भात हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. साध्या वरणभातापासून निरनिराळ्या प्रकारचे भाताचे प्रकार भारतीय खाद्य संस्कृतीत आहेत. डाएटमधून भात स्किप करण्याचा कितीही विचार केला तरी न राहवून घासभरी तरी भात पोटात ढकललाच जातो. कारण काहिंना भात जेवल्याशिवाय पोट भरत नाही असं वाटतं. असं असलं तरी दुपारच्या जेवणात भात खाणं तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतं. कारण दुपारी भात जेवल्यावर खूप सुस्ती येते आणि सतत झोपावसं वाटतं. जर तुम्ही घरी असाल अथवा कामाला सुट्टी असेल तर ठीक आहे. पण जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल अथवा घरातून वरिक फ्रॉम होम करत असाल तर भात खाण्यामुळे तुमची चांगलीच पंचाईत होऊ शकते. यासाठी जाणून भातामुळे का येते झोप आणि भात खाऊनही दुपारच्या झोपेला कसं करावं मॅनेज यासोबतच वाचा रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य
भात खाण्यामुळे झोप का येते
तांदळापासून भात तयार केला जातो. भातामध्ये कार्ब्स आणि ग्लुकोजचे प्रमाण इतर पदार्थांपेक्षा जास्त असते.सहाजिकच भात खाण्यामुळे तुमच्या इन्सुलीनची पातळी वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदू्च्या कार्यावर होतो. शरीरात हॉर्मोनल बदल होतात आणि तुमच्या झोपेच्या हॉर्मोन्सनां चालना मिळते. म्हणून भात खाल्ल्यावर नेहमी सुस्ती आणि मग झोप येते. भात जेवल्यावर झोप येणं अथवा सुस्त वाटणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र दुपारी जर तुम्ही भात खाणार असाल तर तुम्हाला काम करताना झोप येण्याची शक्यता आहे.भाताच्या पेजेचा करा आरोग्यासाठी उपयोग, वाढवा ऊर्जा
दुपारी भात खाताना काय काळजी घ्यावी
भात खाताना काही गोष्टींची काळजी घेतली तर दुपारची झोप नियंत्रित ठेवता येते. जसं की भात खाण्याचे प्रमाण कमी असावे. प्रमाणात भात जेवल्यास झोप लागत नाही. कारण तुम्ही जितका जास्त भात जेवाल तितका तुमच्या पचनशक्तीवर जास्त ताण येईल. ज्यामुळे सुस्ती आणि झोप येण्याची शक्यता वाढेल. यासाठी दुपारच्या लंचमध्ये भाजी, पोळी, भाकरी, डाळ, पराठा, सलाडचे प्रमाण जास्त असाव. मात्र भात अतिशय थोड्याय प्रमाणात खावा. शिवाय भात खाताना तो पांढरा खाण्याऐवजी हातसडीचा असेल याची काळजी घ्या. ज्यामुळ पचण्यास जास्त त्रास होणार नाही.भाताने वाढणार नाही वजन,जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत