किचन हॅक्स

मूगडाळ खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Trupti Paradkar  |  Jul 22, 2022
how to buy good quality moong dal in Marathi

भारतीय खाद्यसंस्कृती वरणभाताशिवाय अपूर्ण आहे. सहाजिकच वरण बनवण्यासाठी लागते ती मूगडाळ, जी प्रत्येक भारतीय घरात असते. डाळ अथवा आमटीसाठी तूरडाळ वापरली जाते. मात्र वरण आणि खिचडी बनवताना मात्र मूगडाळच वापरतात. कारण मूगडाळ पचायला हलकी असते. लहान बाळापासून घरातील जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या आहारात यासाठीच  मूगडाळ असायला हवी. घरातील महिलांना अथवा मोठ्या लोकांना वाणसामान खरेदी करण्याची सवय असते. मात्र जर तुम्ही नव्याने स्वयंपाक करायला शिकत असाल अथवा पहिल्यांदाच वाणसामानाच्या खरेदीसाठी जाणार असाल तर तुम्हाला मूगडाळ कशी खरेदी करायची हे माहीत असायला हवं.  यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मूगडाळ खरेदी करण्यासाठी टिप्स तसंच वाचा सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi, आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपी मराठीतून (Amti Recipe In Marathi)

मूगडाळ खरेदी करण्यासाठी टिप्स

बाजारात प्रत्येक गोष्टीत भेसळ केली जाते. भेसळयुक्त मूगडाळ खरेदी करू नये यासाठी या टिप्स लक्षात ठेवा.

डाळीचा रंग

मूगडाळ ही नेहमी हलक्या पिवळ्या रंगाची असते. पण काहींचा असा समज असतो की डार्क पिवळ्या रंगाची मूगडाळ खरेदी करणं चांगलं. पण लक्षात ठेवा गदड रंगाच्या मूगडाळीमध्ये तसा रंग येण्यासाठी कृत्रिम रंग मिसळलेला असतो. कारण मूगडाळीचा नैसर्गिक रंग इतका गदड कधीच नसतो. त्यामुळे मूगडाळ खरेदी करताना ही महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 

डाळीचा आकार 

मूगडाळ बाजारात दोन प्रकारे मिळते. एक सोललेली मूगडाळ आणि एक सालीसकट मिळणारी मूगडाळ.  या व्यतिरिक्त अख्खे मूगही बाजारात मिळतात. तुम्ही या तीनही प्रकारे मूग अथा मूगडाळ खरेदी करू शकता. मात्र खरेदी करताना मूगडाळ अख्खी आहे का हे तपासून घ्या. कारण बऱ्याचजा तुटलेली मूगडाळ जास्त किंमतीत विकण्यात येते. 

डाळीचे प्रकार ओळखा

डाळ खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सर्व प्रकारच्या डाळी कशा दिसतात, त्यांचे रंग आणि आकार माहीत असायला हवेत. त्यामुळे डाळ खरेदी करणं तुम्हाला सोपं जातं. कारण मूगडाळ आणि त्याच आकाराच्या इतर डाळींमध्ये संभ्रम झाल्यामुळे तुम्ही चुकीची डाळ खरेदी करू शकता. मूगडाळ आणि उडीदडाळ थोड्या फार फरकाने सारख्या दिसतात. यासाठी तुम्हाला या गोष्टीचे ज्ञान हवे. तसंच बऱ्याचदा दुकानदार भेसळ करण्यासाठी डाळींमध्ये खडे, प्लास्टिकचे तुकडे मिसळतात. त्यामुळे कधीच सुट्टी डाळ विकत घेऊ नका. चांगल्या ब्रॅंडची, सरकारमान्य आणि पॅक्ड मूगडाळ दुकानातून विकत घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From किचन हॅक्स