घाम पुसून काढा. असे केल्यामुळे  मेकअपचा थर चेहऱ्यावर होतो. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर सतत टचअप करु नका. त्यामुळेही मेकअप हा केकी दिसू लागतो. 

आता या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचा मेकअप मुळीच केकी दिसणार नाही.

Read More From DIY सौंदर्य