मोबाईल ही आजकाल चैनीची किंवा सुखवस्तू नसून गरज झाली आहे. आजकाल प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असतोच. जसं जसं युजर्स वाढत आहेत तसंतसं स्मार्टफोनच्या बाजारपेठेतही वाढ होत आहे. पण त्यासोबतच मोबाईलशी निगडीत समस्यांमध्येही वाढ होत आहे, उदाहरणार्थ मोबाईल चार्जिंग. जास्तकरून लोकांना मोबाईल बॅटरी लो होण्यासारख्या समस्येचा सामना जास्त करावा लागतो. अशा परिस्थितीत गरज आहे, ती योग्य पद्धतीने मोबाईल चार्ज करण्याची. रोजच्या व्यस्त आयुष्यात सतत फोन चार्ज असणे शक्य नसतं. यामुळे आजकाल आपण सोबत पॉवरबँकही आपल्यासोबत कॅरी करतो. तर कधी आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटरच्या आपला मोबाईल कनेक्ट करून चार्ज करतो. पण या प्रकारामुळे आपल्या मोबाईल बॅटरी खराब होण्याची आणि व्हायरसचीही भीती असते. पण काळजीच कारण नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फोनला फटाफट चार्ज करण्याच्या काही टीप्स आणि ट्रीक्स. ज्यामुळे तुमचा फोन कमी वेळात चार्ज होईल आणि तुमच्या मोबाईलचं नुकसानही होणार नाही.
1. फ्लाईट किंवा एअरप्लेन मोड (Flight Mode or Airplane Mode)
जर तुम्ही फोन चार्जिंगला लावल्यावर वापरणार नसाल तर तो एअरप्लेन मोडवर टाका. खरंतर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकता तेव्हा मोबाईलमधील कॉल करणे, इंटरनेट ब्राऊंजिग किंवा जीपीएससारखे फिचर्स बंद होतात. तसंच तुमचा फोन हा डबल स्पीडने चार्ज होतो.
2. स्क्रीन लॉक (Screen Lock)
जर तुमचा फोन लवकर चार्ज करायचा असल्यास मोबाईलची स्क्रीन लॉक ठेवा आणि फोनचा वापर करू नका. टेक एक्सपर्ट सांगतात की, मोबाईल चार्ज करताना त्याचा वापर अजिबात करू नये आणि हे खरं आहे. मोबाईल स्विच ऑफ केल्यासही तो फटाफट चार्ज होतो.
3. ओरिजनल चार्जर (Original Charger)
आजकाल मोबाईल चार्जिंगसाठी सर्रास युनिव्हर्सल किंवा मल्टीटाईप चार्जर वापरल्याचं चित्र दिसतं. पण लक्षात ठेवा की, इमर्जन्सी सोडल्यास कधीही तुमचा फोन फक्त आणि फक्त फोनसोबत मिळालेल्या ओरिजनल चार्जरनेच चार्ज करा. कारण ओरिजनल चार्जरने चार्ज केल्यास तुमचा फोन लवकर चार्ज होतो. जर तुम्ही तुमचा फोन दुसऱ्या चार्जरने चार्ज केलात तर तो व्यवस्थित चार्ज होत नाही आणि काहीवेळाने बॅटरी पुन्हा लो झाल्याचं दिसतं. त्यामुळे कधीही दुसऱ्या चार्जर्सनी चार्ज करू नका. जर तुम्ही ओरिजनल चार्जरचा वापर करत नसाल तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीचा चार्जर खरेदी करा.
4. फोन करा स्विच ऑफ (Switch Off Your Phone)
फोनला स्विच ऑफ करून चार्ज करणं कधीही चांगलं आहे. यामुळे तुमचा मोबाईल फटाफट चार्ज होईल.
5. फीचर्स किंवा अॅप्स बंद करा (Turn Off Features Or Apps)
मोबाईल लवकर चार्ज करण्याच्या ट्रीकमध्ये अजून महत्त्वाची ट्रीक म्हणजे सर्व अॅप बंद करा. तसंच हेही लक्षात घ्या की, मोबाईलमधील वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि गुगल प्लेसारखे फीचर्स किंवा ऑटोमॅटीक अपडेट चालू असेल तर तेही बंद करा.
शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलची बॅटरी अगदी संपत आली असल्यास त्याचा वापर करू नका आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्यावर आलेला कॉल घेऊ नका. कारण मोबाईल चार्जिंग होत असताना बॅटरी गरम होते आणि तसंच मोबाईलची बॅटरी संपत आलेली असताना रेडिएशनचं प्रमाण जास्त असतं.
हेही वाचा –
तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय
प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत ‘या’ अॅप्स
तुम्हीही असे सोपे पासवर्ड ठेवता,मग तुमचेही अकाऊंट होऊ शकते हॅक
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar