घर आणि बगीचा

घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants)

Dipali Naphade  |  Jul 22, 2020
How To Take Care Of Trees In Marathi

आपण आपले घर सजविण्यासाठी बऱ्याचदा लहान रोपट्यांचा अथवा झाडांचा उपयोग करत असतो. पण तुम्हाला या झाडांची काळजी कशी घ्यायची याची माहिती आहे का? घर असो अथवा बाहेर असो आपल्याला नेहमीच झाडांची हिरवळ आकर्षित करत असते. हल्ली घरात छानशी रोपटी अथवा झाडे लाऊन घर डेकोरेट करण्याचा एक नवा ट्रेंडही आहे. घरात काही इनडोअर प्लांट्स असणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही तितकंच चांगलं ठरतं. ज्यांच्या घराच्या आसपास बगिचा नाही अशा व्यक्तींना झाडांची आवड असल्यास घरच्या घरी तुम्ही अशी लहान झाडं लाऊन त्यांची काळजी घेऊ शकता. कोणती झाडे लावावी, या झाडांची कशी लागवड करायची याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. आपण आपल्या घराच्या लहानशा जागेतही ही रोपं लाऊन त्यांची काळजी घेऊ शकता. जाणून घेऊया घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants In Marathi).

पाणी कसे घालावे (Watering)

घरातील झाडांना पाणी कसे घालावे हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. काही ठिकाणी पाणी अति घातलेलं दिसतं. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, झाडांना पाणी घालताना यातील माती ओलसर राहील इतकंच पाणी घालावं. सतत झाडाचं भांडं ओलं राहील अथवा पाणी भरून राहील इतकं पाणी घालू नये. तसंच एक दिवस आड पाणी घाला. जेणेकरून मुळासकट पाणी व्यवस्थित झाडांना लागेल. सतत पाणी घालून झाडं खराब होतात. कारण सतत पाण्याने भरून राहीलं तर झाडं आणि झाडं लावलेले पॉट्स दोन्ही खराब होतात आणि भांडी तडकतात. त्यामुळे झाडांना व्यवस्थित मॉईस्चर होत राहील अशा तऱ्हेने पाणी घाला. 

वाचा – खेळता येणारे सोपे खेळ

अति पाणी झाले आहे कसे कळणार (Over Watering)

तुम्ही झाडांना किती आणि कसे पाणी घालत आहात तेदेखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर माती आणि झाड व्यवस्थित जपायचं असेल तर त्यामध्ये अति पाणी घालून चालणार नाही. पण झाडांना पाणी अति झालं आहे हे कसं कळणार? त्याचीही काही लक्षणं असतात, तुम्ही अशा प्रकारे झाडांची काळजी (how to take care of trees in marathi) तर घेत नाही ना? हे लक्ष ठेवायला हवं. अति पाणी घातल्याने झाडं मरतात. त्यासाठी नक्की कोणती लक्षणं आहेत ते पाहूया 

झाडांना पाणी कमी झाले आहे कसे कळणार (Under Watering)

झाडांना जसे काही ठिकाणी अति पाणी मिळते तसेच काही ठिकाणी कमी पाणी मिळते. पण झाडांना पाणी कमी मिळालं आहे हे कसे कळणार. तर त्यासाठीही तुम्हाला काही लक्षणं आम्ही इथे सांगत आहोत. 

पाण्याचा दर्जा कसा असावा (Water Quality)

इनडोअर प्लांट्ससाठी नियमित पाण्याचे जे तापमान आहे तेच तुम्ही वापरावे. त्यासाठी पाणी अति गरम वा अति थंड असण्याची गरज नाही. तुमच्या शहरातील पाण्यामध्ये क्लोरीन अथवा फ्लोराईड काहीही मिक्स केलेले असेल तरी तुम्ही ते पाणी तसेच वापरू शकता. झाडांना खरं तर पावसाचं पाणी अथवा वितळलेल्या बर्फाचं पाणी जास्त आवडतं. मात्र पाण्यामध्ये  सोडियम असेल असं पाणी झाडांना देणं टाळा. तुम्ही शक्यतो नेहमी येणाऱ्या पाण्यानेच झाडांची काळजी घेत राहा. 

पिंपळाची पानं ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याचे फायदे

घरच्या झाडांसाठी प्रकाश कसा असावा (Bright Area For Plants)

तुमच्याद्वारे सजावट करण्यात आलेल्या घरच्या झाडांसाठी तसा तर प्रकाश कमीच लागतो. मुळात घरात अशीच झाडं लावावीत ज्यांना कमी प्रकाश असला तरीही चालते. सूर्याची किरणं कमी मिळाली तरीही चालून जाईल अशा तऱ्हेची झाडंच घरात लावली जातात. त्यामुळे तुम्ही घरात झाडं लावण्यासाठी जागाही तशीच निवडली तरीही चालते. काही झाडांना सूर्याचा प्रकाश लागतो. त्यामुळे तुम्ही अशी झाडं घराच्या बाल्कनीमध्ये लाऊ शकता. घरात अशावेळी कोणती झाडं तुम्ही लाऊ शकता ते पण आपण जाणून घेऊया. म्हणजे त्याची काळजी घेणं सोपं होतं. 

झाडांसाठी उत्तम पोषण (Fertilizers For Indoor Plants)

तुम्ही तुमच्या घरातील झाडांना योग्य पोषण देण्यासाठी खत आणि उर्वरित खाद्याचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही एखाद्या अनुभवी माळ्याची अथवा बाग तयार करणाऱ्याची मदत घेऊ शकता. झाडांसाठी बाजारामध्ये अनेक रासायनिक खते मिळतात. पण घरातील झाडांसाठी जास्तीत जास्त कम्पोस्ट खत अथवा नैसर्गिक खतांचा वापर केला जावा असं सांगण्यात येतं.  कारण घरातील झाडांना त्यानेच चांगले पोषण मिळतं. रासायनिक खतांचा वापर केल्यास, घरातील झाडे मरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्या वेळी खतांचा वापर करायला हवा याची योग्य माहिती घेऊन त्याप्रमाणे घरातील झाडांची काळजी घ्यावी. तसंच तुमच्या घरात जेवणातील काही पदार्थ उरतात त्याचा तुम्ही खत म्हणून झाडांसाठी उपयोग करू शकता. जर घरात तुम्ही फुलांची  झाडं लावली असतील अथवा काही मिरची अथवा अन्य लहानसहान झाडांची तुम्हाला योग्य काळजी घ्यायची असेल तुम्हाला अशा खताचा उपयोग करता येतो आणि त्यामुळे तुमचे झाड व्यवस्थित राहाते आणि तुम्हाला योग्य फुलं आणि फळंही या झाडाची मिळतात. 

मातीचा वापर (Soil Selection)

घरातील झाडं नीट उगवायला हवी असतील त्यामध्ये योग्य सॉईल अर्थात माती कशी आणि कोणत्या प्रमाणात वापरायची आहे याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची माती आणि खतंही मिळतात. झाडांची माती वेळोवेळी खणून ती बदलणं आवश्यक असते. झाडाची वाढ आणि पोषण योग्यरित्या करण्यासाठी विशिष्ट कालावधीने माती खणणे, ती बदलणे या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला शेतातच नाही तर घरातील झाडांच्या वाढीसाठीही ही काळजी घ्यावी लागते. 

योग्य तापमान आणि योग्य सुरक्षा (Right Temperature And Good Care)

घरासाठी झाडं निवडताना त्यासाठी नक्की किती तापमान लागतं ते पाहणंही आवश्यक आहे. घरातील तापमान हे सतत थंड असू नये.  तुम्ही सतत एसी लाऊन बसणार असाल तर ते योग्य नाही. कारण झाडांना उष्णताही लागते. त्यामुळे नियमित तापमानात या झाडांना ठेवावे. तर रात्री त्यांना थंडाव्यात राहू द्यावे. या झाडांची नक्की कशी काळजी घ्यायची ते पण आपण पाहू. ही झाडे निवडताना त्याचा आकार, त्याचे गुणधर्म या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

झाडांची मुळे पाहून घ्या – इनडोअर प्लांट्स निवडताना त्याची मुळं कशी आहेत याची तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन निवड करायला हवी म्हणजे त्याची सुरक्षा करणं आणि काळजी घेणं सोपं होतं. त्यासाठी तुम्ही झाडाला हात लाऊन अथवा त्याची माती पाहून निष्कर्ष काढू शकता.  तसंच हलक्या पानांची आणि मोठ्या पानांच्या झाडांची निवड करा. 

झाडाला कीड लागली की नाही – तुम्ही झाडाला कीड तर लागली नाही ना याचीही पडताळणी करणं आवश्यक आहे. काही दिवसातच झाडाला कीड लागू शकते अथवा झाड आजारी पडू शकते. त्यासाठी तुमच्या झाडाच्या पानांवर सफेद डाग दिसत नाहीत ना याकडे नीट लक्ष द्या. तसंच या पानांमधून चिपचिपित रस येत नाही ना अथवा खराब वास येत नाही ना ते पाहा. 

पाण्याचा निचरा (Drainage Hole For Indoor Plants)

कोणत्याही ठिकाणी पाण्याचा अथवा मातीचा निचरा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरातील झाडं लावताना त्याची काळजी  आधीच करणं आवश्यक आहे. त्यामुळे या भांड्यामध्ये ऑर्गेनिक माती भरा आणि झाडं लावण्याची योग्य सुरूवात करा. 

रिपॉटिंग (Re-potting)

झाडं जुनी झाली असतील तर त्याचे रिपॉटिंग करणं गरजेचे आहे. आता रिपॉटिंग म्हणजे नेमकं काय? तर ते झाड मुळापासून दुसऱ्या एका भांड्यात माती साफ करून लावणं. ज्यामुळे पुन्हा एकदा नव्याने त्याला श्वास घेणं शक्य होतं. बऱ्याचदा एकाच भांड्यात राहून झाडं कुसतात अथवा त्यांची योग्यरित्या वाढ होत नाही. त्यामुळे त्याची माती बदलणं आणि त्यात कीड लागली आहे की नाही हे पाहून त्याचं रिपॉटिंग करावं लागते. 

झाडांची कापणी (Pruning)

झाडं वाढण्यासाठी त्याची कापणी अर्थात त्याची छटाईदेखील तितकीच महत्त्वाची असते. खरं तर घरातील झाडं अर्थात इनडोअर प्लांट्ससाठी तशी आवश्यकता भासत नाही. पण काही झाडं ही भांड्याच्या आकारानुसार वाढत गेली तर त्याची कापणी करावी लागते. उदाहरणार्थ मनी प्लांट. आपल्याला कल्पना नसेल इतक्या त्याच्या फांद्या वाढत जातात. मग त्यानुसार वेळोवेळी त्याची कापणी  करावी लागते. तुम्हाला हवं  त्या आकारात तुम्ही याच्या फांद्या कापून पुन्हा एकदा अशा झाडांना आपल्या मनानुसार मांडू शकता. 

वाचा – सेंद्रिय शेतीमुळे वातावरणातील प्रदूषण कसे कमी होऊ

पानांची स्वच्छता (Cleaning Leaves)

बऱ्याचदा मोठ्या झाडांप्रमाणेच इनडोअर झाडांची पानंही सुकून गळतात अथवा पिवळसर होऊन, खराब झालेली पानं गळून पडतात. पण ती पानं तशीच राहू देऊ नका. किमान दोन ते तीन दिवसानी आपल्या झाडांची पानं गळत आहेत की नाही आणि गळली असतील तर ती उचलून काढून टाकून स्वच्छता राखायला हवी. कारण ती पानं इतर पानांनाही खराब करतात. त्यामुळे तुम्हाला तुमची झाडं जगवायची असतील आणि त्यांना अधिक चांगलं राखायचं असेल तर वेळोवेळी पानांची स्वच्छतादेखील करायला हवी. तसंच आपण जर राहत असू तिथे धूळ आणि माती जास्त प्रमाणात असेल आणि पानांवर येऊन बसत असेल तरीदेखील  वेळोवेळी पानांची स्वच्छता राखायला हवी. अन्यथा  झाड मरायला वेळ लागत नाही. 

किटकांपासून सुटका

तुमच्या घरातील झाडांवर किटकांचा प्रभाव पडत असेल तर याकडे गंभीरतेने लक्ष द्या. तुम्हाला हे किटक नष्ट करायचे असतील तर तुम्ही किटनाशक साबण अथवा पावडरचा उपयोग करका. तुम्ही पाण्यात ही पावडर घालून झाडांवर स्प्रे द्वारे मारू शकता. किटकनाशक अशी औषधं तुम्ही पानांवर आणि झाडांवर शिंपडा आणि साधारण दोन आठवड्यांनंतर पुन्हा पाहा आणि पुन्हा झाडांवर असाच प्रयोग करा. 

साधारणतः महिन्यात तीन वेळा अशा तऱ्हेने वापर केल्यास, किटकांपासून झाडांची सुटका होते. तसंच किटकांची अंडी मरतील याकडे जास्त लक्ष द्या अन्यथा तुमची इनडोअर प्लांट्स खराब होऊ शकतात. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. माझे इनडोअर प्लांट्स पटकन कसे वाढतील?

वेळोवेळी योग्य पोषणासाठी पाणी आणि खत घातल्यास इनडोअर प्लांट्स पटकन वाढण्यास मदत मिळते. तसंच झाडांची वेळोवेळी योग्य  काळजी घेत राहायला हवी. 

2. इनडोअर प्लांट्ससाठी उत्कृष्ट पोषण कोणते?

नैसर्गिक खत हेच इनडोअर प्लांट्ससाठी उत्कृष्ट पोषण आहे. तुम्ही घरातील खाद्यपदार्थांचे  अथवा वाहिलेल्या फुलांचे खत करून झाडांना घातले तर त्याचे  चांगले पोषण होऊ शकते. 

3. कोका कोला झाडांसाठी योग्य आहे का?

कोका कोलामध्ये असणारे गुणधर्म हे किटकनाशकांसाठी योग्य असले तरीही झाडांसाठी कोका कोला हे अजिबातच योग्य नाही. कोणतेही कोल्ड ड्रिंक झाडामध्ये घालणं योग्य नाही. 

4. इनडोअर प्लांट्सना स्प्रे ने पाणी घालू शकतो का?

अर्थात तुम्ही भसाभसा पाणी घालण्यापेक्षा इनडोअर प्लांट्सना स्प्रे ने पाणी देणं उत्तम आहे. यामुळे पानांवरील धूळ आणि माती निघून जाते आणि झाडं अधिक ताजीतवानी दिसतात. 

5. झाडं पटकन वाढण्यासाठी कोणते लिक्विड योग्य आहे?

कार्बोनेटेड पाणी, चहा ही दोन्ही लिक्विड झाडं पटकन वाढण्यासाठी योग्य आहे. तुम्ही त्यासाठी कोणत्याही कोल्ड ड्रिंकचा वापर मात्र करू नये. 

6. झाडांना पाणी वरून द्यावं की खालून? 

झाडांना खालून पाणी दिलं तर मुळांमध्ये पाणी साचून राहातं आणि त्यातील पोषण नीट मिळत नाही. त्यामुळे वरून पाणी नीट घातल्यास, माती  आणि खत दोन्ही योग्य प्रमाणात झाडांना मिळून त्याचे पोषण चांगले होते. 

Read More From घर आणि बगीचा